Kerala wayanad crises 
देश

Wayanad Landslide: दुर्घटनेची पहिली सूचना दिली अन् मदतीसाठी मागेच थांबली, झऱ्याजवळ सापडला मृतदेह

Kerala wayanad crises: नीतू जोजो या पहिल्या महिला होत्या ज्यांनी सर्वातआधी भूस्खलनाची माहिती देऊन मदत मागवली होती. त्यांचाच दुसऱ्यांना मदत करत असताना मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

Kerala News: वायनाडमधील भूस्खलनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. वायनाड दुर्घटनेच्या अनेक करूण कथा आहेत. अशीच एक कथा नीतू जोजो यांची आहे. नीतू जोजो या पहिल्या महिला होत्या ज्यांनी सर्वातआधी भूस्खलनाची माहिती देऊन मदत मागवली होती. त्यांचाच दुसऱ्यांना मदत करत असताना मृत्यू झाला आहे.

नीतू जोजो यांनी त्यांचे पती आणि पाच वर्षाच्या मुलाला वाचवलं, पण दुसऱ्यांचा जीव वाचवता वाचवता त्यांना स्वत:चा जीव गमावला लागला आहे. घटनेच्या अनेक दिवसानंतर त्यांचा मृतदेह एका झऱ्याजवळ आढळून आला आहे. पतीने नीतू यांची ओळख केली आहे. त्यामुळे लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

सर्वात पहिली माहिती दिली

वायनाडमध्ये मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजता भीषण संकट आले. यावेळी नीतू यांनीच वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साईन्सला फोन करून माहिती दिली होती. चूरलमाला येथे भूस्खलन झाले होते. यात अडकलेल्या आपल्या आणि इतरांच्या परिवारासाठी मदत मागणाऱ्या नीतू यांचे कॉल रिकॉर्डिंग व्हायरल होत आहे. यातून घटनेची भीषणता कळत आहे. ३० जुलै रोजीची ही रिकॉर्डिंग आहे.

कॉल रिकॉर्डिंगमध्ये नीतू म्हणतात की, पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं आहे.घर भूस्खलनाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. घराजवळ राहणारे चार ते पाच कुटुंब त्यांच्या घरी आश्रयासाठी आले आहे. तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे घर सुरक्षित आहे.

नीतू यांच्यासोबत इतर काही शेजारी देखील होते. पण, सकाळी ४ वाजता दुसरे भूस्खलन झाले अन् त्यांचे घर देखील कचाट्यात सापडले. जवळून वाहणार्‍या नदीने आपला मार्ग बदलला अन् नीतू शेजाऱ्यांसोबत वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह सूचीमाला येथे झऱ्याजवळ सापडला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. नीतू यांनी फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली होती. संपूर्ण परिसर घसरत आहे. लवकर काहीतरी वाहन पाठवून द्या, असं नीतू म्हणाल्या होत्या. त्यानंतर दोन अॅम्बुलन्स पाठवण्यात आले होते. चुरुमाला याठिकाणाहून ४० किमी दूर होते. त्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचण्यास वेळ लागणार होती.

मदतीसाठी मागे थांबल्या

मेडिकल कॉलेजची एक अॅम्बुलन्स नीतू यांच्या घराकडे निघाली होती, पण एका पुलावर माती जमा झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली होती.त्यामुळे अॅम्बुलन्स पाठवता आली नाही, पण कसंतरी ओमनी व्हॅन पाठवण्यात आली. व्हॅन जेव्हा पोहोचली तेव्हा त्यांनी आपले पती आणि मुलासह इतर काही लोकांना व्हॅनमधून पुढे पाठवलं. इतरांची मदत करण्याच्या हेतूने त्या मागेच थांबल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT