Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi Live Updates: एक क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Manipur CM: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ भीषण आग

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या अधिकृत बंगल्याजवळील मणिपूर सचिवालय संकुलातील इमारतीला शनिवारी संध्याकाळी मोठी आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.

Khed Rain: खेड-जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस

खेड-जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस होत असून, यामुळे अनेक गावांना तळाच्या स्वरूप आले आहे.

Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट! बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस

पोर्शे अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 4 ते पाच दिवसांमध्ये याला उत्तर द्यावे लागणार आहे.

हिंगोलीतील औंढ्यात मुसळधार पाऊस; नदीवरील पूल गेला वाहून

हिंगोलीत सध्या मुसळधार पाऊस बरसत असून नदीनाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अशाच एका नदीवरील पूल वाहून गेल्याचं वृत्त आहे.

नांदेड बाजार समितीत राडा

नांदेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. नांदेडच्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांनमध्ये हा वाद झाल्याचं कळतंय. बाजार समितीने गाळे वाटपाचा आज लिलाव ठेवला होता. यामध्ये 77 गाळ्यांचं वाटप केलं जाणार होतं. गाळे वाटपावरून हा वाद झाला असून वादाचे रूपांतर धक्काबुकीत झाले. हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता आहे.

Uddhav Thackeray: "मोदींच्या गॅरेंटीचे काय झाले?"; उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे म्हणतात,"भाजपनेच 400 चा नारा दिला. अच्छे दिनच्या प्रचाराचे काय झाले? मोदींच्या गॅरेंटीचे काय झाले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमचे सरकार रिक्षाच्या तीन चाकांसारखे आहे, केंद्रातील भाजप सरकारची अवस्थाही तीच आहे."

"पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही": उद्धव ठाकरे

"पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही", असं महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती - उद्धव ठाकरे

मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो, युट्युब आणि संघटनानी सुद्धा विचार मांडले. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी हीं लढाई होती.हे आता मोदी सरकार नाही NDA सरकार आहे, असे ही ते म्हणाले.

मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना फायदा झाला - शरद पवार

मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे, या परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या, तिथे आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. तसेच, विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर त्या आमच्या फायद्याच्या ठरतील

जयंत पाटलांनी मविआच्या घवघवीत यशाबद्दल 'निर्भय बनो' संघटनेचे मानले आभार

जयंत पाटलांनी नुकतेच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील विविध संघटना ज्यांनी राज्यात सभा घेतल्या, ज्यामध्ये खासकरून निर्भय बनो ही संघटना आणि इतर अनेक संघटनांनी महाराष्ट्रात जनजागृती केली. मी या सगळ्यांचे आभार मानेन

मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उदय सामंत रूग्णालयात दाखल

मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उदय सामंत रूग्णालयात पोहचले आहेत.

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने बोलावली बैठक

मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे.

Arundhati Roy: अरुंधती रॉय जे काही बोलल्या ते पूर्णपणे चुकीचे आहे- शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी

शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, "अरुंधती रॉय जे काही बोलल्या ते पूर्णपणे चुकीचे आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जर कोणाला दरी निर्माण करायची असेल त्याला आम्ही विरोध करू. पण, प्रश्न असा आहे की हे प्रकरण 2010 चे आहे आणि गेली 10 वर्षे केंद्रात मोदींचे सरकार आहे''

थोड्याच वेळात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद थोड्यात वेळामध्ये सुरु होत आहे.

सुनावणीचे व्हिडीओ डिलिट करण्याचे केजरीवालांना आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरणाशी संबंधित खटल्यातील सुनावणीचे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

हाजी इक्बालची ४ हजार ४४० कोटींची संपत्ती जप्त

कुख्यात खाण माफिया आणि माजी आमदार हाजी इक्बाल हा दुबईमध्ये लपून बसलेला आहे. त्याच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनऊ येथील ईडीच्या झोनल कार्यालयाने शुक्रवारी ही कारवाई केली. हाजी इक्बालची ४ हजार ४४० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलीय.

भाजपकडून अजित पवारांना डावलण्याचा प्रयत्न

भाजपकडून अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

रक्षा खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणं, हा आनंदाचा क्षण- एकनाथ खडसे

रक्षा खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणं, हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. रक्षा यांचं मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं.

जिंतूरमधल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत जाळपोळ

जिंतूर येशील शासकीय तंत्रनिकेतच्या वसतिगृहामध्ये तोडफोट आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे.

Mumbai North West Lok Sabha constituency : निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच वायकरांच्या मेहुण्याला फोन पुरवला!

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच पुरवला मेंगश पंडीलकरला फोन पुरवल्याची माहिती आहे. याप्रकरणी वनराई पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झालाय. अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तक्रार दिली होती. मतमोजणी सुरू असताना दिनेश गुरवनेच पंडीलकरला मोबाइल पुरवल्याचे तपासात उघड झालंय.

नेस्को सेंटरमध्ये मोबाइल वापरण्याची तक्रार भरत शाह आणि सुरेंद्र अरोरा या अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अधिकारी व पोलिसात केली होती. दिनेश गुरव हा निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर आहे. भादवि कलम 188 नुसार गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मंगेश पंडीलकर हा रवींद्र वायकर यांचा मेहुणा आहे. वनराई पोलिसांनी पंडिलकर विरोधात देखील केला गुन्हा दाखल झालाय.

Chhagan Bhujbal : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या बैठकीकडे भुजबळांची पाठ

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची बैठक होत आहे. या बैठकीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Accident News Live: विहिरीत पोहायला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

विहिरीत बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून वेद तुर्भेकर नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. RCF पोलिसांनी रामभरोसे हॉटेलच्या मालकांना अटक केली आहे. सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी अनंत माहुलकर, दयाराम माहुलकर आणि हरिराम माहुलकर यांना अटक झालीये. माहुलगाव चेंबूर येथील ही घटना आहे. विहिरीत अनधिकृतरित्या बसवलेल्या मोटरचा शॉक लागत असल्याची तक्रार करून देखील कोणतीही उपाययोजना न केल्याचा मालकांवर आरोप आहे.

Anil Deshmukh Live: सांगलीची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी जयंत पाटील आग्रही होते- अनिल देशमुख

सांगलीची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी जयंत पाटील आग्रही होते, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आढावा

  • जम्मू-काश्मीरबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली बैठक

  • बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार

  • गृहमंत्री घेणार जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थिती बाबतचा आढावा

  • गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काश्मीर बाबत पहिलीच बैठक

  • यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतला होता जम्मू काश्मीरचा आढावा

Maha Vikas Aghadi: मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी महत्वाची बैठक, विधानसभेला एकत्रितपणे सामोरे जाणार की वेगळे लढणार?

मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी महत्वाची बैठक, विधानसभेला एकत्रितपणे सामोरे जाणार जाण्याचा संदेश देणार

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि जयंत पाटील, शिवसेनेकडून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती

लोकसभेतील निकालानंतर विधानसभेसाठी प्रत्येक पक्षाकडून जास्तीच्या जागा मिळाव्यात अशी मागणी, मात्र प्रत्यक्षात कोणाच्या वाट्याला किती जागा येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभेत वंचितमुळे काही ठिकाणी मविआला फटका बसल्याने यंदा विधानसभेत वंचित विचार होणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

G7 Summit Updates: भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण व्हावे यासाठी मी इटलीच्या लोकांचे आणि सरकारचे आभार मानतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेला हजेरी लावल्यानंतर इटली सोडताना ट्विट केले, "अपुलिया येथील G7 शिखर परिषदेचा दिवस अतिशय चांगला होता. जागतिक नेत्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली. एकत्रितपणे प्रभावी उपाय तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जागतिक समुदायाचा फायदा व्हावा आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण व्हावे यासाठी मी इटलीच्या लोकांचे आणि सरकारचे आभार मानतो.''

Vijay Namdevrao Wadettiwar Live: विश्वजित कदमांनी संयमाने घेण्याची गरज- विजय वडेट्टीवार

विश्वजित कदम यांनी संयमाने घेण्याची गरज आहे. निवडणुकीत जे झालं ते आता विसरण्याची गरज आहे, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. कदमांच्या एका सभेतील भाषणाप्रकरणी वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलंय.

Mumbai News: हिजाब बंदीच्या विरोधात ९ विद्यार्थिनींची कोर्टात धाव

हिजाब बंदीच्या विरोधात मुंबईतील ९ मुस्लीम विद्यार्थिनींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर कोर्ट काय निर्णय घेतलं हे पाहावं लागेल.

Yoga guru Baba Ramdev : 'राम सर्वांचा आहे, हा देशही सगळ्यांचा आहे'; आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले रामदेव बाबा?

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. या विधानापासून आरएसएसनं स्वतःला दूर केलंय. आता योगगुरू बाबा रामदेव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रभू राम सर्वांचा आहे आणि देशही सर्वांचा असल्याचे त्यांनी म्हटलंय. देशात विभाजनाची बीजे पेरणे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी चांगले नाही.

Srinivas Hegde : चांद्रयान-1 मिशनचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचे निधन

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या चंद्र मिशन चांद्रयान-१ चे मिशन डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे शुक्रवारी बंगळुरू येथे निधन झाले. किडनीशी संबंधित आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. तीन दशकांहून अधिक काळ (1978 ते 2014) त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत काम केले.

Mohan Bhagwat : UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज RSS प्रमुखांची घेणार भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज RSS प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. अलिकडे संघाने भाजप संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट असणार आहे. या सोबतच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आलेले अपयश, यासह योगी हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त आहे. इथे क्लिक करा

Vishalgad : विशाळगडावर बकरी ईदला कुर्बानीसाठी परवानगी

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर प्रशासनाने घातलेली बंदी उठली आहे. या ठिकाणी बकरी ईद आणि उरूसला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. इथे क्लिक करा

Mumbai Police : पोलीस हवालदाराच्या घरी सापडली सुसाईड नोट

शाहूनगर पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस हवालदार विजय साळुंखे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर होते, त्यांनी काल सायन परिसरातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची कथित माहिती आहे. त्यांच्या घरी सुसाईड नोट सापडली असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Sikkim Rain : सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने कहर; 1200 हून अधिक पर्यटक अडकले, सहा जणांचा मृत्यू

उत्तर सिक्कीममध्ये 220 मिमीपेक्षा जास्त पाऊस आणि तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे 1200 हून अधिक देशी-विदेशी पर्यटक सिक्कीममध्ये अडकले आहेत. पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या. तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने काठावरील घरांमध्ये पाणी शिरले.

Anuskura Ghat Landslide : अणुस्कुरा घाटातून 24 तासांनी एकेरी वाहतूक

राजापूर : तालुक्यासह कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात पडलेली दरड युद्ध पातळीवरील प्रयत्नांती बाजूला करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह (Public Works Department) सहकारी यंत्रणेला अखेर यश आले आहे. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून तब्बल २४ वीस तासांनंतर घाटमार्गातून (Anuskura Ghat) वाहतूक सुरू झाली आहे.

Bellary Constituency : ई. तुकाराम यांचा आमदारपदाचा राजीनामा

बंगळूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बळ्ळारी मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेवर निवडून गेलेले काँग्रेस नेते ई. तुकाराम यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तुकाराम हे संडूर मतदारसंघाचे आमदार होते. संडूर मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले तुकाराम यांनी या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या श्रीरामुलू यांच्याविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला होता.

V. Somanna : केंद्रीय मंत्री सोमण्णा पुत्राविरुद्ध एफआयआर

बंगळूर : केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांचा मुलगा अरुण सोमण्णा यांच्याकडून फसवणूक आणि जीवाला धोका असल्याच्या आरोपाखाली त्यांच्यासह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Monsoon Session : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून होणार सुरू

Latest Marathi Live Updates : पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश (नीट) परीक्षेतील कथित अनियमिततेच्या अनुषंगाने देशभरातील न्यायालयांमध्ये ज्या याचिका दाखल झाल्या आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयात वर्ग केल्या जाव्यात, अशी विनंती नीट परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केली आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होणार असून १२ जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात २८ जूनला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तर, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT