पुणे : डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने गुरुवारी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Pune News: केंद्र सरकारच्या योजनेतून पुणे शहरा पूर स्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केली जाणार असून, त्या कामाच्या ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली.
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
भारतात घुसखोरी केल्याबद्दल खटला सुरू असलेले बांगलादेशी घुसखोर नव्या नावाने पुन्हा मुंबईत स्थायिक झाले, त्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले आणि रिक्षा चालक, इलेक्ट्रिशिअन, भाजीवाला म्हणून मुंबईकरांच्या घरादारात त्यांचा सहजपणे वावरही सुरू आहे, अशी धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या(एटीएस) तपासातून पुढे आली.
राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती व पर्जन्यमानाबाबत आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, कृषी मंत्री धनंजय मुंडे, एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव नितीन करीर तसेच राज्य प्रशासनातील सर्व विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रशासकीय अधिकारी हेदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ जून रोजी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत: मुख्यमंत्री कार्यालय
मुंबई एटीएसने बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. चौघांनाही आज माझगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर चौथ्याला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.
नागपुरात 300 कोटीच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेने सासऱ्याच्या हत्येची 1 कोटी रुपयांत दिल्याची माहिती समोर आली आहे. मारणाऱ्याला 1 कोटी सोबतच बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचे देखील आमिष देण्यात आले होते.
सासऱ्याची 300 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सुनेची नजर होती, यासाठी नवऱ्याच्या ड्रायव्हरला सुनेने हत्येची सुपारी दिली. त्यानंतर नागपूरच्या बालाजी नगर परिसरात झालेल्या हिट अँड रण प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला होता.
तपासात मात्र तो अपघात नसून त्यांना सुपारी देऊन चिरडण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतक सासरे पुरुषोत्तम यांच्या हत्तेसाठी त्यांची सून अर्चना पुट्टेवार हिनेच सुपारीदिली होती. त्यासाठी 17 लाख रुपये ऍडव्हान्स देण्यात आले होते. आरोपी सून अर्चना गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नौकरीवर असून या प्रकरणात सून अर्चना सह तीन आरोपी अटकेत आहेत.
नवी दिल्ली - राज्यसभेत असलेल्या पण आता लोकसभेला निवडून आलेल्या 10 खासदारांनी लोकसभेत राहायचा निर्णय कळवला आहे. राज्यसभा सचिवालयाने याबद्दलची माहिती जारी केली आहे. या खासदारांमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांचा समावेश असून लवकरच राज्यसभेच्या या 10 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.
रत्नागिरीच्या अस्तान-धनगरवाडीत मुख्य रस्त्यावर भुस्खलनामुले दरड कोसळली असून यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मागील काही दिवसात परिसरात जोरदार पाऊस झाला आहे,
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने रायबरेली आणि अमेठी या दोन्ही लोकसभा जागा जिंकल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा आज यूपीच्या रायबरेलीला भेट देणार आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 17 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असेल, अशी मोदींची हमी देशाला दिली होती. ही हमी पोकळ ठरली. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकारला इतरांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन सत्तेचे ‘घर’ सांभाळावे लागले, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, "एक गोष्ट निश्चित आहे की यावेळी नरेंद्र मोदी हे अत्यंत कमकुवत पंतप्रधान सिद्ध होतील. जनतेने भाजपला नाकारले आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून मजबूत आलो आहोत"
मुंबई एटीएसने बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली, एटीएसने आणखी ५ बांगलादेशींची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे. बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली असल्याने आरोपींनी लोकसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे एटीएसने उघड केले आहे: मुंबई एटीएस
गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री म्हणून हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पदभार स्वीकारला.
दिल्ली: डॉ मनसुख मांडविया यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला
कल्याण डोंबिवलीत पावसाला सुरुवात झाली आहे, अर्धा तासा पाऊस पडला, या पावसात नालेसफाईची पोलखोल समोर आली आहे.कल्याण पूर्वेतील भारतनगर न्यू गोविंदवाडी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला...
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव म्हणतात, "मी आज पदभार स्वीकारला आहे. मी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आम्ही गेल्या 5 वर्षात काय केले, यावर चर्चा करू, आणि भविष्यासाठी योजना करेल..."
बजाजनगरचे फूल विक्रेते शाखीर भाई हे बजाज कंपनी गेट समोर असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले, पेट्रोल भरत असतांना अचानक त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढताच दुचाकीने अचानक पेट घेतला, तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण मिळाले आहे. उद्या आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी चंद्राबाबू नायडू शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी ९ वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेशला होणाऱ्या शपथविधीसाठी मुंबईहून रवाना होतील.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या आशीर्वादासाठी मी आलो होतो, असं म्हस्के म्हणाले आहेत.
ठाकरे गटानं नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरमधला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये. उमेदवार मागे न घेतल्यास मुंबई शिक्षकचा उमेदवार काँग्रेस कायम ठेवणार असं ते म्हणालेत. विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस शिवसेनेत वादावादी सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली असल्याने डॉक्टरांचे पथक अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. मात्र, जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
NEET परीक्षा रद्द करावी असं म्हणत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आता 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सध्या होणारी एडमिशन रद्द करावीत असं याचिकाकर्त्यांची मागणी होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिलाय. 8 तारखेला होणाऱ्या सुनावणीत काही महत्त्वाचे निर्देश कोर्ट देत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभेचं अध्यक्षपद भाजपच्या दक्षिण भारतातील नेत्या डी पुरंदेश्वरी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्या एन.टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. तर, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत.
मंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज मी आरोग्य राज्यमंत्री पदाचा चार्ज घेतला आहे. गोरगरिबांना सेवा देण्याचं काम करणारा हा विभाग आहे. नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 100 दिवसांचा रोडमॅप दिलाय तो पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता लगेच अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी त्यांच्या विधानाचे स्वागत करते कारण मणिपूर हा भारताचा एक भाग आहे. जेव्हा आपण आपल्या लोकांना खूप त्रास सहन करताना पाहतो तेव्हा ते आपल्या सर्वांसाठी खूप अस्वस्थ करणारे आहे. आम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत, सर्व पक्षांना सोबत घेऊन एक चांगली समिती बनवूया, मणिपूरला पुन्हा विश्वास देऊया.''
वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, "वस्त्रोत्पादन हे असे क्षेत्र आहे जे जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करते. आज जगातील निर्यातीतही आपला वाटा चांगला आहे. आगामी काळात देशाच्या आकांक्षेनुसार वस्त्रोद्योग पुढे जाईल."
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहोचले आहेत. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाजपाचा नवीन अध्यक्ष नागपूर आरएसएस च्या मुख्यालयातून ठरवला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या अध्यक्ष ओम माथुर व सुनील बन्सल यांच्या नावाची चर्चा आहे. जेपी नड्डा यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असून जेपी नड्डा यांची वर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात झाल्यामुळे नवीन अध्यक्ष लवकरच निवडला जाणार आहे. मात्र नवीन अध्यक्षासाठी चर्चेत असलेल्या शिवराज सिंह चौव्हान, भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे कोणाचे नाव येणार याकडे लक्ष लागलं आहे.
पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता 'नाईट ड्युटी' करावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अचानक शहाड येथे फुटल्याने हजरो लिटर पाणी वाया गेले. सकाळी ६.०० वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीमध्ये कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी बाधित नागरिकांनी या बाबत महापालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपये किलो झाला आहे. सध्या बाजारात दिवसाला 150 गाड्यांची आवक होत आहे.
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित एनईईटी (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स एक्झाम) परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात NEET-UG 2024 रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत ५ मे रोजी झालेल्या NEET मधील चुकीच्या पद्धती आणि फसवणुकीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि पेपर लीकचा तपास पूर्ण होईपर्यंत समुपदेशनावर स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
भिवंडी : सरवली एमआयडीसी परिसरातील डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यात सरवली एमआयडीची परिसरात सदाशिव हायजिन प्रा.लि ही डायपर बनवण्याची कंपनी आहे. आज (मंगळवार) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याची माहिती आहे. इथे क्लिक करा
महाड तालुक्यातील काळीजकोंड परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रवींद्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मृतांची नावं आहे. तर जखमी झालेल्या संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून झालेल्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासमोर राज्य विधानसभा निवडणूक लढवण्याचा पर्याय आहे. पण, केंद्रशासित प्रदेशात निवडणूक जिंकून विधानसभेची शिडी चढायची नाही, कारण मला स्वतःला अपमानित करायचं नाही, असं सांगत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. निवडणूक लढवली नाही तरी पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व नक्कीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरांचा भूखंड दिला असून त्यावर महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविक व पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्येत राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ हरित वसाहत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी हा भूखंड मंजूर केला आहे.
मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई, पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. येत्या ४८ तासात अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं सांगितलंय. आज हवामान खात्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इथे क्लिक करा
Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल २४ तासांनी खातेवाटप जाहीर झाले असून संरक्षण, गृह, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी अनुक्रमे राजनाथसिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर यांच्याकडे कायम ठेवली आहे. धजदचा निलंबित माजी खासदार प्रज्वल रेवण्णा हा अश्लील व्हिडिओप्रकरणी पुन्हा अडचणीत आला आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने प्रज्वल याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई, पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला आहे. येत्या ४८ तासात अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं सांगितलंय. आज हवामान खात्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.