Supreme Court esakal
देश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाची नवीन वेबसाईट! महत्त्वपूर्ण निकालांचा सोप्या भाषेत सारांश वाचता येणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः आपल्या महत्त्वाच्या निकालांचा सारांश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन ‘वेब पेज’ सुरू केले आहे. ‘लँडमार्क जजमेंट समरीज’ (Landmark Judgment Summaries) असे त्याचे नाव आहे. नागरिकांना न्यायिक बाबींची माहिती देणे, विधि जागरूकतेला प्रोत्साहन आणि विधिप्रक्रियेत सजग नागरी सहभाग वाढवणे या उद्देशाने न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय नागरिकांना सहज समजावे हे ‘वेब पेज’ सुरू केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील निवेदनात नमूद केले आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा देशभरातील विविध क्षेत्रांवर परिणाम होतो. म्हणूनच न्यायालयीन निर्णय नागरिकाभिमुख होणे महत्त्वाचे आहे. मात्र, निकालपत्रातील जटिल कायदेशीर भाषा आणि निकालपत्र दीर्घ असल्याने नागरिकांना संबंधित निकाल समजून घेण्यास अडचणी येतात. तसेच महत्त्वाच्या बाबींसंदर्भात गैरसमजही होऊ शकतात. त्यामुळे सर्व जणांना न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय सहजपणे समजू शकतील, या हेतूने नवीन ‘वेब पेज’वर निसंदिग्ध, सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण निर्णयांचे अचूक सारांश प्रसिद्ध केले जातील. या पृष्ठावर सार्वजनिक हितसंबंध असलेल्या महत्त्वपूर्ण निकालांची वर्षनिहाय अद्ययावत यादी देण्यात आली आहे.

या निवेदनात असेही म्हंटले आहे, की प्रत्येक खटला त्याच्या विषयनिहाय वर्गीकृत केला असून, हा खटला कशाबद्दल आहे, याची एका ओळीत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक वाचकांना हवा असलेला खटल्याचा निकाल त्वरित शोधण्यास मदत होईल. तसेच या पृष्ठांवर संबंधित खटल्याचे उपलब्ध असल्यास चित्रीकरण, संपूर्ण निकाल, युक्तिवादाचा तपशीलवार नोंदी असल्यास त्याच्या थेट दुवे (लिंक) देण्यात आले आहेत.

वाचकांना खटल्याचा निकाल आणि न्यायालयीन युक्तिवाद या दोन्ही गोष्टी समजून घेता येतात, अशा रितीने या निकालांचा सारांश लिहिलेला आहे. नवीन निर्णयांचे सारांश, तसेच महत्त्वाच्या ऐतिहासिक निर्णयांचा समावेश करण्यासाठी हे पृष्ठ सातत्याने अद्ययावत केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या संशोधन आणि नियोजन केंद्राकडून हे सारांश तयार केले जात आहेत. आपला अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या जनसंपर्क वाढीच्या उद्दिष्टाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT