कोलकाता: मनाविरुद्ध निकाल दिल्यामुळे चिडलेल्या वकिलाने थेट न्यायाधीशांनाच शाप दिला आणि म्हणाला की, तुम्हांला कोरोना होईल. वकीलाच्या या वागणुकीमुळे न्यायाधीशांनी अवमानाची कारवाई केली. वकील विजय अधिकारी यांना न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी नोटीस पाठवल्यापासून १५ दिवसांच्या आत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायाधीश दत्ता यांनी आदेशात सांगितले की, 'सुट्टीच्या दिवसानंतर ज्यावेळी न्यायालय पुन्हा सुरु होतील तेव्हा या प्रकरणाची खंडपीठामार्फत सुनावणी होईल. कोरोना व्हायरसमुळे कोलकाता उच्च न्यायालयात १५ मार्चपासून फक्त अत्यावश्यक प्रकरणांची सुनावणी सुरु आहे. २५ मार्चपासून याठिकाणी व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे सुनावणी घेण्यात येत आहे.'
वकील विजय अधिकारी यांनी कर्ज न चुकवल्यामुळे बँकेकडून त्यांच्या याचिकाकर्त्यांची बस लिलाव होण्याला स्थगिती द्यावी, अशी याचिका सुनावणीसाठी होती. या बसची १५ जानेवारीला जप्त केल्याची माहिती मिळतास न्यायालयाने या प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मात्र, न्यायाधीशांनी आदेश देण्यास सुरुवात केली त्यावेळी वकील विजय अधिकारी वारंवार त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते.
न्यायाधीश दत्ता यांनी सांगितले की, 'अधिकारी यांना वारंवार समज देऊन सुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी माझे भविष्य अंधारमय बनवून टाकू आणि त्यासाठी मला कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ दे असा शा दिला. न्यायाधीशांनी वकील अधिकारी यांना नोटीस बजावताना म्हटले आहे की, 'मला भविष्य अंधारमय होण्याची ना कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. मात्र, न्यायालयाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखणे आणि त्याचे पावित्र्य कायम राखणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.