कोलकता : उद्योगपतींच्या दोन मुलांनी तब्बल 182 युवतींसोबत शारिरीक संबंध ठेवून एमएमएस तयार केले. दोघांच्या लॅपटॉपमध्ये सेक्सच्या क्लिप्स आढळून आल्या असून, त्यांना अटक करण्यात आली आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
दोन उद्योगपतींच्या मुलांना सेक्स ब्लॅकमेल रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांवर महिलांसोबत संबंध ठेवून त्याच्या सेक्स क्लिप बनवल्याचा आरोप आहे. शिवाय, या प्रकरणात दोन्ही मुलांच्या घरातील सामिल असलेल्या नोकरांनाही अटक करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून ही दोन मुले सेक्स रॅकेट चालवत होती. त्याच्यांकडे 182 महिलांच्या सेक्स क्लिपा आढळून आल्या आहेत. तीन महिने केलेल्या तपासानंतर आदित्य अग्रवाल (वय 20) आणि अनीश लोहारूका (वय 20) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना मदत केल्याप्रकरणी कैलाश यादव नावाच्या नोकरालाही अटक करण्यात आली आहे.
कोलाकातामधील सर्वात मोठे कपड्यांचे दुकान असलेल्या घरातील आदित्य अग्रवाल आहे. तर, अनीश लोहारूका याचे वडील रिअल इस्टेट आणि हॉटेल चालवतात. तिन्ही आरोपींना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अनीशला या प्रकरणामध्ये फसवण्यात आल्याचे लोहारूका कुटुंबियांनी म्हटले आहे.
एका महिलेने या दोघांवर 10 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. अनिशचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर त्यात 182 सेक्स क्लिपचे फोल्डर आढळून आले. प्रत्येक फोल्डरमध्ये महिलेचे नाव लिहिण्यात आले होते. 2013 पासूनच्या सेक्स क्लिपा आहेत. लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आदित्य आणि अनीश वेगवेगळ्या महिलांसोबत मैत्री करत त्यानंतर त्यांना आपल्या घरी किंवा हॉटेलवर भेटायला बोलवत. तेथेच कॅमेरा लपवून या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवत. रेकॉर्ड केलेले हे व्हिडीओ आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवत. काही दिवसांनंतर हेच व्हिडीओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळत असत. दोघांनी शारिरीक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.