Rakesh Tikait esakal
देश

आरोपी मिश्राचा जामीन फेटाळताच राकेश टिकैत म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

'आम्ही 25 तारखेला लखीमपूरला जाणार असून, तिथं एक समिती स्थापन करणार आहे.'

लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri Case) आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) आज (सोमवार) फेटाळला असून आशिष मिश्राला आठवडाभरात कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. यावर प्रतिक्रिया देताना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. लखीमपूर खेरी घटनेवर सुप्रीम कोर्ट सुरुवातीपासूनच लक्ष ठेवून आहे. याबाबत कोर्टानं यूपी सरकारलाही फटकारलंय, असं त्यांनी नमूद केलं.

राकेश टिकैत पुढं म्हणाले, एसआयटीची जी टीम तयार केलीय, त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे काम करावं, असं आम्ही वारंवार सांगितलंय. उत्तर प्रदेश सरकारनं योग्य काम केलं नाही, म्हणूनच आशिष मिश्राला (Ashish Mishra) जामीन मिळाला. आज सुप्रीम कोर्टानं त्यावर सुनावणी केली असता, तो जामीन फेटाळण्यात आलाय. त्यानंतर आठवडाभरात पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालय सुरुवातीपासूनच याची दखल घेत आहे, त्यामुळं आम्हाला पूर्ण न्यायाची आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही 25 तारखेला लखीमपूरला जाणार असून, तिथं लखीमपूरमध्ये एक समिती स्थापन करणार आहे. जी याकडं लक्ष देईल, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांकडून आरोपींना संरक्षण देण्याचा आरोप होत आहे. कारण, या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) उर्फ ​​टेनी यांचा मुलगा आहे. हायकोर्टातून (High Court) त्याची जामिनावर सुटका झालीय. मात्र, सोमवारी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं आता शेतकऱ्यांना या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा निर्माण झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT