Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi Live Updates: एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई, पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Inflation: किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

देशातील किरकोळ महागाई दर मे महिन्यात वार्षिक आधारावर 4.75 टक्के या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये तो 4.83 टक्क्यांच्या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता.

Heat Wave: देशातील 'या' राज्यांना बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका, IMD ने दिला इशारा

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पुढील ४ ते ५ दिवसांत उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

IMD ने उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Arunachal Pradesh CM: अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पेमा खांडू यांच्या गळ्यात

पेमा खांडू आणखी एका टर्मसाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पुन्हा निवड झाली आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त!  

हिरानगर-कठुआ (J&K) दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीसांनी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. यामध्ये 30 राउंड असलेली 3 मॅगझिन, 24 राउंड असलेली 1 मॅगझिन, स्वतंत्र पॉलिथिनमध्ये 75 राउंड, 3 जिवंत ग्रेनेड, 1 लाख रुपयांचे चलन (500 रुपयांच्या 200 नोटा), खाण्याचे पदार्थ (पाकिस्तानने बनवलेले चॉकलेट, सुके चणे आणि शिळ्या चपात्या), पाकिस्तानमध्ये बनवलेली औषधे आणि इंजेक्शन्स (पेन किलर), 1 सिरिंज, A4 बॅटरीचे 2 पॅक, अँटेना असलेल्या टेपमध्ये गुंडाळलेला 1 हँडसेट आणि या हँडसेटला लटकलेल्या 2 वायर, 1 M4 कार्बाइन आणि 1 Ak 47 या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. याबद्दल कठुआ पोलिसांनी माहिती दिली आहे.

काँग्रेसचे माजी आमदार नारायणराव मुंडे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे.

कुवेतमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले...

कुवेत सीटीतील आगीची दुर्घटना दुःखद आहे. ज्यांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यां सर्वांसोबत माझ्या प्रार्थना आहेत . जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. कुवेतमधील भारतीय दूतावास बारकाईने लक्ष ठेवून आहे. परिस्थिती आणि बाधितांना मदत करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मनमाड शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Rahul Gandhi: सीबीआय, ईडी आणि संपूर्ण प्रशासन आमच्या विरोधात होते ; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले, "जेव्हा निवडणुका सुरू झाल्या, तेव्हा भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीडियाने सांगितले की त्यांना (भाजप) 400 जागा मिळतील. पंतप्रधान '400 पार केले' म्हणत होते. त्यांचे सर्व वरिष्ठ नेते '400 पार' असे म्हणायला सुरुवात झाली. महिनाभरानंतर ते '300 पार' म्हणू लागले. काही वेळाने '200 ओलांडले' आणि निवडणुकीचा निकाल सर्वांनी पाहिला.

ही काही सामान्य निवडणूक नव्हती. संपूर्ण मीडिया इंडिया आघाडीच्या विरोधात होता. सीबीआय, ईडी आणि संपूर्ण प्रशासन आमच्या विरोधात होते. निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अनुकूल असा निवडणूक आराखडा तयार केला. सर्व प्रयत्न करूनही अयोध्येत भाजपचा पराभव झाला. उत्तर प्रदेशात त्यांचा (भाजप) पराभव झाला. ते हरले कारण ते भारताच्या कल्पनेवर हल्ला करत होते."

Akhilesh Yadav: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला

करहल विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कनौज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरला पोहोचले

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरला पोहोचले. राज्यपाल रघुबर दास आणि मुख्यमंत्री पदी मोहन चरण माझी यांनी त्यांचे स्वागत केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भुवनेश्वरला पोहोचले

ओडिशाचे मोहन चरण माझी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भुवनेश्वरला पोहोचले.

पालघरच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस

पालघरच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस

चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला |

जम्मू आणि काश्मीरमध्ये काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कठुआच्या हिरानगर भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे.

डोंबिवलीतील आगीवर नियंत्रण, खबरदारी म्हणून एनडीआरफची टिम दाखल 

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रशांत गावंडेंवर कारवाई

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली.

हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणांविरोधातली सुनावणी २ जुलैपर्यंत तहकूब

मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी रवी राणा यांच्याविरोधातील सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. २ जुलैपर्यंत सुनावणी तहकूब असेल.

पुरंदर भागात शरद पवारांचा दुष्काळी दौरा

राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला असून शरद पवार यांनी पुरंदर परिसरात दुष्काळी भागाची पाहाणी केली.

आग लागलेल्या कंपनीत कोणीही नव्हतं, अग्निशमन दलाचं स्पष्टीकरण

डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या कंपनीत बुधवारी भीषण आग लागली. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर कंपनीमधील आटोक्यात आलेली आहे. कंपनीमध्ये कुणीही नव्हतं, असं स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिलं आहे.

आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही; अग्निशमन दलाची माहिती

डोंबिवली एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. शिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचंही सांगण्यात आलंय.

केमिकल कंपन्यांचं वेगळं ऑडिट करण्याची गरज- प्रवीण दरेकर

डोंबिवलीतल्या आगीवर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, तातडीने तपासणी केल्या असत्या तर ही घटना टळली असती. केमिकल कंपन्यांचं एक वेगळं ऑडिट करण्याची गरज आहे. एक वेगळी समिती स्थापन करायला पाहिजे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी

डोंबिवलीतल्या इंडो अमाईन्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

Dombivli Fire Live: डोंबिवलीतील स्फोटानंतर शाळेतील मुलांना पाठवलं घरी

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये अभिनव शाळेजवळ असलेल्या एका कंपनीला आग लागली. यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. तर याभागात असलेल्या शाळेतील मुलांना घरी पाठवण्यात आले आहे.

Fire News: डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये अभिनव शाळेजवळ असलेल्या एका कंपनीला लागली आग

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये अभिनव शाळेजवळ असलेल्या एका कंपनीला आग लागली. हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत.

Crime News Live:  माण तालुक्यातील मलवडी येथे टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

माण तालुक्यातील मलवडी येथे टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात आकाश दशरथ मगर हा तरुण गंभीर जखमी झाला. तसेच टोळक्याने एका ओमिनीची प्रचंड नासधूस केली आहे.

याबाबतची माहिती अशी, मलवडीतील आकाश दशरथ मगर व सत्रेवाडी येथील प्रवीण अशोक सत्रे यांची महिन्याभरापूर्वी बसस्थानक परिसरात वाहन लावण्यावरुन बाचाबाची झाली होती. संबंधित प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र या घटनेचा राग प्रवीण सत्रे याच्या मनात धुमसत होता. हा राग मनात धरुन सोमवार १० जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या प्रवीण याने दुचाकींवरून आलेल्या आपल्या साथीदारांसह बसस्थानक परिसरात ओमिनी गाडीत बसलेल्या आकाश मगर याच्यावर लाकडी दांडकी, दगड यांच्यासह लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सुरुवातीला ओमिनी गाडीच्या सर्व काचा फोडून टाकल्या. नंतर आकाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आकाशच्या डोक्याला मार बसून गंभीर दुखापत झाली. यावेळी आकाशच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी लंपास झाली. हल्ला करुन उण्यापुऱ्या पाच ते दहा मिनिटात मारहाण करणारे आपापल्या गाड्या घेवून पसार झाले. बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेची माहिती मिळताच दोनशे ते तीनशे ग्रामस्थांचा जमाव बसस्थानक परिसरात जमला होता.

Ajit Pawar Live: अजित पवार गटाकडून आज राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता

प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीतील एका गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी सुरु आहे.

Accident News: माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली

कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महामा्र्गावरून जात असताना रिक्षावर अचानक दरड कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेमध्ये चुलता-पुतण्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

N Chandrababu Naidu : नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गन्नावरममध्ये तयारी सुरू

टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केसरपल्ली आयटी पार्क, गन्नावरम येथे तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर नेते शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Indian Army : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरू, एका दहशतवाद्यांचा खात्मा, 5 जवान जखमी

जम्मू काश्मीर : कठूआमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात रात्रीपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं कळतंय. चकमकीत 5 सैनिक जखमी झाल्याची शक्यताही आहे. अजूनही भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या रियासी भागात झालेल्या यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.

Malshej Ghat : माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना घडलीये. महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक दरड कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर, तीन जण जखमी झाले आहे. तर, जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. राहूल भालेराव, स्वयंम भालेराव अशी मृत चुलता पुतण्याची नावे आहेत.

Upendra Dwivedi : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती

केंद्र सरकारने जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जून रोजी द्विवेदी पदाभार स्वीकारणार आहेत. याच दिवशी विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे निवृत्त होणार आहेत. जनरल मनोज पांडे यांना 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इथे क्लिक करा

Weather Update : राज्याच्या काही भागात आज ढगाळ वातावरण, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्याच्या काही भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे क्लिक करा

Hardoi Accident : रस्त्याकडेला झोपडीत राहणाऱ्या कुटुंबावर वाळूने भरलेला ट्रक उलटला, तीन मुलांसह आठ जण ठार

हरदोई : यूपीच्या हरदोई जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला झोपडीत राहणाऱ्या कुटुंबावर वाळूने भरलेला ट्रक उलटला. संपूर्ण कुटुंबाला ट्रकची जोरदार धडक बसलीये. या अपघातात तीन मुलांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगेच्या काठावरून वाळूचे उत्खनन करून ट्रक हरदोईच्या दिशेने जात असल्याचे समजते. मल्लवन शहरातील चुंगी क्रमांक 02 येथे भल्ला कंजाड हे कुटुंबासह झोपडीत राहत होते.

Sanjay Telnade : संजय तेलनाडेसह सात जण हद्दपार

इचलकरंजी : विविध १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात एस.टी. सरकार गँगला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यामध्ये गँगचा प्रमुख आणि माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे (रा. गावभाग) यासह सात जणांचा समावेश आहे. याबाबत गावभाग पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी मान्यता दिली. इथे क्लिक करा

N Chandrababu Naidu : टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

अमरावती : टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज (बुधवार) आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या भूमिकेतील त्यांची ही चौथी टर्म असेल. विजयवाडाच्या बाहेरील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज दुपारी 11.27 वाजता नायडू शपथ घेणार आहेत. मंगळवारी तेलुगू देसम विधिमंडळ पक्ष आणि एनडीएच्या घटक पक्षांनी नायडू यांची नेता म्हणून निवड केली. यानंतर आंध्र प्रदेशातील एनडीएच्या नेत्यांनी राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांची भेट घेतली आणि एन चंद्राबाबू नायडू यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती केली. चंद्राबाबू नायडू यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याचे राज्यपालांनी मान्य केले आहे.

Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या चौकीवर हल्ला; गोळीबारात दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी दहशतवादी घटना आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, "दोडा येथील चतरगला भागात दहशतवाद्यांनी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर हल्ला केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे." सुरुवातीच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. इथे क्लिक करा

IMD : राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता

Latest Marathi Live Updates : मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई, पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं सांगितलंय. मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावलीये. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसेच या परीक्षेनंतर घेतले जाणारे समुपदेशन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. तसेच खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT