kuki militants ambush crpf battalion in manipur late night 2 soldiers martyred  Esakal
देश

Manipur: कुकी उग्रवादीयांकडून मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला, 2 जवान शहीद

Manipur: शुक्रवारी मध्यरात्री कुकी उग्रवादीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मणिपूरमधील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच शुक्रवारी मध्यरात्री कुकी उग्रवादीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.

याबाबत माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरा ते मध्यरात्री २.१५ च्या दरम्यान कुकी उग्रवादीयांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला. हे दोन्ही जवान मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते.

मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. मतदान संपल्यानंतर काही तासांनी हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाह्य मणिपूर सीटवर मतदान संपल्यानंतर काही तासांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या चौकीवर कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या नरनसेना गावात डोंगरी भागातून दरी भागाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यावेळी कुकी अतिरेक्यांनी बॉम्ब फेकला.

या स्फोटात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोन जवानांना वीरमरण आलं. इतर जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT