Know what is Brain-eating Amoeba: कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. त्यातच आता आणखी एक व्हायरस समोर आला आहे. या व्हायरसचे नाव ब्रेन इटिंग अमिबा असून, याची लागण झालेला एक रुग्ण दक्षिण कोरियात आढळला आहे. थायलंडवरून परतल्यानंतर या ५० वर्षीय व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षण दिसू लागली. या व्हायरसचे वैज्ञानिक नाव Naegleria fowleri असे आहे.
Korea Disease Control and Prevention Agency नुसार ही व्यक्ती जवळपास ४ महिने थायलंडमध्ये राहिले. तेथून परतल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, मानदुखी आणि बोलण्यात अडथळा येणे अशी लक्षणं दिसू लागली. मात्र, या आजाराची लागण झालेली ही काही पहिलीच व्यक्ती नाही. याआधी अमेरिकेतील Nebraska येथील एका लहान मुलाचा यामुळे मृत्यू झाला होता. हा व्हायरस नाकाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो व त्यानंतर मेंदूमधील पेशी नष्ट करतो.
या आजाराची लागण काय आहेत?
हा व्हायरस नाकाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. स्विमिंग, डायव्हिंग, नदी आणि तलावातील पाण्याद्वारे हा आजार पसरतो. व्हायरस नाकाच्या माध्यमातून मेंदूत प्रवेश करतो व त्यानंतर मेंदूमधील पेशींना हळूहळू नष्ट करतो. CDC नुसार, नाक स्वच्छ करतान नळाच्या पाण्याचा वापर केल्याने Naegleria fowleri व्हायरसची लागण होते. व्हायरसची लागण झाल्यास डोकेदुखी, उलट्या, मानदुखी, अस्वस्थपणा आणि बोलण्यात अडथळा अशी लक्षणं दिसतात.
हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
भारतामध्ये देखील आढळला आहे हा व्हायरस?
वर्ष १९३७ मध्ये सर्वात प्रथम अमेरिकेत या आजाराची लागण झालेली व्यक्ती आढळली होती. रिपोर्टनुसार, Naegleria fowleri हा धोकादायक व्हायरस आहे. या आजाराची लागण झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. जवळपास सर्व खंडांमध्ये हा व्हायरस आढळला आहे. भारतासह १६ देशांनी या व्हायरसला धोकादायक घोषित केले आहे.
व्यक्तीपासून पसरतो हा व्हायरस?
Naegleria fowleri व्हायरस संसर्गजन्य नाही. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराची लागण होत नाही. या आजाराची लागण होण्याची शक्यताही खूप कमी आहे. २०१२ ते २०२१ या कालावधीत या आजाराचे ३१ रुग्ण आढळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.