जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे झेलम नदीत 9 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेत 7 जण बचावले असून 2 जण बेपत्ता आहेत. बचाव कार्य चालू आहे.
''नागरिकांनी आणि मतदारांनी विरुद्ध बाजूच्या भावनिक आवाहनांना बळी पडू नये. आपल्यासाठी कोण काम करेल, कोण करू शकेल याचा त्यांनी विचार केला पाहिजे... मला वाटते मतदारांनी आमचे ऐकले आहे आणि बारामतीतून आमचाच उमेदवार विजयी होईल.'' असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. २७४ पदांसाठी २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षा घेण्याचे नियोजित होते. परंतु राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र १० टक्के आरक्षण देऊ केले. त्यामुळे ही परीक्षा ६ जुलै रोजी होणार आहे.
राज्यामध्ये अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. ४० अंशांच्या वर ऊन वाढल्याने दुर्दैवी घटना घडत आहेत. आडगावात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (NDR) सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण भारतातील ऑपरेशनमध्ये नऊ गुन्हेगार आणि एका अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
ही कारवाई दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, यूपी आणि बिहारमध्ये करण्यात आली; 7 शस्त्रे जप्त.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरण: सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आदेश देऊ शकते.
पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली आहे. नाकाबंदी दरम्यान व्हनच्या तपासणीत हे पैसे आढळले. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम जप्त करण्यात आली.
आज 3 वाजून १८ मिनिटांनी सौराष्ट्रातील तलालाच्या उत्तर-ईशान्य 12 किमी अंतरावर रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला, गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाही ही माहिती दिली आहे.
जेडी(एस) नेता एचडी रेवण्णाला 14 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. किडनॅपिंग प्रकरणी केस दाखल झाल्यानंतर त्याला 4 मे रोजी SIT अधिकाऱ्यांनी अटक केली होती.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चारधाम यात्रेबाबत मोठी अपडेट दिली आहे. 10 मे या दिवशी चारधाम यात्रेला सुरुवात होईल. याबाबतची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासन सज्ज असल्याचं ते म्हणाले.
जळगावच्या पाचोऱ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीला गिरीश महाजन, अनिल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित आहेत.
सॅम पित्रोदांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सध्या भरपूर गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी देखील काँग्रेसवर याबाबत टीका केली आहे. प्रियांका गांधी यांना याबाबत विचारलं असता, त्या म्हणाल्या; "अशा फालतू गोष्टींवर मोदी नक्कीच फुलटॉस खेळतील. मात्र त्यांनी बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचाराबाबत बोलून दाखवावं असं मी आव्हान देते."
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे.
असा आहे निवडणुक कार्यक्रम
१५ ते २२ मे - अर्ज दाखल करण्याची मुदत
२४ मे - अर्जाची छाननी
२७ मे - माघार घेण्याची मुदत
१० जून - मतदान
१३ जून - मतमोजणी
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सॅम पित्रोदा हे राहुल गांधींची गुरू आहेत. ते कधी शिव्या देतात, तर कधी उत्तर-दक्षिण भारत वेगळा करण्याची भाषा करतात. राहुल गांधी अन् प्रियांका गांधींनी सॅम यांच्या वक्तव्याबाबत देशाची माफी मागावी असं गिरीराज म्हणाले.
MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत अहवाल मागवला आहे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगितले आहे. तसेच, डीजीसीएच्या निकषांनुसार प्रवाशांना सुविधा देण्याची त्यांना सूचना देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला. देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालं. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात झालं होतं. मतदान कमी झाल्याची आपल्याला चिंता नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे मतदान चांगलं असल्याचंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी आज वारंगळमध्ये प्रचारसभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालं आहे की जनता भाजपचा विजय रथ पुढे नेत आहे. काँग्रेसला तर मॅग्नेफाईन ग्लास घेऊन सीट्स शोधाव्या लागत आहेत; असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. "भाजप उमेदवार ठिकठिकाणी जाऊन सांगत होते, की ते संविधान बदलून टाकतील. मात्र जेव्हा मोदींच्या लक्षात आलं की याचा निवडणुकीत फटका बसतोय तेव्हा त्यांनी असं नसल्याचं म्हटलं. पण तुम्हाला तर खरं माहितीच आहे.." असं त्या म्हणाल्या.
केरळमधील पलक्कड जिल्ह्यात बुधवारी जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका आघाडीच्या मल्याळम वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. कसाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांजीकोडेजवळील पनामरक्कड येथे मातृभूमी न्यूजमध्ये काम करणारे ए व्ही मुकेश (३४) हे हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अभिनेता राजकुमार राव यांनी विकसित भारत यात्रेदरम्यान लोकांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अरविंद सावंत पंतप्रधान मोदींच्या 'राम मंदिरावर बाबरी लॉक' या वक्तव्यावर म्हणाले, की "मला वाटतं पंतप्रधान मोदी हे विसरले आहेत की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाली होती."
नवी दिल्लीतून विमान प्रवाशांच्या दृष्टीने चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण एअर इंडियाची 70 हून अधि उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कृ मेंबर्सनी अचानक सामूहिक सुट्टी घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज जालन्यात सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे.
नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा होणार आहे. महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे.
शिवाजी पार्क येथे १७ मे रोजी सभा घेण्यासाठी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने अर्ज केला आहे. त्यामुळे महापालिका कोणाला परवानगी देते हे पाहावं लागेल.
चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या राज्यात काही ठिकाणी सभा होणार आहेत. मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने सुरू आहेत. सकाळच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्या मुळे प्रवासाचे हाल होत आहेत. याचा चर्चगेट कडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशी रेल्वे ट्रॅक वरून चालत आहेत.
पाटणा : चंचल मिश्रा RJD मध्ये सामील झाल्यामुळे बहुजन समाज पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. बसपाचे प्रदेश सरचिटणीस चंचल मिश्रा यांनी सोमवारी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रीय जनता दलाचे सदस्यत्व घेतले. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी त्यांना सदस्यत्व बहाल केले.
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील १३ उमेदवारांचे भवितव्य काल (ता. ७) मतदार यंत्रणेत बंद झाले. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७१.४९ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ६६.५९ टक्के मतदानाची नोंद होती. यावेळी चार टक्के वाढीव मतदानाची नोंद झाली आहे. यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे, हे चार जून रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
नोएडा : आम आदमी पार्टी (आप) दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या मुलाने पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. एडीसीपी मनीष मिश्रा म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली की आम आदमी पार्टी (आप) दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या मुलाने पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.
बेळगाव : दहावीचा निकाल गुरुवारी (ता. ९) जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले होते. तसेच पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला आठ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, शिक्षक निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे एक दिवस विलंबाने निकाल जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्रात शेवटच्या दोन टप्प्यात शिल्लक राहिलेल्या २४ जागांपैकी काँग्रेस फक्त सहा जागा लढवत आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात काँग्रेस पुणे, जालना आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी पुण्यात सभा घेतलीये. प्रियांका गांधी 10 मे रोजी नंदुरबारमध्ये प्रचार करणार आहेत. तर, पाचव्या टप्प्यात पक्ष उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि मुंबई या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. येथे प्रचारासाठी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १५ मे रोजी रॅली काढू शकतात.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी येथे आज पहाटे ४:५५ वाजता ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने जाहीर केली आहे.
Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील ११ मतदारसंघांसह देशभरात एकूण १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेश मिळून ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. सातारा लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे ६३.०७ टक्के मतदान झाले. तर, माढ्यासाठी ५९.८७ टक्के, सोलापू्रसाठी ५७.४ टक्के मतदान झाले. धाराशिव लोकसभेसाठी झालेल्या ६०.४१ टक्के मतदानात बार्शी विधानसभेत सर्वाधिक ६४.९५ टक्के मतदान झाले. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघातही चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकात दहावीचा निकाल गुरुवारी (ता. ९) जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.