भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश-अपयशाची चर्चा झाली. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला केवळ ०.३ टक्के मतं कमी पडले.
: कऱ्हाड रेल्वेस्टेशनवरुन दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना येथील एसटी स्टॅण्डवरुन ओगलेवाडीतील रेल्वे स्टेशनला जावे लागते. मात्र एसटी आगारातुन रेल्वेच्या वेळेत एसटीबस सुटल्या जात नाहीत.एखाद-दुसरी एसटीबस सोडली जाते. त्यात रेल्वेतुन येणारे प्रवाशी अनेक आणि एसटीतुन जाणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भाजपची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित आहेत.
रावसाहेब दानवे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्यात ते कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पक्षातील निरुत्साह दूर करण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्यावर आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ, हरियाणा सहित 9 राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ पुढील 3 महिन्यात संपत आहे. याठिकाणी मोदी सरकार लवकरच करणार राज्यपालांची नियुक्ती करणार आहे.
राज्यातील कोअर नेत्यांची बैठक रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होत आहे. दानवे यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात कोअर कमिटीच्या बैठकीसाठी दोन्ही नेते भाजप मुख्यालयात जाणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी आंदोलकांनी राज्यातील विविध भागांत रास्ता रोको आंदोलन केले.
पीएम मोदींनी 9.26 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा17 वा हप्ता जारी केला.
थायलंडमधील संसदेने आज बहुमताने विवाह समानता विधेयक मंजूर केले. याद्वारे या देशाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.
या विधेयकाला राजाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर अशा प्रकारचा कायदा असलेला थायलंड हा आशियातील तिसरा आणि आग्नेय आशियातील पहिलाच देश ठरणार आहे.
या विधेयकानुसार, कोणताही लिंगभाव असलेल्या विवाहित जोडप्यांना सर्व कायदेशीर, आर्थिक आणि वैद्यकीय अधिकार मिळणार आहेत.
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत प्रचंड उकाडा जाणवत असून यादरम्यान दिल्लीतील विजेच्या आजपर्यंतच्या मागणीचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. येथे सर्वोच्च वीज मागणी आज ८६४७ मेगावॅटवर पोहोचली असून हा नवा विक्रम दुपारी ३:२२ वाजता नोंदवण्यात आला. दिल्लीत अभूतपूर्व उष्णतेमुळे विजेचा वापर जास्त होताना दिसत आहे.
काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेची निवडणुक जिंकली आहे. त्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
भाजारभावाच्या तुलनेत कमी भावात नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची येथील सराफ व्यावसायिकाने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ज्वेलर्सच्या मालकासह मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग चंद्रकांत पेठे आणि तनय पराग पेठे (दोघेही रा. कपिल वास्तू, सहवास सोसायटी, कर्वेनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेला बाप-लेक सराफ व्यवसायिकांची नावे आहेत.
दिल्ली : आग्रा येथील हिरे व्यापाऱ्याचे एक कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचा आरोप असलेल्या 'ठक ठक' टोळीतील दोन सदस्यांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत NEET-UG, 2024 मधील कथित पेपर लीक आणि गैरप्रकारांशी संबंधित याचिकांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्राकडून उत्तर मागितले आहे. जर कोणाकडून 0.001% निष्काळजीपणा असेल तर त्याच्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचे नोंदवले आहे.
सेल्फ सर्व्हिस बॅग ड्रॉपसाठी क्विक ड्रॉप सोल्यूशन पुरवणारे दिल्ली विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे, दिल्ली इंटटरनॅशनल एअरपोर्ट प्रशासनाकडून यासंबंधीचा व्हिडीओ देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: अमेरिकन लोकप्रतिनिधींचे पॉवरफुल प्रतिनिधी मंडळ भारतात पोहचले. धर्मशाळा येथे दलाई लामांची घेणार भेट आहेत.
नॅन्सी पेलोसी, ग्रेगोरी मिक्स, अमी बेरा यांच्यासह एकूण सहा अमेरिकन नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
दोन दिवस अमेरिकन शिष्टमंडळ धर्मशाळा येथे असणार आहे. अमेरिकन शिष्टमंडळाकडून दलाई लामांच्या भेटीनंतर चीनकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसकडून आढावा घेतला जाणार. 24 जून ते 27 जून सलग चार दिवस काँग्रेस घेणार राज्यनिहाय आढावा बैठक घेणार आहे.
25 जूनला महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक होणार.
राज्यनिहाय होणाऱ्या बैठका -
झारखंड - २४ जून
महाराष्ट्र - २५ जून
हरियाणा - २६ जून
जम्मू काश्मीर - 27 जून
क्रिकेट आणि इतर खेळांच्या माध्यमातून पाकिस्तानचे टी-शर्ट,साहित्य भारतात विकून पैसे कमावणाऱ्या कंपन्यांवर आणि खरेदी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे. एकीकडे पाकपुरस्कृत आतंकवादी आपल्या भाविकांवर हल्ला करतात.पाकच्या नापाक कारवायांमुळे आपले जवान, निष्पाप नागरिक प्राण गमावतात. पोलिसांनी ज्यांनी या साहित्याची खरेदी केली त्यांचा डेटा घेऊन चौकशी करावी. अन्यथा हे साहित्य खरेदी करणाऱ्यांना घरात घुसून मारणार असा इशारा देखील मनसेने दिला.
अमित शाह यांनी गुंतवणूकदारांना 4 जून 2024 पूर्वी शेअर बाजारात खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, 4 जूनपूर्वी खरेदी करा, बाजारात तेजी येईल. पण निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याबात इंडिया आघाडी तसेच राहुल गांधींनी याची चौकशी करण्याची मागणी केली होती. अमित शाह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सेबी कार्यालयात अरविंद सावंत, विद्या चव्हाण, सागरीका घोष, साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आदी नेते सेबी कार्यालयात पोहचले आहेत.
नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. आज या महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेते, तसेच सामाजिक संघटनांचा विराट मोर्चा निघाला. खासदार शाहू महाराज, काँग्रेस नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी नेते मोर्चात सहभागी झाले आहेत.
NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या मोशन एज्युकेशन कोचिंगचे CEO नितीन विजय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंच समोर सुनावणी झाली. NEET प्रकरणी नव्या याचिकेवर NTAला नोटीस जारी करण्यात आली आहे. 8 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
पोलिस दलाच्या वतीने महाराष्ट्रात पोलीस भरती सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी Xवर पोस्ट करत युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्र पोलीस दलासाठीची कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरु होतेय. १७,००० पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेत. महाराष्ट्रातले युवक ह्या भरतीकडे अपेक्षेने पाहत आहेत.
परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि काही भागात अजूनही उन्हाळ्याचा फटका बसत असताना ही भरती होत असल्याने सावधानता बाळगायला हवी. भरतीत सहभागी होणाऱ्या युवक-युवतींसाठी पाण्याची, सावलीची, औषधांची सोय असायलाच हवी. वैद्यकीय यंत्रणा चोख असायला हवी.
वातावरणाची तीव्रता वाढल्यास तत्काळ भरती प्रक्रिया स्थगीत करुन पुढची तारिख द्यायला हवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या युवक-युवतींना जरी कठोर परिक्षणातून जावं लागणार असलं तरी त्यात माणूसकी असावी. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या तमाम मित्र-मैत्रणींना खूप खूप शुभेच्छा!
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच्या पहिल्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होणाऱ्या मंत्रिगटाच्या बैठकीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान NDA आघाडीमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात उतरले आहेत. शिवसेना उबाठा गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी झाली आहे. अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडे विशेष रणनीती आखत आहेत. नोंदणीत पिछाडी असल्याने युवा मोर्चाला प्रचारात अधिक मेहनत घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. एका कार्यकर्त्याकडे २५ मतदारांची जबाबदारी देण्यात आलीये. शिवसेना उबाठा गटाचे 'एक शिवसैनिक, एक मतदार' नियोजन आहे. तूर्तास भाजपला मुंबई पदवीधरमध्ये विजय कठीण आहे.
रायबरेली लोकसभा जागा कायम ठेवण्याबाबत आणि वायनाड लोकसभा मतदार संघाचा राजीनामा देण्याबाबत राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला माहिती दिली आहे.
लोकसभा अध्यक्षांना राजीनाम्याच पत्र सादर केल्याची माहिती आहे. कालच राहुल गांधी यांनी वायनाड मतदार संघाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. वायनाड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत .
अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनाला एक वर्ष होत आलं तरी आंदोलकांना वा धरणग्रस्तांना कोणत्याही न्याय मिळाला नसल्याचं आंदोलकांचे म्हणणं आहे. 1972 पासून धरणग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ईव्हीएम वरून सुरु असलेल्या वादादरम्यान त्यांची ही भेट महत्त्वाची आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे पोस्टर फाडले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणी पोस्टर फाडले यासंदर्भात तपास सुरु आहे.
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शेती वाचवा, देश वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
ठाण्यातील काँग्रेसचे नेते आणि जिल्हा प्रवक्ते सचिन शिंदे यांचे पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. काँग्रेस पक्षाचे आंदोलन, तसेच मेळावा यामध्ये सचिन शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. आज मंगळवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज, मंगळवारी (ता. १८) ‘घेरा डालो, डेरा डालो’ मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये २० हजारांहून अधिक शेतकरी आंदोलक सहभागी होणार आहेत. या मोर्चाची शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे जोरदार तयारी करण्यात आली आहे. गावागावांत जाऊन जनजागृती करण्यात आली आहे. दरम्यान, आज समितीचे समन्वयक गिरिश फोंडे, शिवाजी मगदूम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोब बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका अज्ञात यू ट्यूबरवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज विथ कोमल असं या व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून त्यानं मनोज जरंगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल करून जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सुनील कोटकर असं या तक्रारदार सहकार्याचं नाव आहे.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवलाय, असा धमकीचा ई-मेल अज्ञात व्यक्तीने पाठवला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने डेक्कन परिसरात धाव घेऊन हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी बॉम्बशोधक पथकही होते. तपासणीनंतर कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं सांगितलंय.
सातारा : जिल्हा पोलिस दलाच्या वतीने २३५ पदांसाठी बुधवारपासून (ता. १९) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल एक लाख तीन हजार ३० उमेदवारांना अर्ज भरल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज राजधानी दिल्लीत बैठक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीतील राज्यातील अपयशानंतर दिल्लीत होत असलेल्या बैठकीला विशेष महत्व आहे.
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
रावसाहेब दानवे
चंद्रकांत पाटील
आशिष शेलार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच आपल्या लोकसभा मतदारसंघात जात आहेत. आज 18 जूनला नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा आहे. विजयानंतर मतदार संघातील जनतेचे मोदी आभार मानणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली येथे पाहणी केली होती. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीत भाजपकडून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता वितरित करणार आहेत.
Latest Marathi Live Updates : भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीआधी महाराष्ट्रात राजकीय खलबतं सुरु आहेत. वर्षा बंगल्यावर दीड तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतंय. देशात ज्या-ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यांच्या भाजपच्या नेत्यांची केंद्रात महत्वपूर्ण बैठक आहे. संभाव्य जागांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रातील नेत्यांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने २३५ पदांसाठी उद्या बुधवारपासून (ता. १९) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर जिंकलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी-वद्रा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. तर, महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.