Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi Live Updates : एका क्लिकवर वाचा देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी

खान्देश, पूर्व विदर्भाचा काही भाग सोडून राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वारे पोहोचले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Lok Sabha Speaker: लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी

लोकसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 18 व्या लोकसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. यासाठी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार.

मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात करणार ३,००० कोटींची गुंतवणूक

मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात ३,००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच यामुळं मोठ्या प्रमाणावर रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं.

POCSO: बीएस येडियुरप्पा यांचा जामिनासाठी अर्ज

बीएस येडियुरप्पा यांनी विशेष न्यायालयात (लोकप्रतिनिधी न्यायालय) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. POCSO कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बंगळुरू न्यायालयाने जारी केले आहे.

NEET प्रकरणी विरोधक खोटं बोलतायत - केंद्रीय शिक्षण मंत्री

तथ्य जाणून न घेता विरोधक संवेदनशील मुद्द्यावर खोटे बोलत आहेत, NEET प्रकरणी बोलताना अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये बस अपघात! दोन जणांचा मृत्यू

J&K: बारामुल्ला जिल्ह्यातील पाजलपोरा, रफियााबाद भागात बस अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्र्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

POCSO प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

एक चांगली लोकप्रतिनिधी म्हणून चांगले काम करेल - सुनेत्रा पवार

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आमच्या पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला, ही आनंदाची बाब आहे, आम्ही त्यांच्या विश्वासावर खरा उतरू आणि एक चांगली लोकप्रतिनिधी म्हणून चांगले काम करू... सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत."

Latest Marathi Live Updates : मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित झाले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज त्यांची बैठक घेतली.

Latest Marathi Live Updates : जरांगेंची सरकारला १३ जुलैची डेडलाईन

मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जुलैची डेडलाईन दिली आहे. तोडगा न काढल्यास विधानसभेला उमेदवार जाहीर करणार असल्याचे देखील जगांरे म्हणाले.

सरकारला आणखी वेळ देण्याची शंभूराज देसाईंची जरांगेंकडे मागणी

मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी वेळ द्यावा आणि उपोषण मागे घ्यावं, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांच्याकडे केली आहे.

शंभूराज देसाई मनोज जरांगेंच्या भेटीला

मंत्री शंभूराज देसाई हे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत

नागपूर स्फोटात पाच जणांचा मृत्यू

नागपूरच्या केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सुरुवातीला तीन जण मृत झाल्याची माहिती येत होती. परंतु आता यात पाच जण मृत झाल्याचं कळतंय.

नागपूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, तिघांचा मृत्यू

नागपूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे.

मंत्री तानाजी सावंत जरांगेंच्या भेटीसाठी दाखल

आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जरांगेंच्या भेटीदाखील दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरेंना मराठी माणसांचं मतदान नाही- राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांना मराठी माणसांचं मतदान नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी येत्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पवार या अर्ज भरण्यासाठी विधानभवनामध्ये दाखल झाल्या आहेत.

MNS Ra Thackeray Live: मनसेकडून विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी

मविआला झालेले मतदान हे मोदी विरोधामुळे झाले आहे. शिवाय ठाकरे गटाला मुस्लिमांचे मत मिळालं आहे, असं राज ठाकरे पक्षाच्या बैठकीत म्हणाल्याचं कळतंय. मनसे विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

Nitin Gadkari Live: नितीन गडकरी यांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Bachchu Kadu Live: सरकारने दिलं तरी मंत्रीपद घेणार नाही- बच्चू कडू

सरकारनं ऑफर केलं तरी मंत्रीपद घेणार नाही अशी भूमिका प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी घेतली आहे. बच्चू कडू महायुती सरकारमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी २० आमदार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

UJANI Dam: उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ, ४ टीएमसी पाणीसाठी जमा

कोरडे पडलेले उजनी धरण आता भरू लागले आहे. धरणामध्ये ४ टीएमसी पाठीसाठी जमा झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढली आहे.

Bala Nandgaonkar: विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा- बाळा नांदगावकर

मनसेची आज मांटुग्यामध्ये राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

Maratha Reservation: लातूर- बीड महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता केला जाम

मराठी आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. लातूर- बीड महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता जाम केला आहे.

Rain Update Live: पहिल्याच पाण्यात नवीन पुलाचे तीन तेरा; जळगाव हिवरखेड अकोट राज्य मार्ग बंद

12 जूनच्या रात्री झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने जळगाव हिवरखेड अकोट राज्य महामार्ग क्र 47 वरील द्वारकेश्वर संस्थान आडगाव नजीक मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी नव्यानेच बांधलेला पर्यायी पूल चा भराव वाहून गेल्याने या राज्य महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. वृत्त लिहे पर्यंत 13/6/24 सकाळी पर्यंत वाहतूक सुरू झाली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानं मंत्री छगन भुजबळ नाराज?

मंत्री छगन भुजबळ पुन्हा नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानं भुजबळ नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने छगन भुजबळ यांच्या नाराजीचा सूर कमी आहे. मात्र, तरीही नाराजी कायम असल्याचं सांगण्यात येत आहे.

Raj Thackrey Live:  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर, आज मुंबईत महत्त्वाची बैठक!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी साडेदहा वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Shahupuri Police : आमदार सतेज पाटील, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापुरातील शाहूपुरी पाेलिसांनी काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांवर विना परवाना हाेर्डिंग लावणे आणि शहर विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर येथे लावण्यात आलेल्या त्या हाेर्डिंगची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली हाेती.

Sunetra Pawar : लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर? आज अर्ज भरण्याची शक्यता

लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार असल्याचीही माहिती मिळत आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज सकाळी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदमध्ये ही माहिती दिलीये.

Kirti Vardhan : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन कुवेतला रवाना

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन कुवेतला रवाना झाले आहेत. काल रात्री परराष्ट्र विभागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर मोदींनी कुवेतला जाण्याच्या सूचना दिल्याचे वर्धन यांनी सांगितले.

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाकडून वाहनांची झाडाझडती

कुपवाडा जम्मू-काश्मीर : बीएसएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी रेड्डी चौकीबल मार्केटमध्ये एक संयुक्त चौकी स्थापन केलीये. येथील झडतीदरम्यान, शबीर अहमद नावाच्या ओजीडब्ल्यूला पकडण्यात आलं असून त्याच्याकडून 1 पिस्तूल, 1 पिस्तुल मॅगझिन, 10 पिस्तुल राउंड, 4 हातबॉम्ब आणि 2 आयईडी जप्त करण्यात आले आहे.

G-7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज इटली दौऱ्यावर

नवी दिल्ली : इटलीमध्ये १३ ते १५ जून या कालावधीत जी-७ देशांची परिषद होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते गुरुवारी इटलीला प्रयाण करतील, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली. इटलीमधील अपुलिया येथील बोरगो एग्नाजिया रेसॉर्टमध्ये जी-७ देशांची परिषद होणार आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारल्यानंतर मोदी यांचा होत असलेला हा पहिलाच विदेश दौरा आहे.

NEET UG परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

UG (NEET UG) 2024 रद्द करण्याची आणि पुनर्रचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज (गुरुवार) 13 जून रोजी सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुनावणी करणार आहे. या याचिकेत NEET UG Counselling 2024 वर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मंगळवारी अशाच मागण्यांसह आणखी एका याचिकेवर सुनावणी झाली.

Pema Khandu : पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा होणार अरुणाचल राज्याचे मुख्यमंत्री; आज घेणार शपथ

इटानगर : पेमा खांडू पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. राजधानी इटानगरमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत खांडू यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुघ ही उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यातून आलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूही तेथे उपस्थित होते.

Hasan Mushrif : पालकमंत्री हसन मुश्रीफ आजपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवार (ता. १३) ते सोमवार (ता. १७) या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी (ता. १३) दुपारी ४.३० वाजता विमानाने ते कोल्हापुरात येतील. त्यांच्या हस्ते कागल तहसीलदार कार्यालयाच्या लिफ्टचे उद्‌घाटन होईल. सायंकाळी ६ वाजता लिंगनूरला बांधकाम कामगारांना साहित्य व आभा कार्ड वितरण आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी उपस्थित राहाणार आहेत. शनिवारी (ता. १५) सकाळी ७ वाजता निवासस्थानी नागरिकांना वेळ राखीव असेल. रविवारी (ता.१६) दुपारी ४ वाजता गोकूळ संचालकांची बैठक आहे. मंगळवारी (ता.१८) पहाटे ५.३० वाजता ते बेळगाव येथे विमानतळाकडे प्रयाण करतील.

Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान

शेगाव मधून गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यामध्ये २०० सेवेकरी, १५० पताकाधारी, १५० टाळकरी हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाले आहेत.im

IMD Update : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर

पुणे : उत्तरेकडे मॉन्सून सरकत असताना मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील एकूण २६ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली व विदर्भातील अकोला, वाशीम, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गेल्या आठवड्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज विजांसह वादळी पावसाचा इशारा

Latest Marathi Live Updates : खान्देश, पूर्व विदर्भाचा काही भाग सोडून राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वारे पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत सुटणार हे शासनाने आपले लोक येथे पाठवून जाहीर करावे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडलीये. ‘जरांगे यांनी उपोषण थांबवले पाहिजे’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देशभरात ‘नीट-यूजी’ परीक्षेत ६३ गैरप्रकार उघड झाले असून, याप्रकरणी २३ जणांवर विविध कालावधीसाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) देण्यात आली. तसेच इटलीमध्ये १३ ते १५ जून या कालावधीत जी-७ देशांची परिषद होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते गुरुवारी इटलीला प्रयाण करतील, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT