UAE Jackpot Esakal
देश

UAE Jackpot: मुलांची जन्मतारीख बापासाठी ठरली 'लकी'; UAE मधील भारतीय नागरीकाने लॉटरीमध्ये जिंकले तब्बल 33 कोटी रुपये

UAE Jackpot: राजीव अरिकत, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणारा भारतीय स्थलांतरित आहे त्याच्या मुलांची जन्मतारीख त्याच्यासाठी इतकी 'लकी' ठरली की यामुळे तो करोडपती झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

संयुक्त अरब अमिराती येथे नोकरीच्या शोधात गेलेल्या एका भारतीय नागरिकाला करोडो रूपयांची लॉटरी लागली आहे. त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची तारीख त्याच्यासाठी नशीब पालटणारी ठरली आहे. अबू धाबीच्या बिग तिकीट रॅफल ड्रॉमध्ये त्याने 15 दशलक्ष दिरहम (33 कोटी रुपये) जिंकले आहेत.

खलीज टाईम्सच्या रिपोर्टनुसार, राजीव अरिकत असे या व्यक्तीचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. 5 फेब्रुवारी रोजी तिकीट क्रमांक 037130 ने त्याला करोडपती बनवले. राजीव UAE मध्ये आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन म्हणून काम करतो आणि गेल्या 10 वर्षांपासून अल-ऐन शहरात राहतो.(Latest Marathi News)

राजीव अरिकत यांने खलीज टाइम्सशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'मी गेल्या तीन वर्षांपासून तिकीट खरेदी करत आहे, पण मी पहिल्यांदाच जिंकलो आहे. मी खूप आनंदी आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्य देखील खूप आनंदी आहेत. माझ्या पत्नीने मला तिकीट क्रमांक निवडण्यास मदत केली ज्यावर 7 आणि 13 अंक छापलेले होते. हे दोन अंक माझ्या मुलांच्या जन्मतारखा आहेत. मात्र, राजीवने ड्रॉमध्ये एकूण 6 तिकिटे काढली होती, त्यापैकी एक फुकट मिळाल्याने तो करोडपती झाला आहे.

बिग तिकिटाकडून विशेष ऑफर मिळाली: राजीव अरिकत

राजीव अरिकत याने सांगितले, 'मला बिग तिकिटकडून एक खास ऑफर मिळाली. जेव्हा मी 2 तिकिटे घेतली, तेव्हा मला 4 मोफत मिळाली. अशा प्रकारे मोफत तिकिटाने माझ्या नशिब पालटले. राजीवला बिग तिकिट ड्रॉमध्ये जिंकलेली रक्कम त्याला 19 लोकांसोबत शेअर करावी लागणार आहे.(Latest Marathi News)

कारण खरेदी केलेल्या दोन तिकिटांचे पेमेंट या सर्वांनी मिळून केले होते. अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग तिकीट लॉटरी आयोजित केली आहे जी तेथील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

'लॉटरीच्या पैशांबाबत अद्याप कोणतेही प्लॉन नाही'

विशेष म्हणजे राजीवने अद्याप या लॉटरीच्या विजेत्या रकमेबाबत कोणतीही विशिष्ट प्लॉन आखलेला नाही, परंतु त्याला ही लॉटरीची रक्कम इतर 19 लोकांसोबत समान प्रमाणात द्यायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT