Crime News esakal
देश

Crime: नवरा-बायकोनं केले दोन महिलांच्या शरीराचे तुकडे! कारण धक्कादायक

त्या महिलांच्या कुटूंबियांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याची तक्रार केरळ पोलिसांना दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

Black Magic: पैशांसाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. पैशांचा मोह हा भल्या भल्या व्यक्तींची अक्कल बंद पाडतो असे म्हटले जाते. त्या हव्यासापोटी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात. असे दिसून आले आहे. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. त्या मसाज सेंटर चालवणाऱ्या दाम्पत्यानं पैशांसाठी जे केलं आहे ते घृणास्पद आहे. ज्याची आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

केरळ पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यामध्ये दोन महिलांचा निर्घृण खुन करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते वेगवेगळ्या भागात दफन करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. ते शव दोन महिलांचे होते. पोलिसांनी प्राथमिक तपासात हे प्रकरण काळ्या जादुशी संबंधित असल्याचे दिसून आले. त्यांनी नरबळी असल्याचा संशयही व्यक्त केला होता. त्यानंतर असे समोर आले की, केरळमध्ये अंधश्रद्धेतून दोन महिलांची पहिल्यांदा हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले.

त्या महिलांच्या कुटूंबियांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याची तक्रार केरळ पोलिसांना दिली होती. एर्नाकुलम जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या रोसेलिन आणि पद्मा यांची त्या मसाज करणाऱ्या दाम्पत्यांने हत्या केली आहे. आपल्याला सतत येणाऱ्या आर्थिक त्रासाला कंटाळून त्यांनी या दाम्पत्याला मारल्याचे तपासून समोर आले आहे. त्या दोन्ही महिला या एर्नाकुलममध्ये लॉटरीचे तिकीट विकण्याचे काम करत असे.

या प्रकऱणाविषय़ी अधिक माहिती देताना कोची शहर पोलीस आयुक्त नागराजू चाकिलम म्हणाले की, पैशांसाठी आरोपीनं त्या दोन्ही महिलांना मारले. तसे केल्यास त्याला पैशांची प्राप्ती होईल असे सांगण्यात आले होते. ते पैसे मिळावेत म्हणून मनुष्याचे बलिदान हवे होते. म्हणून त्यानं हे कृत्य केले असे त्याच्याकडून आलेल्या जबाबात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार, बदनामीची भीती दाखवून उकळले १ कोटी

Latest Maharashtra News Updates live : आपचे नेते अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार

Vivek Kolhe : कोल्हेंच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब, अमित शहांची दिल्लीत भेट : पक्ष न सोडण्याचे संकेत

Guru Pushyamrut 2024: धनत्रयोदशीपूर्वी आज गुरूपुष्यामृतचा शुभ योग, केलेल्या कामाचे मिळेल चांगले फळ

Success Story: सीएची नोकरी सोडली; आईसोबत सुरु केला व्यवसाय, वर्षाला कमावतोय 50 लाख रुपये

SCROLL FOR NEXT