Lalu Yadav sakal
देश

Lalu Yadav : लेकीच्या सासरीच झाली लालूंची किडनी ट्रांसप्लांट सर्जरी; लेकीचे भावनिक ट्वीट

लालू प्रसाद यादव दीर्घकाळापासून किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत

सकाळ डिजिटल टीम

RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव दीर्घकाळापासून किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत; त्यांच वय 74 वर्ष असून, त्यांची किडनी ट्रांसप्लांट सर्जरी आजच झाली असून त्यांची डोणर ही त्यांचीच मुलगी आहे. असं म्हणायला हरकत नाही की त्याच देवदूत झाल्या आहेत. त्यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनीच आपल्या बाबांना आपली किडनी दिली.

लालू यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री असून, त्यांच नाव राजकारणात खूप आदराने घेतलं जातं. त्यांची लहान मुलगी रोहिणी आचार्य या आपल्या पतीसोबत सिंगापूर येथे राहतात.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

RJD सुप्रीमो लालू यादव यांना नक्की काय झालय?

लालू यादव अनेक वर्षांपासून दिल्लीच्या (aiims) एम्स हॉस्पिटलमध्ये किडनीच्या आजारावर उपचार घेत होते. पण मागच्या महिन्यात ते उपचारांसाठी सिंगापूरला गेले असता तिथल्या डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रांसप्लांटचा सल्ला दिला. रिपोर्टनुसार, किडनीच्या आजारा शिवाय त्यांना, डायबीटीस, हाय बीपी आणि हृदयविकाराचाही त्रास आहे. या वर्षी जुलैमध्ये घरात पडल्याने त्यांचे हाडही फ्रॅक्चर झाले होते.

किडनी ट्रांसप्लांटची गरज

NHS च्या मते, किडनीचे सर्वात महत्वाचे काम असते, रक्तातला कचरा फिल्टर करून मूत्राच्या मदतीने बाहेर टाकणे. पण जेव्हा दोन्ही किडनी यासाठीची क्षमता गमावू लागतात, तेव्हा घाणेरडे पदार्थ शरीरातच जमा होतात. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकत. किडनीची ही काम करण्याची क्षमता कमी होण याला एंड-स्टेज क्रॉनिक किडनी रोग म्हणतात. अशावेळी, डॉक्टर किडनी ट्रांसप्लांटची शिफारस करतात.

किडनी ट्रांसप्लांट करण्यासाठी किती खर्च येतो?

भारतात किडनी ट्रांसप्लांट करण्यासाठी अंदाजे खर्च 5 लाख ते 6 लाख असू शकतो. त्यानंतर महिन्याला 15 हजारांची औषधं साधारण आयुष्यभर लागू शकतात.

रोहिणी यांचे भावूक ट्वीट

रोहिणी यांनी माझे आई वडील माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते अशा आशयाच ट्वीट केल आहे; त्यांच म्हणण आहे की माझ्या वडिलांसाठी मी जे काही करते आहे, याला मी त्याग समजत नाही त्यामुळे कोणीही त्याच भांडवल करू नका आणि यापुढेही मी माझ्या वडिलांसाठी काहीही करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT