Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय.

सकाळ डिजिटल टीम

अरविंद केजरीवालांचा दिल्लीत रोड शो

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूर्व दिल्लीतील लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ कृष्णा नगरमध्ये रोड शो केला.

वाराणसीत गंगा आरतीसाठी अमित शाहांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीला हजेरी लावली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित होते.

पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

पुणे शहरातील शिवाजी नगर, औंध, बाणेर, सांगवी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

धानोरी, मुंढवा केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असून घोरपडीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. तसेच लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना पोलिसांची नोटीस

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना नोटीस बजावली आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६५.६८ टक्के मतदान

केजरीवालांनंतर सोरेन यांना दिलासा मिळणार का? १३ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

"या देशातून आता पुन्हा स्थलांतर होणार नाही"; ओवैसींचा मोदी-शहांवर हल्लाबोल

चाकण परिसरात जोदार पावसाला सुरुवात; अजित पवारांच्या सभेत पावसाचा व्यत्यय

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात जोदार पावसाला सुरुवात. याठिकाणी शिरुर लोकसभा मतदरसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आयोजित करण्यात आली होती. पण अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं सभास्थळी सर्वत्र पाणी साचलं आहे. त्यामुळं ही सभा होते की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही - फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपल्यासोबत येण्याची कुठलीही ऑफर दिलेली नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

Weather Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

Weather Update: पुढील तीन तासात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज सतर्क या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं वर्तवला आहे.

Arvind Kejriwal: दिल्लीतील हनुमान मंदिरात अरविंद केजरीवाल यांनी घेतलं दर्शन

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (11 मे) दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते.

Amit Shah: मोदींनी तेलंगणाला मोठा निधी दिलाय, पण लोकांना तो मिळत नाहीये- अमित शहा

पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणा राज्याला मोठा निधी दिला आहे. पण, तो येथील लोकांना मिळत नाहीये, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. एका सभेत ते बोलत होते.

राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आहे. आज मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. 11,12,13 तीन दिवस लागोपाठ पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट दिसून येईल.

कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांचा चोप

कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांचा चोप देण्यात आला आहे. ही घटना शाहुपूरी परिसरात घडली आहे. लॉ कॉलेज समोर लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांना जमावाकडून चोप देण्यात आला. तर एक संशयित आरोपी फरार आहे तर दुसरा पोलिसांच्या ताब्यात आहे.

CM शिंदे श्रीरंग बारणेंच्या प्रचारात सहभागी; आज प्रचाराचा शेवटचा दिवस

राज्यातील चौथ्या टप्यातील निवडणुका १३ तारखेला होणार आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आज प्रचारांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

राज ठाकरेंची उद्या ठाण्यात सभा; मनसे कार्यकर्ते आनंद नगर चेकनाका येथे करणार स्वागत करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात सभेसाठी येणार आहेत. मनसे कार्यकर्ते त्यांचे आनंद नगर चेकनाका या ठिकाणी स्वागत करणार आहेत. त्यांनंतर मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. राज ठाकरे हे आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंद मठ या ठिकाणी दर्शन घेऊन खारे गाव या ठिकाणी रवाना होणार आहेत.

संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

Mumbai Goa Highway Traffic- मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून ७ ते ८ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मंदिरात केली पूजा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मंदिरात पूजा केली.

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचले.

Pune Rain: पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या

  • पुण्यात गेले दिवसात झालेल्या पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या

  • पुण्यात गेल्या १० दिवसात एक ते दहा मे दरम्यान अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात शहर परिसरात झाडपडीच्या एकुण ९६ घटनांची नोंद झाली आहे.

  • मागील दोन दिवसात ५४ झाडे पडली असून जवानांनी घटनास्थळी पोहोचत तत्परतेने आपले कर्तव्य बजावले आहे

  • अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी जाऊन या घटनांची केली नोंद

PM Modi: 26 वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आजच्याच दिवशी 26 वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती... एक तो दिवस होता जेव्हा भारताने आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली होती आणि दुसरीकडे काँग्रेसची विचारसरणी होती जी लोकांना पुन्हा पुन्हा घाबरवण्याचा प्रयत्न करते."

Raj Thackeray: राज ठाकरे हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला; राज्यातील राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा

हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा झाली. काल राज ठाकरे यांची पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती.

Weather Forecast : पुढील 3 तासांत 'या' राज्यांमध्ये पडणार पाऊस

पुढील 3 तासांत उत्तराखंड, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता: भारतीय हवामान विभाग

Kearala: 20 सोन्याचे बार जप्त

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर AIU (एअर इंटेलिजन्स युनिट) च्या अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला अडवले. प्रवाशाच्या तपासणीदरम्यान, प्रवाशाने परिधान केलेल्या जीन्सच्या कमरेभोवती खास शिवलेल्या पोकळीत लपवून ठेवलेले 2332.80 ग्रॅम वजनाचे 20 सोन्याचे बार जप्त करण्यात आले.

Delhi CM: हनुमान पूजा, पत्रकार परिषद आणि मेगा रोड शो; केजरीवाल उडवणार प्रचाराचा धुरळा

मुख्यमंत्री केजरीवाल शनिवारी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिरात पूजा करणार आहेत. दुपारी एक वाजता पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.

यानंतर केजरीवाल शनिवारी दक्षिण दिल्लीतील रोड शो ने निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.

Mumbai News: मुंबईत 11.62 किलो सोने जप्त

7 ते 9 मे या कालावधीत मुंबई कस्टम्स विभागाने 7.44 कोटी रुपयांचे 11.62 किलो सोने आणि आयफोन जप्त केले आहेत. 18 प्रकरणात सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

NDA Pune: पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान BDDS पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे.

Jharkhand Lok Sabha : PM मोदी आज झारखंड दौऱ्यावर; मुरवेत सभेला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी आज (शनिवार) निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी झारखंडमधील सिमरियाच्या मुरवे येथे येत आहेत. मुरवे येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एसपीजीने घटनास्थळ आपल्या सुरक्षेखाली घेतले आहे. कोणत्याही व्यक्तीला कार्यक्रमस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज सकाळी ६.१६ वाजता अफगाणिस्तानात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. यापूर्वीही अफगाणिस्तानाला भूकंपाने हादरवून सोडले आहे.

Meteorological Department : पुढील तीन तासांत उत्तराखंड, तामिळनाडूसह राजस्थानात पावसाची शक्यता

पुढील तीन तासांत उत्तराखंड, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागांत हवामान ढगाळ असणार आहे.

Chhattisgarh Bijapur : विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी सहा नक्षलवाद्यांचा केला खात्मा

विजापूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात जवानांबरोबर झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले. पिदीया गावानजीकच्या जंगलात नक्षलवादविरोधी मोहीम सुरू असताना ही चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमक झाली त्या ठिकाणाहून पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या भागात तपास मोहीम सुरू आहे. मागील महिन्यात कांकेर जिल्ह्यातील कारवाईत जवानांनी २९ नक्षलवाद्यांना ठार मारले होते.

Belgaum Shiv Jayanti : बेळगावात शिवजयंतीनिमित्त आज चित्ररथ मिरवणूक

बेळगाव : शिवजयंतीनिमित्त आज (ता. ११) भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौक येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाच्यावतीने पालखी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तसेच शहर आणि परिसरात चित्ररथ मिरवणूक काढण्याची तयारी पूर्ण झाली असून, मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक परिसरात गॅलरी उभारण्यात आली आहे.

Agricultural Services Examination : कृषी सेवा परीक्षेत महिला प्रवर्गातून कागलच्या सायली फासके प्रथम

बिद्री : महाराष्ट्र लोकसेवा आयेगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात उंदरवाडी (ता. कागल) येथील सायली साताप्पा फासके या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या. एमपीएससीच्या वतीने कृषी सेवा २०० जागांसाठी जाहिरात करण्यात आली. मे २०२३ मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पडली, त्यानंतर ९ मे २०२४ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

Maval Lok Sabha : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री शिंदेंचा पिंपरी-चिंचवड शहरात रोड शो

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे-आरपीआय- रासप-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे. त्यानंतर महायुतीचे मावळ मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बारणे यांच्या प्रचाराची सांगता होईल.

CM Arvind Kejriwal : मुख्यमंत्री केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. १०) जन्मठेप व प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षाही सुनावली. सबळ पुराव्याअभावी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. तसेच बहुचर्चित कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर तिहार कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आलीये. आज त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुण्यासह १९ जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलाय. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही खात्याने दिलाय. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT