Coronavirus esakal
देश

Covid New Variant JN.1 : केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री; दोघांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर

गेल्या काही दिवसांत केरळमध्ये कोविडमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

रोहित कणसे

Covid New Variant Update : केरळमध्ये कोरोनामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाचा संकट परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत केरळमध्ये कोविडमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यानंतर आरोग्य विभागाने राज्यभरात या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे. एवढेच नाही तर कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या शेजारील राज्यांमध्ये देखील आरोग्य विभाग तयारीला लागला असून रुग्णालयांना अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.

द हिंदूच्या वृत्तानुसार, मरण पावलेल्यांमध्ये कोझिकोड जिल्ह्यातील वट्टोली येथील 77 वर्षीय कालियाट्टुपरमबथ कुमारन आणि कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथील 82 वर्षीय पलक्कंडी अब्दुल्ला यांचा समावेश आहे. शुक्रवारी कुमारन यांच्या मृत्यूनंतर, लॅब टेस्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोना असल्याची समोर आले आहे. शनिवारी कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचार घेत असलेल्या अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला होता.

केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट

केरळमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन.1 (Covid Sub-variant JN.1) आढळला आहे. आठ डिसेंबर रोजी, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलममधील RT-PCR पॉझिटिव्ह सॅम्पल्समध्ये सब व्हेरियंट आढळला. 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR द्वारे 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये ती संक्रमित आढळली. महिलेला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि आता त्या कोरोनामधून बऱ्या झाल्या आहेत.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, तमिळनाडूमध्ये कोरोनापासून बचावासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हायरस पसरू नये म्हणून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तमिळनाडूमध्ये 15 डिसेंबर पर्यंत कोरोना संक्रमणाचे 36 प्रकरणे समोर आले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार, केरळच्या सर्व हेल्थ फॅसिलीटीमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे, जेणेकरून रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेता येईल. एका सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे असतात आणि कोणत्याही उपचाराशिवाय घरीच बरे होऊ शकतात. केरळमधील विविध एन्ट्री पॉइंट्सवर लक्ष ठेवले जात आहे.

पहिल्यांदा कुठे सापडला नवीन सब-व्हेरियंट?

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशाला JN.1 संसर्ग झाल्याचे आढळून आले. ही व्यक्ती मूळची तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेली होती. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात असूनही, कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. भारतात JN.1 सब-व्हेरियंटची इतर कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत.

कोरोनाचा सब-व्हेरियंट JN.1 प्रथम युरोपियन देश लक्झेंबर्गमध्ये आढळला होता. येथून तो अनेक देशांमध्ये पसरला. हा सब-व्हेरियंट पिरोलो व्हेरियंट (BA.2.86)शी संबंधित आहे . यात मोठ्या प्रमाणात होणारे म्यूटेशन ही याबद्दलची विशेष बाब आहे. खासकरून स्पाइक प्रोटीनमध्ये याचे जास्त म्युटेशन होते. त्यामुळेच मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीलाही ते धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या कारणांमुळे नवीन सब व्हेरियंटबद्दल कमालीचा भीती व्यक्त होत आहे.

भारतात कोविडची किती प्रकरणे आहेत?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शनिवारपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्येत 339 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. अशा प्रकारे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1492 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा 5,33,311 वर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 4,50,04,481 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 4,44,69,678 लोक त्यातून बरे झाले आहेत. अशा प्रकारे रिकव्हरी रेट 98.81% वर पोहोचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT