Kiren Rijiju 
देश

Law minister: मोदींनी किरेन रिजिजूचे बदलले खाते, राजस्थान निवडणुकीआधी भाजपने फिरवली भाकरी

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

धनश्री ओतारी

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता अर्जुनराम मेघवाल ही जबाबदारी सांभाळतील. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Kiren Rijiju Out As Law Minister Arjun Ram Meghwal Replaces Him)

दरम्यान, राजस्थान निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे.

अर्जुन राम मेघवाल, राज्यमंत्री यांनी किरेन रिजिजू यांच्या जागी त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवला. किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सोपविला जाईल. असी माहिती राष्ट्रपती भवनने दिली आहे.

२०२४ लोकसभा निवडणूका तोंडावर आल्यात. त्याआधी महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पार पडणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली रननीति आखण्यास सुरुवात केली आहे.

कोण आहेत मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत. बिकानेर आणि फिलीपाईन्समधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी एमए, एलएलबी आणि एमबीएच्या पदव्या घेतलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT