देश

पुष्पचक्र अर्पण करुन पंतप्रधान मोदींची लतादीदींना आदरांजली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सिने क्षेत्र, राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रातून त्यांच्या जाण्यानंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान-राष्ट्रपती यांच्यासह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही श्रद्धांजली व्यक्त केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोकाकूल होऊन ट्विट करत आदरांजली व्यक्त केली होती. तसेच आपण लवकरच शेवटची मानवंदना द्यायला मुंबईकडे रवाना होत असल्याचं कळवलं होतं. त्यानुसार पंतप्रधान मोदी आता मुंबईत दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्याच आली असून भाजपचे सर्व कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले आहेत. आज सायंकाळी लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार असून त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले आहेत. पंतप्रधान मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे.

ट्विटरवर काय म्हणाले PM मोदी?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लतादिदींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघणारी असल्याची पोस्ट केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, लता मंगेशकर यांच्या निधनाने झालेलं दु:ख शब्दांच्या पलिकडे आहेत. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगेशकर यांच्या आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय अशी क्षमता होती.

गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Passes Away)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

SCROLL FOR NEXT