Lakhimpur Case sakal
देश

Lakhimpur Case : मिश्राला जामीन मंजूर;‘लखीमपूर’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडल्याचा आरोप असलेला भाजप नेता आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन दिला. आशिष हा माजी केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आशिषला अंतरिम जामीन दिला होता. न्या. सूर्यकांत आणि न्या. उजल भुयान यांच्या खंडपीठाने मिश्रा याला नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणात आरोप झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणाची याचिका लवकरात लवकर निकाली काढावी असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आशिषला दिल्ली किंवा लखनौ या दोन ठिकाणीच राहण्याची अट घातली आहे. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरी येथे आंदोलन केले होते. यावेळी एका वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर हिंसक झालेल्या शेतकऱ्यांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांची तसेच वाहन चालकाची हत्या केली होती. या संघर्षात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT