जेष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज सकाळ ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. मागच्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy) रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली व्यक्त केली जाते आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनांतर आता देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (Govt Declares National Mourning For 2 Days)
दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयातउपचार सुरु होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.