देश

हरियाणात भूस्खलन; अनेक लोकांसह गाड्या ढिगाऱ्याखाली, चौघांचा मृत्यू

घटनास्थळी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

निनाद कुलकर्णी

चंदीगढ - हरियाणा येथील भिवानी जिल्ह्यात डोंगराचा मोठा (Landslide At Bhiwani District Haryana) भाग खचल्याची घटना समोर आली आहे. यात साधारण आठ ते दहा वाहने (Many People Trapped In ) ढिगाऱ्याखाली दाबली गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले असून चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. (Some People Have Died In Landslide) घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर (Rescue Operations) सुरू करण्यात आले आहे. भिवानीच्या डाडम खाण परिसरात झालेल्या भूस्खलनाने मी दु:खी असून जलद बचाव कार्य आणि जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी आपण स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले आहे. (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar)

मिळालेल्या माहितीनुसार, डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्वरित मदतकार्याला सुरूवात केली आहे. याशिवाय कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी बेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Haryana Agriculture Minister JP Dalal reaches the spot) घटनास्ळळी डॉक्टरांची टीमही दाखल झाली असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत आम्ही शक्य तितक्या जणांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहोत,अशी माहिती जेपी दलाल यांनी दिली आहे. मात्र अद्याप यामध्ये किती जण अडकले आहेत किंवा किती जणांचा मृत्यू झाला आहे हे सांगणे अवघड असल्याचे दलाल यांनी सांगितले. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्यात सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असून याखाली नेमकं किती नागरिक अडकले आहेत याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, यामध्ये साधारण 12 पेक्षा अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे. हरित न्यायाधिकरणाच्या कठोर भूमिकेमुळे दादम परिसरातील डोंगरावरील खाणकाम प्रदुषणामुळे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी प्रदूषण विभागाने खाणकामासाठी वीज जोडणी दिली होती. क्रशर प्लांट पुन्हा सुरू होईल या अपेक्षेने येथे खाणकाम सुरू झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT