नवी दिल्ली : अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना समन्स पाठवलं होतं. यावर आयोगाला रिपोर्ट प्राप्त झाला असून या रिपोर्टवर आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. (Ketki Chitale case National Women Commission objects to Maharashtra DGP report)
रेखा शर्मा म्हणाल्या, समन्सनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी आम्हाला कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. पण या रिपोर्टमध्ये अनेक विसंगती असून अदखलपात्र गुन्हा असतानाही केतकीला कोर्टाच्या योग्य परवानगीशिवाय अटक करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
केतकी चितळेला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याप्रकरणात शरद पवारांनी स्वतः कोणताही अब्रुनुकसानीचा दावा केलेला नाही तर पक्षाकडून असा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं ज्या व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे त्याच व्यक्तीनं तक्रार दिली नसेल तर तो गुन्हा अदखलपात्र असतो, त्यामुळं इतर कोणत्या कारणांमुळं पोलिसांनी केतकीला अटक केली? असा सवालही यावेळी रेखा शर्मा यांनी विचारला आहे. सध्या केतकीची केस ही कोर्टात सुरु आहे. पण हा पूर्णपणे राजकीय सूडभावनेनं केलेली कृती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केतकी चितळे अटक प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना समन्स बाजवलं होतं. त्यानुसार सात दिवसात या समन्सला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. केतकी चितळेनं १५ मे रोजी फेसबुकवरुन राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती. नंतर कोर्टानं तिला कोठडीही सुनावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.