Kirit Somaiya and Yashwant jadhav Sakal Digital
देश

'जाधवांकडे बॅगा भरून पैसे आले होते, यासाठी मी वित्त मंत्र्यांना भेटलो'

ओमकार वाबळे

मुंबई मनपा निवडणुकीआधी शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. संबंधित कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. मनपा निवडणुका जवळ आल्याने या प्रकरणाला राजकीय रंग लागला आहे. (BJP leader Kirit Somaiya allegations on Yashwant jadhav)

त्याच किरीट सोमय्यांनी डर्टी डझन्स अशा नावाने १२ नेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये जाधव कुटुंबीय आणि महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नावांचा समावेश त्यांनी केला. कारवाई दरम्यान सोमय्या दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जावध कुटुंबीय आणि कंत्राटदारांचे संबंध त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यशवंत जाधवांच्या प्रकरणासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत होतो. कंपनी मंत्रालय, ईडी, वित्त मंत्र्यांपासून सर्वांच्या भेटी घेतल्या होत्या. महापौरांनी एरआएच्या सदनिका हडपल्या आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला. यामिनी जाधव यांनीही भ्रष्टाचार केला आहे. आमदार यामिनी जाधव यांनी त्यांची माहिती लपवली. २०१९ च्या निवडणुकीसाठी त्यांनी मालमत्ता लपवल्याचा आरोप सोमय्यांनी केला. (Bjp Vs Shiv sena)

उदयशंकर महावार हा ठाकरे यांचा हवाला ऑपरेटर आहे. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांचा हवाला ऑपरेशन हाच माणूस बघतो. मनपाचा फंड कलेक्टर यशवंत जाधव यांचाही हवालामार्फत पैसा याच व्यक्तीने वळवल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.

'बंद पडलेल्या कंपनीतू जाधवांनी पैसे वळवले'

यशवंत जाधव यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे परिवार, अनिल परब यांच्याप्रमाणे जाधव कुटुंबीयांनीही मनी लाँडरिंग केलंय. यामिनी जाधव यांनी आमदारकीसाठी फॉर्म भरताना कोट्यवधींची मालमत्ता निवडणूक आयोगापासून लपवली. उद्धव ठाकरेंनी मे 2020 मध्ये फॉर्म भरला त्यांनी 19 बंगले लपवले मालमत्तेतून लपवले. यामिनी जाधव प्रकरणात आयकर विभागाने प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी देखील ग्राह्य धरली आहे. अधिकृतरित्या बंद कंपनीतून यशवंत जाधवांनी 15 कोटी रुपये कॅश देऊन चेकमध्ये ती घेतली, असे आरोप सोमय्यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT