केंद्रीय मंत्री आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी म्हणाल्या की, जे लोक सध्या संपूर्ण देशातील शेतकऱ्यांबद्दल बोलतात, त्यांनी गौरीगंज विधानसभेत शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आहेत. मी गेल्या 10 वर्षांपासून जमिनी परत करण्याची विनंती करत आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी स्वत: त्या फाऊंडेशनमध्ये आहेत.
जपानच्या शिकोकू परिसरामध्ये ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे जाणवले आहेत.
माढ्याची लढत अवघड नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार आज दुपारी 3 वाजता ईशान्येकडील भागात संपला आणि इतर भागात संध्याकाळी 6 वाजता संपला: भारत निवडणूक आयोग
पश्चिम बंगाल: कोलकाता येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी टीएमसीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील महायुतीमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी लोकसभा प्रभारी मैदानात उतरले आहेत. भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे उद्या दिनेश शर्मा महायुतीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहेत. त्यातच उत्तर पश्चिम मतदार संघामध्ये महायुतीकडून उमेदवार ठरला नसल्याने भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा आढावा घेणार आहेत
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडासह पाऊस झाला. अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी साठवलेले कांदे तसेच गहू हे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळासह पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी येथे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हातकणंगलेत मुसळधार पाऊस झाला. यानंतर गेली महिनाभर उकाड्यांना हैराण झालेल्या जयसिंगपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर असून हातकणंगले आणि जयसिंगपूर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याचे पाहाचला मिळाले
जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काश्मिरी पंडितांनी रामनवमी ‘शोभा यात्रा’ आयोजित केली होते.
कर्नाटकातील मंड्या येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "मी कर्नाटकातील बेरोजगार तरुणांना सांगण्यासाठी आलो आहे, काँग्रेस पक्ष तुमच्यासाठी एक ऐतिहासिक काम करणार आहे, या योजनेचे नाव आहे 'पहेली नौकरी पक्की'. याचा अर्थ, जे तरुण बेरोजगार आहेत, काँग्रेस त्यांना पहिल्या नोकरीचा अधिकार देणार आहे, जर तुम्ही डिप्लोमाधारक असाल किंवा महाविद्यालयातून पदवीधर असाल, तर काँग्रेस पक्ष तुम्हाला पहिल्या नोकरीचा अधिकार देणार आहे."
आज महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या अशा वसंतदादा कुटुंबीयांना काँग्रेसने आघाडीसाठी जी वागणूक दिली आहे ती खेदजनक आहे. काँग्रेसने विशाल पाटील यांना तिकीट देऊन वसंतदादा कुटुंबियांचा सन्मान करायला हवा होता. मात्र, त्यांच्यावर आघाडीच्या कारणास्तव अन्याय केला गेला. आम्ही एक वसंतदादा कुटुंबीयांचे स्नेही म्हणून हा अन्याय सहन करू शकत नाही. यासाठी आम्ही विशाल पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या रिपब्लिक पक्ष इंडिया या पक्षाचे जेवढे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक असतील त्यांचा संपूर्ण पाठिंबा विशाल पाटील यांना असेल मी स्वतः त्यांच्या प्रचाराला सांगली लोकसभा मतदारसंघात येणार आहे. अशी माहिती डॉ. राजेंद्र गवई (महासचिव आरपीआय) यांनी दिली.
थोड्याच वेळात राहुल शेवाळे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत आहेत. ते अयोध्येतील श्री राम मंदिरातील सं-महंतांनी अभिमंत्रित करून दिलेले धनुष्यबाण घेऊन येत आहेत.
भारतीय हवाई दलाच्या An-32 वाहतूक विमानाने आज दोन नागरी रुग्णांना कारगिलहून श्रीनगरला पोहचवले. या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती, त्यांनी स्थानिक नागरी प्रशासनामार्फत IAF ची मदत मागितली होती.
आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे इतके आरोप झाले, त्यांच्याविरुद्ध सर्व आरोपपत्रे भाजपने दाखल केली. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना थोडी निष्ठा दाखवावी लागणार आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना काहीही म्हणो, पण ते सर्व देशाचे नेते आहेत आणि त्यांचे आव्हान तुमच्यासमोर आहे- शिवसेना (UBT) नेते संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की: "नलबारी सभेनंतर, मला अयोध्येतील रामललाच्या सूर्य टिळकच्या अद्भुत आणि अद्वितीय क्षणाचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे.''
पुण्यातील बावधन परिसरात प्रचार दौऱ्यावर असताना परिसरातील विठ्ठल मंदिरात पार्थ पवार दर्शनासाठी गेले होते. रामनवमी निमित्त मंदिर परिसरातील भक्तांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भक्तांसोबत पवारांनी देखील भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि विठ्ठल मंदिरातील सर्व भक्तगण उपस्थित होते.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. आमचं सरकार स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांमध्ये याठिकाणी 80 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. तसंच, सुमारे 125 नक्षलवाद्यांना अटक केली असून, 150हून अधिक स्वतः शरण आले आहेत असंही शहा म्हणाले.
दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार अनुपस्थित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोरया केमिकल कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास ही आग लागलीये. आग लागल्यानंतर केमिकलचा कंपनीत मोठा स्फोट झाला.
राम मंदिर झालं आता पुढचं काम महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यायची आहे, असं जगदगुरु परमहंस आचार्य यांनी म्हटलं आहे.
भिवंडी येथून मुंबईकडे येणारी वाहतूक ठाणे येथे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. भिवंडी येथून येणाऱ्या मार्गावर मुंबई ठाण्याला जोडणारा ठाण्यातील कापूरबावडी येथील उड्डाणपूल दुरुस्तीकरिता बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. भिवंडी येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ठाणे येथे वाहतूक कोंडी झाली.
आम आमदी पक्षाकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम राज्याच्या थीमवर आधारित वेबसाईट लाँच करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी एका रॅलीत काँग्रेससंबंधात केलेल्या टिप्पणीप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून धमकी मिळाली आहे. खडसे यांनी याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्या दिल्या आहेत. राम लल्ला मंदिरात विराजमान झाले आहेत. रामनवमीच्या दिवशी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अयोध्या सजली आहे. पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला हा आनंद साजरा करण्याचे भाग्य मिळालं आहे, असं मोदी म्हणाले.
ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी JMM नेते अंतू तिर्की, प्रियरंजन सहाय, रिअल इस्टेट व्यापारी विपिन सिंग आणि इर्शाद या चार जणांना अटक केली आहे. काल त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा रांची येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने शहरवासीय हैराण झाले असून, आज तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचलाय. गेले काही दिवस वातावरणात कमालीचा उकाडा आहे. पाच एप्रिलला, तर तापमान ४०.२ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर ते कमी झाले. मात्र, दोन दिवसांत पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. याशिवाय, नागरिकांतून ताक, लिंबू सरबत, कलिंगडावर भर दिला जात आहे.
पुरी, ओडिशा : वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी रामनवमीनिमित्त भगवान रामाचे वाळूच्या सहाय्याने शिल्प बनवले आहे.
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी काल जाहीर झाली. उद्या गुरुवारी (ता. १८) जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या ‘मुख्य नागरी सेवा परीक्षा २०२३’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात आदित्य श्रीवास्तव यांनी देशात पहिला क्रमांक पटकाविला; तर अनिमेश प्रधान यांनी दुसरे आणि डोनरू अनन्या रेड्डी यांनी तिसरे स्थान पटकाविले. महाराष्ट्रातील कुश मोटवानी यांनी ११ वे स्थान पटकाविले असून ते राज्यात पहिले आले आहेत.
‘प्रभू श्री रामचंद्र की जय’ अशा जयघोषासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी देशभरात आज (बुधवारी) रामनवमी साजरी होणार आहे. यानिमित्ताने विविध स्पर्धा, पालखी सोहळा आदी उपक्रम होणार आहेत.
Latest Marathi News Live Update : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाबरोबर (बीएसएफ) झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले. त्यात नक्षलवाद्यांचा म्होरक्या शंकर रावही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली. गुरुवारी (ता. १८) जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उन्हाच्या तडाख्याने शहरवासीय हैराण झाले असून, कोल्हापूरचा तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी (ता. १९) होणार आहे. यासाठीच्या राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा आज (ता. १७) शांत होतील. त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. रेहमान यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या ‘मुख्य नागरी सेवा परीक्षा २०२३’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात आदित्य श्रीवास्तव यांनी देशात पहिला क्रमांक पटकाविला; तर अनिमेश प्रधान यांनी दुसरे आणि डोनरू अनन्या रेड्डी यांनी तिसरे स्थान पटकाविले. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.