Kerala Landslide Esakal
देश

Wayanad Landslide Deaths: लोकं झोपली होती अन्... वायनाड भूसख्खलनात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Kerala Landslide: मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे गेले आणि मोठमोठे ढिगारा पाण्यासह खाली आला, ज्याखाली डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक गाडले गेले.

आशुतोष मसगौंडे

देशात आज एक भीषण रेल्वे अपघात झाला असतानाच, मोठ्या प्रमाणात भूस्खलनही झाले. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे गेले आणि मोठमोठे ढिगारा पाण्यासह खाली आला, ज्याखाली डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक गाडले गेले.

या अपघातात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. 100 हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) भूस्खलनाबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही बचाव कार्यात एनडीआरएफचे पथक कार्यरत आहेत. कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे पथकही घटनास्थळी उपस्थित आहेत.

पहाटे दोनच्या सुमारास लोक झोपेत असतानाच दरड कोसळली. यानंतर चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक ढिगारा खाली आला.

दरम्यान आतापर्यंत 16 जणांना वाचवण्यात यश आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूसख्खलनाच्या या दुर्घटनेनंतर लोकसभेची विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पीडितांना दिलासा दिला आहे. याचबरोब त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत मदत कार्याचा आढावा घेतला आहे.

वृत्तानुसार, चुरल माला शहरात पूल कोसळल्याने सुमारे 400 कुटुंबे अडकली आहेत. अनेक लोक जखमी झाले असून अनेक घरे वाहून गेली आहेत. संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधता येत नाही.

केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनासह पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग-राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नियंत्रण कक्ष उघडला आहे. आपत्कालीन मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने केरळमधील मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तासांत धोक्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन तासांत केरळमधील कोल्लम, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT