लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (PM Modi) काशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Corridor) हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांचं स्वप्न आता साकार झालं असून आज त्यांच्याच हस्ते या धामचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. पण, काशी विश्वनाथ धामची वैशिष्ट्ये काय आहेत? या धामचं पहिल्यांदा पुरुज्जीवन कोणी केलं होतं? तेच आज आपण पाहुयात.
२४१ वर्षांत तीनदा मंदिराला केलं पुनरुज्जीवित -
गेल्या २४१ वर्षांत काशी विश्वनाथ मंदिराला तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित करण्यात आलंय. या मंदिराला अनेकवेळा नेस्तनाबूत कऱण्याचा प्रयत्न देखील झाला. सुरुवातील मराठा साम्राज्याची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये या मंदिराला पुनरुज्जीवित केलं होतं. त्यानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी १८५३ मध्ये या मंदिराच्या काही भागाला सोन्यानं मढवलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रकल्पांतर्गत या मंदिरात भव्य कॉरिडॉर बनवण्याचे काम सुरू झाले. भूमीपूजनानंतर सुमारे 2 वर्षे 8 महिन्यांनंतर या ड्रीम प्रोजेक्टचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण कॉरिडॉरच्या उभारणीसाठी 340 कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण खर्चाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे दोन भाग -
काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे दोन भागात विभागण्यात आले आहे. मुख्य संकुल बांधण्यासाठी लाल रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. कॉरिडॉरमध्ये चार मोठे दरवाजे आहेत, त्याभोवती एक प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर संगमरवरी 22 शिलालेख लावण्यात आले आहेत. त्यावर शंकराचार्य, अन्नपूर्णा स्तोत्र, काशी विश्वनाथ आणि भगवान शंकराशी संबंधित महत्त्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या संकेतस्थळानुसार, हे मंदिर 'सुवर्ण मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.
१६ लाख लाडूंचा प्रसाद -
बनारसमध्येही महिनाभराचा उत्सव साजरा केला जाणार आहे, ज्याला ‘भव्य काशी-दिव्य काशी’ असे नाव देण्यात आले आहे. बनारसमधील एकही कुटुंब किंवा व्यक्ती या कार्यक्रमापासून वंचित राहू नये यासाठी 16 लाख लाडू प्रसादासाठी बनवले जात आहेत. कामगार ते लोकांच्या घरी पोहोचवतील. यासोबतच लोकांना स्मृतीचिन्हही देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.