रुपौली येथील JDU आमदार बिमा भारती यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक थोड्याच वेळात सुरु होणार आहे. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. दिल्ली हायकोर्टाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयन राजे भोसले आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट होणार होती, मात्र आता काही कारणास्तव ती लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.
कात्रज : महावितरणकडून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दक्षिण पुणे परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. गुरुवारी क्लोजर असल्याने पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी नागरिकांना शनिवारची वाट पाहावी लागली. त्यातच शनिवारी विजपुरवठा खंडित झाल्याने पुन्हा पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाने 22 मार्च रोजी दिलेल्या रिमांडच्या आदेशाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्याच्या कायदेशीर संघाचे म्हणणे आहे की दिल्ली उच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले आहे की अटक आणि रिमांड आदेश दोन्ही बेकायदेशीर आहेत आणि त्याला ताबडतोब कोठडीतून सोडण्याचा अधिकार आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्तींकडून शक्यतो रविवार 24 मार्चपर्यंत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीआरएस प्रमुख केसीआर यांनी पद्माराव गौड यांची सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारी विरोधात आबा बागुल यांनी पुण्यात आंलोदन केलं आहे.
सुधारणा | गुरुग्राम कोर्टाने YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला जामीन मंजूर केला. त्याला १७ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते आता काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. यातच आता प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे
बँक खाती गोठवल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर भाजप नेते संबित पात्रा म्हणाले, "सर्व राजकीय पक्षांना करात सूट मिळते. यात कोणत्याही पक्षाशी भेदभाव करता येत नाही. पण काँग्रेसची खाती का गोठवले जाईल'?. काँग्रेस पक्षाने टॅक्स रिटर्नची अंतिम मुदत 2017-18 मध्ये मुदत वाढवली. दुसरे म्हणजे, कोणताही राजकीय पक्ष 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख देणगी स्वीकारू शकत नाही. परंतु काँग्रेसने 14 लाख रुपये देणगी स्वीकारली होती.
इलेक्टोरल बाँड्सवर काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, "भाजप सरकारने खाजगी कंपन्यांचा वापर केला. या घोटाळ्याचे 4 मार्ग होते. पहिला होता, 'चंदा दो धंदा लो'. दुसरा मार्ग 'ठेका लो घुस दो', आधी कंत्राट मिळवा आणि मग लाच द्या, तिसरा मार्ग म्हणजे छापे, आधी ईडी-सीबीआय कंपन्यांना पाठवले जाते आणि ते टाळण्यासाठी या कंपन्या इलेक्टोरल बाँड खरेदी करतात. .आणि चौथा मार्ग म्हणजे कंपन्याचा वापर करणे"
सर्पदंश प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एल्विश यादवला अखेर जामीन मिळाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे. गुरुग्राम कोर्टाने YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला जामीन मंजूर केला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये 17 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
आप मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, "तुम्ही कोणत्या कायद्यानुसार आमच्या मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्यापासून रोखत आहात? तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय सर्व बाजूंनी सील कराल. आम्ही आतिशीच्या निवासस्थानी जात असताना आमची गाडी थांबवण्यात आली. आम्हाला आमच्या घरीही जाता येत नाही का? आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. निवडणूक आयोग निःपक्षपातीपणे काम करेल अशी आशा आहे."
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. फडणवीस यांच्या दिल्लीत दोन ते तीन बैठका. काही राजकीय तर काही कौटुंबिक भेटी असल्याची माहिती. फडणवीस दुपारनंतर अमित शाह यांचीही घेणार भेट.
दिल्लीच्या मद्य घोटाळा प्रकरण अटकेची कारवाई झालेल्या बीआरसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के. कविता यांच्या कोठडीत २६ मार्च पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २ दिवसांचा भूतान दौरा संपला आहे. त्यानंतर आता मोदी दिल्लीत दाखल झाले आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अजित पवारांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 26 मार्चला आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध पाटील अशी थेट लढत होणार आहे.
मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आज पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "मी केजरीवालला उघडं पाडेल. त्यांच्या टीमविरोधात मी अप्रूव्हर बनेल." असं तो म्हणाला.
खंडाळा ते वेळे मार्गावरील खंबाटकी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाँग वीकेंड आल्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी झाली आहे. सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू असून, ही कोंडी आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आपच्या मंत्री अतिशी यांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणी काही सवाल उपस्थित केले. ईडी म्हणत असल्याप्रमाणे जर घोटाळा झाला आहे, तर त्यातील पैसा कुठे गेला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भारतीय नौदलाने गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे 102 नागरिकांचा जीव वाचवला आहे. यामध्ये 27 पाकिस्तानी आणि 30 इराणी व्यक्तींचाही समावेश होता. समुद्री चाच्यांच्या तावडीतून या लोकांना नौदलाने वाचवले असल्याची माहिती समोर आली आहे.
INS कोलकाताने पकडलेल्या 35 सोमाली चाच्यांना आज मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. 16 मार्च रोजी त्यांना पकडण्यात आलं होतं.
शिवाजी आढळराव पाटील आज अअजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूरमधून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे.
माओवाद्यांच्या कट्टर जन मिलिशिया’ (समर्थक) पेका मादी पुंगाटी (वय ४९) याला माओवाद्यांच्या कट्टर जन मिलिशिया’ (समर्थक) पेका मादी पुंगाटी (वय ४९) याला गुरुवारी (ता.२१) पोलिसांनी अटक केली. एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करून त्याचा खून करण्यातही पेका पुंगाटीचा प्रत्यक्ष सहभाग होता, अशी पोलिसांची माहिती आहे. त्याच्यावर सरकारने १ लाख ५० हजारांचे बक्षिस जाहीर केले होते.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २४) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे.
महाविकास आघाडीचा आज जागा वाटप पुर्ण होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आजून याची आधिकृत घोषणा झालेली नाही.
इचलकरंजी : महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे २७ लाखांचा भरणा केल्यानंतर काल दुपारी दोन वाजता कृष्णा योजनेच्या मजरेवाडी उपसा केंद्राचे सील काढण्यात आले. त्यामुळे पूर्ववत पाणी उपसा सुरू करण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत ते पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते.
लखनौ : लोकसभा निवडणुकीसह उत्तर प्रदेशातील चार विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने (एसपी) शुक्रवारी तीन उमेदवारांची घोषणा केली. 'X' वरील पोस्टमध्ये, समाजवादी पक्षाने दादरौल विधानसभा मतदारसंघातून अवधेश कुमार वर्मा, गैंसरी विधानसभा मतदारसंघातून राकेश यादव आणि दुधी विधानसभा मतदारसंघातून विजय सिंह गोंड यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
Gangster Prasad Pujari : कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीचा मध्यरात्री 12 वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी ताबा घेतला. चीन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाला मजुरी दिली होती.
इचलकरंजी : येथे इंडिया आघाडीची आज (शनिवार) बैठक होत आहे. या बैठकीतील निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष असणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे बैठकीत कोणाच्या उमेदवारीची मागणी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये (Crocus City Hall) जमावावर पाच बंदुकधारींनी गोळीबार केला. यात किमान 70 लोक ठार झाले असून 115 जण जखमी झालेत. रशियन आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख मुराश्को यांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल 115 लोकांपैकी 60 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे.
Latest Marathi News Live Update : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच मद्य धोरण गैरव्यवहाराचे सूत्रधार असून यामध्ये त्यांचे सहकारी मंत्री आणि ‘आप’च्या नेत्यांचा देखील समावेश असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात केला. तपास संस्थेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना येत्या २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली. तसेच महायुतीत भाजपकडून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीची रणनीती आखली जात असताना महाविकास आघाडीतील पक्षांची मात्र निवडून येण्याच्या निकषापेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ चालल्याचे चित्र दिसत आहे. भारताचे पहिले स्वदेशी अवकाशयान (स्पेस शटल) ‘पुष्पक’ची सलग दुसऱ्यांदा यशस्वी लॅंडिंग करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इचलकरंजीत इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.