भोपाळ : कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी या मादी चित्त्याने आज पाच बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे येथील चित्त्यांची संख्या २६ झाली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीच याबाबतची माहिती ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून जाहीर केली.
‘‘हाय फाईव्ह कुनो! दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या गामिनी या पाच वर्षांच्या मादी चित्त्याने आज पाच बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे भारतातील चित्त्यांच्या बछड्यांची संख्या १३ झाली आहे,’’ असे यादव यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यादव यांनी या बछड्यांचे छायाचित्र आणि त्यांचा एक व्हिडिओही जारी केला आहे. भारतामध्ये चित्त्यांना वसविण्याच्या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार दक्षिण आफ्रिका आणि नामीबियामधून दोन टप्प्यांमध्ये एकूण २० चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी सात चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर कुनोमध्ये आतापर्यंत १३ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारीमध्येही आशा या मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.