Latest Marathi News Live Update  Esakal
देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केवळ ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवारी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाडोत्री जनता पार्टीला धडा शिकवा- उद्धव ठाकरे

उत्तर-पश्चिम मुंबईच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा भाडोत्री जनता पक्ष असा उल्लेख केला. भाजपमध्ये सध्या बाहेरचे लोकच जास्त आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंचा उत्तर-पश्चिम मुंबईत दौरा, वायकरांची उपस्थिती

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा उत्तर-पश्चिम मुंबईत दौरा असून त्यांच्या दौऱ्यामध्ये रवींद्र वायकर यांची उपस्थिती आहे. वायकर हे शिंदे गटामध्ये जाणार अशी चर्चा होती, मात्र ते उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासाठी हजर होते.

चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी

आंध्र प्रदेशमध्ये भाजपला नवा मित्रपक्ष भेटला असून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा TDP NDA मध्ये सामील झाला आहे. पवन कल्याण यांचा जनसेना पक्षही NDA मध्ये सामील झाला आहे.

जलशक्ती अभियान ७०० जिल्ह्यांमध्ये राबवणार- मंत्री शेखावत

'जल शक्ती अभियान' लाँच केल्यानंतर केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत म्हणाले की, आम्ही जल शक्ती अभियान मातृशक्तीला समर्पित केले आहे आणि त्याला 'नारी शक्ती से जल शक्ती' असे म्हटले आहे. आम्ही हे अभियान देशातील सर्व 700 जिल्ह्यांमध्ये राबवू. ज्या देशात आम्ही पाण्याच्या पारंपारिक स्त्रोतांसाठी काम करू.

Lok Sabah Election 2024 : अखेर ठरलं! तेलुगु देसम पार्टी एनडीएमध्ये होणार सामील

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) एनडीएमध्ये सामील होणार असल्याचे निश्चित झाले आहे. टीडीपी खासदार कनकमेडला रवींद्र कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Sharad Pawar : शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या भेटीला गेले आहेत. आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात असलेले दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची उतार वयात राजकारणासाठी होणा-या भेटीमुळे तालुक्याच्या राजकारणातील फेरबदलाचे वारे थंडवण्याचे संकेत मिळत आहेत. माळवाडी ता. भोर येथील आनंदराव थोपटे यांच्या निवासस्थानी शरद पवार काही मिनिटांमध्येच पोहोचणार आहेत.

PM मोदींकडून सिलीगुडी येथे अनेक विकासकामांचं उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.

सातारा, बीड लोकसभेच्या जागेबाबत आमची चर्चा झाली - जयंत पाटील

सातारा, बीड लोकसभेच्या जागेबाबत आमची चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंचा १४ मार्चला रत्नागिरी दौरा

उद्धव ठाकरे १४ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी दापोली आणि गुहागरमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं तीन-चार दिवसांत जाहीर करणार - आंबेडकर 

महाविकास आघाडी आणि मविआतील धुसफूस अद्याप सुरुच आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमधील सुपारीबाजांची नाव तीन-चार दिवसांत जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींनी केले सेला बोगद्याचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इटानगर येथे आयोजित कार्यक्रमात सामरिक सेला बोगदा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.

Shirdi Spiritual Tourism: देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे

 देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत शिर्डीच्या सर्वांगीण विकासाला गती येईल, असा आशावाद आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

Gadchiroli Murder Case: गडचिरोलीत झालेल्या निर्घृण हत्येचा पर्दाफाश

कोणताही दुवा न सोडता अतिशय शिताफीने झालेल्या हत्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी कौशल्याने तपास करून अखेर अटक केली आहे. विकास जनार्दन बोरकर (वय ५०) रा. कुरूड ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे, तर प्रदीप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (वय ३०) रा. कुरूड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे मृताचे नाव आहे.

Kokan Railway: कोकणात होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या!

कोकणात मोठ्या प्रमाणात होळी उत्सव साजरा होतो. यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उधना जंक्शन ते मंगळुरू आणि सुरत ते करमाळी या मार्गावर या गाड्या २० ते २५ मार्च या कालावधीसाठी धावणार आहेत. 

Raj Thackeray In Nashik: छत्रपतींच्या 'त्या' पुतळ्याचे काय झाले? - राज ठाकरे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन मुंबईच्या अरबी समुद्रात फुलं वाहिली पण पुढे शिवाजी महाराजांच्या त्या  पुतळ्याचे काय झाले? असा सवाल  राज ठाकरे  यांनी नाशिकमध्ये विचारला

PM Modi: ईशान्य भारत दक्षिण आशिया, पूर्व आशिया सोबतच्या व्यापारासाठी मजबूत कॉरिडॉर

इटानगर येथे ईशान्येकडील विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, एकेकाळी दुर्लक्षित असलेला हा प्रदेश दक्षिण आशिया आणि पूर्वेकडील व्यापारासाठी एक मजबूत आणि समृद्ध कॉरिडॉर म्हणून वेगाने उदयास येत आहे

Raj Thackeray: राज ठाकरे दादासाहेब गायकवाड सभागृहात पोहोचले, मनसेचा आज वर्धापनदिन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात पोहोचले असून लवकरच त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल.

PM Narendra Modi: काँग्रेसला २० वर्षे लागली असती आम्ही पाच वर्षात केलं- नरेंद्र मोदी

भाजपने जे ५ वर्षात केलं आहे, ते करण्यासाठी काँग्रेसला २० वर्षे लागले असते, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सभेला संबोधित करत होते.

Latest Marathi News: पंतप्रधान मोदींची हत्तीवर बसून जंगल सफारी; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी हत्तीवर बसून जंगल सफारी केली आहे.

Bhopal: भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली आहे. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे मोठं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येतं आहे. अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले असून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Suresh Pachouri: मध्य प्रदेशातील माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशातील माजी केंद्रीय मंत्री सुरेश पंचौरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये मी समाजकारणासाठी आलो होते, पण तिथे सध्या हे होताना दिसत नाही.

Sanjay Raut: कारवायांद्वारे भाजपला लोकसभा जिंकायची आहे- संजय राऊत

दिल्लीच्या जुलमापुढे महाराष्ट्र झुकणार नाही. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये सर्व साफ होतं. कारवायांसमोर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी गुडघे टेकले. तुम्ही दिल्लीतील भांडी घासत बसा, असं संजय राऊत म्हणाले.

जेएनयूमध्ये विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल

जेएनयूमध्ये एका महिला विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ही घटना गुरुवार, ७ मार्च रोजी घडली. जेएनयू प्रशासनाने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू : दिल्ली पोलिस

नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पंतप्रधानांनी येथे हत्ती सफारीही घेतली.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुरेश पचौरी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेसला धक्क्यावर धक्के देत आहे. आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुरेश पचौरी आज मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.

Kaziranga National Park : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 मार्चपासून आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते 18 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. आज त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. 8 मार्चच्या संध्याकाळी पीएम मोदी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये थांबले होते. पंतप्रधान मोदी येथे जवळपास दोन तास थांबणार आहेत. यानंतर ते अरुणाचल प्रदेशला रवाना होतील.

Amit Shah : महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात यश; अमित शाहांसोबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक

महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात यश आले आहे. मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यात जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे.

Weather Update : मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज

Weather Update : भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. येत्या 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये ढगाळ वातावरण राहील. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून चार कामगार जखमी

मोरबी (गुजरात) : गुजरातच्या मोरबी इथं शुक्रवारी संध्याकाळी एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा भाग कोसळल्याने चार कामगार जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भरावाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या या घटनेत किमान चार कामगार जखमी झाले आहेत.

Rameswaram Cafe Bomb Blast Case : बाॅम्बस्फोटानंतर 8 दिवसांनी रामेश्वरम कॅफे ग्राहकांसाठी खुले

बंगळुरू (कर्नाटक) : रामेश्वरम कॅफेमध्ये ग्राहकांची तपासणी केली जात आहे. स्फोटानंतर 8 दिवसांनी कॅफे लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. दरम्यान, रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणाचा (Rameswaram Cafe Bomb Blast Case) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) तीव्र केला असून बाॅम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या संदर्भात माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Presidential Election : पाकिस्तानमध्ये आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक; आसिफ अली झरदारी यांचा विजय जवळपास निश्चित!

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. जर झरदारी निवडणुकीत विजयी झाले तर ते पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती असतील. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला आहे. आता पाकिस्तानला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. उद्योग व्यवसायातून राजकारणी झालेले आसिफ अली झरदारी हे दिवंगत नेत्या बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम, अरुणाचल, बंगालसह यूपीच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम, अरुणाचल, बंगाल आणि यूपीच्या दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी 5.45 वाजता पंतप्रधान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. यानंतर ते अरुणाचलची राजधानी इटानगर येथे जातील आणि तेथील कार्यक्रमात सहभागी होतील. यादरम्यान मोदी अरुणाचल प्रदेशात 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करतील. चीनच्या सीमेजवळ असलेला हा बोगदा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुपारी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल आणि नंतर उत्तर प्रदेशला जाणार आहेत. संध्याकाळी ते वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करतील.

CM शिंदेंच्या हस्ते जलपर्यटन प्रकल्पाचे मुनावळेत आज भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केवळ ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात राहुल गांधी यांना अपेक्षेप्रमाणे वायनाडमधून, तर डॉ. शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांविरोधातील कारवाई थांबविण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका प्राप्तिकर अपिलीय लवादाने फेटाळून लावली आहे. दरे (ता. महाबळेश्वर) येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण, तसेच मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन, शिद्रुकवाडी येथील दरडग्रस्‍त गावांच्या पुनर्वसन कामाचा प्रारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. या निमित्ताने १७ मार्चला सभा होणार आहे. राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पण, ओबीसीतून आरक्षण घेण्याबाबत निर्णय ठाम आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT