नवी दिल्ली : कोट्यवधींच्या बँक घोटाळ्याप्रकरणात फरार असलेल्या विजय मल्याला (Vijay Malya) ब्रिटनच्या न्यायालयाने दणका दिला आहे. विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या निकालामुळे मल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून भारतातून पळालेल्या मल्ल्याच्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सुमन कुमार या अधिकाऱ्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली आहे. 9,000 कोटींचा गंडा घातल्याचा मल्यावर आरोप आहे. आक्टोबर 2015 मध्ये या प्रकरणाचा तपास हा सीबीआयचे अधिकारी सुमन कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कुमार सध्याच्या घडीला सीबीआय अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज देणाऱ्या बँकांनी गंभीर गुन्हा घडल्यानंतरही सुरुवातीच्या काळात विजय मल्ल्याच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे सीबीआयसमोर एक मोठे आव्हान निर्माण करणारे होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) सूत्रांच्या आधारावर माहिती गोळा करुन मल्याविरोधात 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल केली. याचा पुढील तपास सुमन कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला.
कुमार सुमन यांची ही कामगिरी कौतुकास्पदच!
वयाच्या 23 व्या वर्षी उप-निरिक्षक म्हणून सीबीआयमध्ये दाखल झालेल्या कुमार यांचा कामाचा आलेख कौतुकास्पद असाच आहे. सीबीआयमधील सर्वश्रेष्ठ तपास अधिकारी म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2008 मध्ये उल्लेखनिय कामगिरी बद्दल त्यांना पोलिस पदक, 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी, आणि 2015 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही : जागतिक आरोग्य संघटना
सीबीआयसमोर होता मोठा पेच
2016 मध्ये मल्या देश सोडून पसारा झाला तेव्हा सीबीआयसाठी ही एक लाजीरवाणी घटना होती. त्याला परत भारतात आणण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात कायद्याच्या लढाईला सामोरे जावे लागणार होते. सीबीआयचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक राकेश अस्थाना यांनी विशेष तपास समितीची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी सुमन कुमार यांच्यासोबत तपास सुरु ठेवला. मल्याच्या प्रकरणात कोर्टाची तारीख चूक नये याची विशेष काळजी सीबीआयला घ्यावी लागली. ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाच्या प्रकरणात भारताचे रेकॉर्ड फार काही चांगले नव्हते मात्र सीबीआयला या प्रकरणात यश मिळाले.
सोशल डिस्टन्सिंगच उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणार टॉयलेट
खास प्लॅन आणि तपासातील निष्कर्षामुळे मिळाला विजय मल्याचा पराजय
कुमार यांनी मल्याच्या विरोधात फसवणुकीचे ठोस प्रकरण तयार करण्याचा प्लॅन आखला. यासाठी भारतामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. मल्याला भारतात आणायचे असेल तर त्याच्या विरोधातील पुरावे हे ब्रिटनच्या न्यायालयाला दंडणीय अपराध वाटावे, याकडेही सीबीआयला विशेष लक्ष द्यावे लागले. सुमन कुमार यांनी तपासात जे निष्कर्ष काढले त्यामुळेच मल्याच्या प्रत्यार्पणाचा निकाल हा भारताच्या बाजूने लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.