kerala is the first and only state in the country to have its own internet service esakal
देश

केरळकडे आता स्वतःचं इंटरनेट; देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य

स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले.

धनश्री ओतारी

इंटरनेटने जग जवळ आले. तसेच प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दरम्यान, स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुरूवारी यासंदर्भात माहिती दिली. या सेवेतर्फे राज्य सरकार 20 लाख कुटुंबांना मोफत वाय-फाय देणार आहे. (kerala is the first and only state in the country to have its own internet service)

केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड, दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता (ISP) परवाना मिळाल्यानंतर राज्यातील सर्वांसाठी इंटरनेट सुलभ करण्यासाठी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी आयटी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.अशी माहिती खुद्द केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड ही सरकारची महत्त्वाकांक्षी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे, जी राज्यातील प्रत्येकाला इंटरनेटचा वापर करता येईल. परवाना मिळाल्यानंतर समाजातील डिजीटल दुरावस्था दूर करण्यासाठी संकल्पित प्रकल्पाचे काम सुरु करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. विजयन यांनी ट्विटरवर सांगितले.

विशेष म्हणजे केरळ सरकारने 1,548 कोटी रुपयांची फायबर ऑप्टिक नेटवर्क योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत सुमारे 20 लाख गरीब कुटुंबांना मोफत हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन दिले जाईल. याशिवाय राज्यातील 30 हजारांहून अधिक सरकारी कार्यालये आणि शाळाही या योजनेशी जोडल्या जाणार आहेत. तसेच, इंटरनेट योजनेमुळे वाहतूक, व्यवस्थापन आणि आयटी क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT