Latest Marathi News Live Update Sakal
देश

Latest Marathi News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांचं 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित 

काश्मीरमध्ये अडकलेल्या ५०० पर्यटकांची जवानांनी केली सुटका

आंबेडकरांचं निवास्थान राजगृहाला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी दिली भेट

अजय बारस्करांची प्रहार जनशक्ती पक्षातून हाकालपट्टी

मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करणाऱ्या हभप अजय बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्यासह बारस्कर हे जरांगे यांच्या उपोषणावेळी चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबाही दिला होता. त्यामुळं जरांगेंच्या आंदोलनातील एक सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.

दिल्लीत लवकरच आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटणार

आम्ही जास्त जागा लढविण्यावर ठाम - कीर्तिकर

आम्ही जास्त जागा लढविण्यावर ठाम अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. राष्ट्रवादीला किती जागा सोडणार यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना आता भाजपकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनवर स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्यानं खळबळ!

विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत केंद्र अंतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १ चे बाहेरील बाजूस असलेल्या कॅन्टीन जवळील झाडाच्या जवळ एक बेवारस बॅग मिळून आली. सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएस ने तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅग मध्ये अंदाजे 54 डीटोनेटर (स्फोटके) मिळून आलेले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

नितेश राणेंना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!

खासदार संजय राऊतांकडून नितेश राणेंच्या विरोधात जो मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता त्यावर हायकोर्टानं आता नितेश राणेंना दिलासा दिलेला नाही. अशी बातमी समोर आली आहे.

कॉग्रेस पक्षाला मोठा धक्का, चक्क ६५ कोटी रुपयांची केली वसूली?

आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीतून कॉग्रेसकडून ६५ कोटींची थकबाकी वसूल केल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयनं याबाबत माहिती दिली आहे.

...तरीही अखिलेश यादव भाजपला रोखू शकले नाहीत-ओवैसी

अखिलेश यादव यांनी 2014, 2017, 2019 आणि नंतर 2022 मध्ये भाजपविरुद्ध निवडणूक हरली. या चार निवडणुकांपैकी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने सर्वाधिक मुस्लिम मते मिळवली. तरीही ते भाजपला रोखू शकले नाहीत, यामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी उपस्थित केला.

टिफिन बैठकीत भाजपची लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा

टिफिन बैठकीत भाजपची लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असून भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती सभागृहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व प्रमुख आमदार व खासदारांची उपस्थिती होती.

पंढरी शेठ फडके यांचे निधन

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून दिलेले पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.

भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ

भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. चव्हाण यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून खबरदारी म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

मराठा आरक्षणासाठी २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको

मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली असून २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीतील रहिवासी इमारतीला आग, अग्मिशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीच्या द्वारका भागात एका रहिवासी इमारतीला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमाणावर कारवाई, नागरिकांमध्ये गोंधळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी जमलेल्या जमावाने गोंधळ केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या.

Morwadi Court Fire Accident:पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी कार्टाजवळ भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune Fire News: पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी कोर्टाजवळ स्क्रॅप ग्राऊंडला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Prashant Jagtap Threat Call:शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकीचे मेसेज

शरद पवार गटाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना मेसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी जगताप यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. एका ठराविक नंबरवरुन धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार यांनी त्यावेळी केली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जगताप यांच्याकडून करण्यात आली आहे.

JP Nadda Mumbai Visit: जेपी नड्डा मुंबईत दाखल, स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी 

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुंबई दौरा आखण्यात आला होता. नुकतेच ते मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

बीडमध्ये १२वीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळात, इमारतीवर चढून पुरवली कॉपी

राज्यभरात १२वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, या परिक्षेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा असतानाही इमारतीवर चढून कॉपी पुरवल्याचा प्रकार सरस्वती विद्यालयात घडला आहे.

Maratha Reservation: निवडणुका डोळ्यासमोर पाहून विशेष अधिवेशन- मनोज जरांगे

सरकारने निवडणुका पाहून विशेष अधिवेशन बोलावलं, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.

Pune News: पुणे ड्रग्ज प्रकरणात देशातील विविध शहरांतून पाच जणांना अटक

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आतापर्यंत देशातील विविध शहरांतून ५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Devendra Fadanvis: आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत- देवेंद्र फडणवीस

कुर्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.

मला आज पूनम ताईंनी हा भाग्याचा दिवस दाखवला, महाराजांच्या पहिल्या मंदीराचे अनावरण करण्याची संधी त्यांनी मला दिली मी आभारी आहे. शिवजयंतीला आम्ही दिल्लीला गेलो, त्या ठिकाणी महाराजांच्या वास्तव्यांची सहवासाची जाणीव होते. हा राजा झुकणार नाही, दबणार नाही हे त्या ठिकाणी ललकारलं. महाराज नसते तर आज आपण नसतो, असे ते म्हणाले.

Sharad Pawar: शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी

शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना ११ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात अजित पवार गट कोर्टात गेला आहे.

Sunil Shukre : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्यासह अन्य सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन कडून ही जनहित याचिका करण्यात आलीये.

नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसीलाही स्थगिती देण्याची याचिकेत मागणी करण्यात आलीये. लवकरच याचिकेवर सुनावणी पार पडणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Mumbai Congress: मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपद अखिलेश यादव यांच्याकडे

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दिकी यांना हटवण्यात आलं आहे. तर या पदाची जबाबदारी आता अखिलेश यादव यांना देण्यात आली आहे. सिद्दिकी काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

PUNE Traffic: बाणेर रस्त्यावर सकाळी-सकाळी ट्रॅफिक जाम, वाहतूक संथ गतीने

पुण्यातील बाणेर रोडवर आज सकाळी-सकाळीच ट्रॅफिक जाम पाहायला मिळाला. त्यामुळे कामावर जाणाऱ्या पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या दरात उसळीनंतर पुन्हा घसरण

कांदा निर्यातबंदीबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या दरात उसळीनंतर पुन्हा घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाच वातावरण निर्माण झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने दिला आहे.

रिक्षाला अज्ञात वाहनाची भीषण धडक; ८ जणांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर जखमी

प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली.

पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे 'दिल्ली'त कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत ४००० कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी (२० फेब्रुवारी) दिल्लीतून तब्बल १८०० कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटक देखील केली आहे.

प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील फली एस नरिमन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्नास घेतला. इंदिरा गांधी सरकारच्या काळात ते देशाचे अतिरिक्त स़ॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लीजेंड देखील म्हटलं जातं.

25 आणि 26 फेब्रुवारीला विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

विदर्भात पुन्हा पाऊस हजेरी लावणार असल्याचं समोर आलं आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत येणार? भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा

महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत येणार असल्याचा दावा भाजप नेते आशिष देशमुखांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

बुलढाण्यात महाप्रसादातून ५०० हून अधिक जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये काल(मंगळवारी) एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यामधून जवळजवळ ५०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

जागा वाटपातील चर्चेत माझा सहभाग नाही - शरद पवार

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी परिस्थिती आहे. यावर वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि मार्ग काढावा. लोकसभा जागा वाटपातील चर्चेत माझा सहभाग नाही. या कमिटीवर जयंत पाटील आहेत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Buldhana : धार्मिक कार्यक्रमात जेवल्यानंतर 500 जणांना विषबाधा

बुलढाण्यातील लोणार तालुक्यामधील सोमाठाना गावात एका धार्मिक कार्यक्रमात जेवल्यानंतर ५०० जणांना विषबाधा झाल्याचे समजते. भगर, आमटी खाल्यानंतर लोकांना विषबाधा झाली. यातील १०० ते १२० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 300 जणांवर उपचार सुरू आहेत .

Uddhav Thackeray Visit Buldhana : उद्धव ठाकरे दोन दिवस बुलढाणा दौऱ्यावर; जिल्ह्यात सहा ठिकाणी होणार सभा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे दोन दिवस बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहेत. २२ आणि २३ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात दौरा करणार आहेत. ठाकरे यांची जनसंवाद यात्रा दोन दिवस जिल्ह्यात असून तब्बल सहा ठिकाणी सभा होण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील आज आपली भूमिका करणार स्पष्ट 

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही. त्यांनी सगेसोयरेसंदर्भात कायदा करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज दुपारी १२ वाजता ते आपली भूमिका जाहीर करु शकतात. 

Shashi Tharoor : शशी थरूर यांचा फ्रेंचच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी मुत्सद्दी शशी थरूर यांना सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फ्रेंच निवासस्थानातील एका कार्यक्रमात फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर यांच्या हस्ते थरूर यांना सन्मानित करण्यात आले.

Bihar Accident : लखीसराय-सिकंदरा मुख्य मार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 6 हून अधिक जखमी

लखीसराय : बिहारच्या लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. इथं एका भीषण रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या अपघातात 6 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. रामगढ चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहारौरा गावात ही घटना घडलीये. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो चक्काचूर झाल्याचं सांगण्यात येत आहे. लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ हा अपघात झाला.

Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Farmers Protest : शंभू सीमेवर एकत्र जमणार 14 हजार शेतकरी

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर सुमारे 14 हजार शेतकऱ्यांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आलीये. यासोबतच पंजाब पोलिसांनी 1200 ट्रॅक्टर-ट्रॉली, 300 कार आणि 10 मिनी बस आणि त्यांच्यासोबत इतर वाहनांनाही परवानगी दिल्याचं वृत्त आहे.

12th Board Exam : आजपासून बारावीची परीक्षा; राज्यात १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ५६ हजार ६१६ ने वाढली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण

Latest Marathi News Live Update : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले. ओबीसींसह इतर कोणत्याही समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा धाडसी, ऐतिहासिक आणि टिकणारा निर्णय एकमताने घेतला असल्याचे समाधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बोलताना व्यक्त केले. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर मनोज जरांगेंनी टीका केलीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा आजपासून (ता. २१) सुरू होत आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली नसून येत्या ३१ मार्चपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक घडामोडीविषयक खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांनी सांगितले. तसेच राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT