दूध पावडरच्या दरात घसरण झाल्यामुळे दूध खरेदी दरात घसरण होत आहे. तसेच, पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किंमती तसेच उत्पादन खर्चात वाढ झाली. याचा विचार करता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ४ ते ५ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रतिलिटर दूधाला ५ रुपये अनुदान मिळाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याला यश मिळाले असून सरकारने प्रति लिटरला ५ रुपये अनुदान योजना ०१ जुलै २०२४ पासून चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
36 तासांपासून एसटी कर्मचारी सच्चिदानंद पुरी याचं एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. कळंब येथील 250 फुट उंचीच्या बीएसएनएल टॉवरवर चढून सुरू आहे आंदोलन. काल सकाळी 6.30 वाजल्यापासून टॉवरवखाली महसुल,पोलीस,आरोग्य व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून आहेत.
जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन दोषी धरण्यात आले. कट्यारे यांच्या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गायिका आशा भोसले यांच्या 'स्वरस्वामिनी आशा' चरित्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुणे ड्रग्स प्रकरणत पुणे पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, या प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे.
भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन गटांत लाठी-काठ्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन हा प्रकार घडला आहे.
कल्याणच्या चक्कीनाका चौकात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना याठिकाणी कसरत करावी लागत आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन यांची रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. झारखंड हायकोर्टाने त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. अखेर ते आज तुरुंगातून बाहेर आले आङेत
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील नाशिक पुणे हायवे रस्त्यावर चिपाचा नाला या ठिकाणी शुक्रवारी सकाळी डिझेल चोरी करणारी टोळी पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. नाशिक पुणे मार्गावर त्याचप्रमाणे नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर गेल्या 10 ते 12 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरीच्या घटना घडल्या मात्र संशयित कधी ताब्यात मिळून आले नाहीत. मात्र आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चिपाचा नाला या ठिकाणी हॉटेल वन पीस च्या समोरच एक स्विफ्ट कार आढळली. ही कार पंचर झाल्यामुळे व सदरच्या कार मध्ये डिझेल चोरी करण्यासाठी ठेवलेले ड्रम रिकाम्या नळ्या आढळून आल्या. ग्रामस्थांना संशयीतांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
केळघर:केळघर-मेढा रस्त्यावर चार चाकी व दुचाकी चा भीषण अपघात, दुचाकी वरील दोघांचा मृत्यू.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामतीच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार देहू येथील मंदिरात दाखल . तुकाराम महाराजांच्या पालखीस सुरवात
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत मात्र विरोधी पक्ष नेते विजय वड्डीवार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असून त्यामुळे बजेट दरम्यान ते अनुउपस्थित राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष यांची परवानगी घेत वड्डेटीवार सभागृहात उपस्थित राहीले नाहीत अशी माहिती समोर येत आहे
संजय शिंदे, (बातमीदार) : मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईच्या धावपळीच्या गतीला ब्रेक लागला आहे. त्यातच मध्य रेल्वेच्या 15 डब्ब्याच्या गाडीत पावसाच्या पाण्याची गळती लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
देहू येथे वारकऱ्यांच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू पालखी प्रस्थानास सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संजय राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय पक्षनेतेपदी नियुक्ती करावी यासाठी पत्र.
शिवसेना UBT पक्षाचा गटनेता म्हणून अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद म्हणून अनिल देसाई यांची नियुक्ती करावी आणि राज्यसभेत संजय राऊत याची गटनेता म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी.
माजी आमदार के.पी. पाटील चेअरमन असलेल्या बिद्री साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून डिस्टलरी प्रकल्पा वर कारवाई केलाय. त्यामुळे ही कारवाई शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्या सांगण्यावरून राजकीय हेतूने झाल्याचा आरोप करत आज कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांनी करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय. या मोर्चात पन्नास खोके एकदम ओके , गुहाटीच्या कामाख्य देवीला विनंती , तुझ्या भक्ताला शेतकरी वाचवण्यासाठी सुद्धबुद्धी दे अशा खोचक आशयाच फलक लक्षवेधी ठरलेतं. यावेळी सरकार आणि आमदार आबिटकर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान सरकारने तातडीने बिद्री कारखान्यांवरील कारवाई मागे घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन उभा करु असा इशारा यावेळी सभासदांनी दिलायं.
झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला. सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे. एनडीए सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी. सत्यमेव जयते!
राज्यात पावसाने जोर धरला असून याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झालाय. एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र कमी न होता वधारलेले पहायला मिळतायत. वाटाणा, फरसबी, शेवगा शेंग, घेवडा, भेंडी या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढेले असून पालेभाज्यांचे दर वाढले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील गटनेते पदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल आहे.
लोकसभेच कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. विरोधकांच्या गोंधळानंतर कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात आंदोलन करण्यात आले आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला आहे. जमीन घोटाळा प्रकरणी सोरेन तुरुंगात आहेत. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
कोल्हापूरचा एन्ट्री पॉईंट असणाऱ्या तावडे हॉटेल परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करत जाम केला. गेल्या आठवड्यात पुणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर उपवादी कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने ८ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीत ८ दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले, "मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या बाहेरील छताचा काही भाग कोसळला आहे. या दु:खद घटनेत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, चार जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे आम्ही आता त्यांची काळजी घेत आहोत आम्ही तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि सीआयएसएफ, एनडीआरएफच्या पथके घटनास्थळी उपस्थित होती आणि त्यांनी कसून तपासणी केली जेणेकरून आणखी कोणतीही जीवितहानी होणार नाही. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे. टर्मिनलची उर्वरित इमारत बंद करण्यात आली आहे आणि यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व गोष्टींची कसून चौकशी केली जात आहे... नुकसानभरपाई देखील जाहीर केली जाईल."
दूधदरासाठी संघर्ष समितीचे आजपासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. दुधाला किमान ४० रुपये दराची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. किमान ४० रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे. अनुदान बंद काळात दूध घातलेल्यांना त्या वेळचे देखील अनुदान द्यावे या मागण्या संघर्ष समितीने केल्या. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात अंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर विमानसेवा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी 55 प्रवाशांनी नांदेड ते पुणे असा प्रवास केला आहे. मागील पाच वर्षपासून बंद पडलेली विमानसेवा स्टार एअर कंपनीने सुरू केली आहे.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथील ब्याडगी तालुक्यात शुक्रवारी पहाटे मिनी बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात १३ जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सर्वजण तीर्थयात्रा करून परतत होते. पोलिसांनी सांगितले की, पीडित शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत आणि ते बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथून यल्लम्मा दर्शनानंतर परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य देशात दरडोई उत्पन्नात मात्र सहाव्या स्थानी आहे. 2021 - 22 मध्ये देशात दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी असलेल्या महाराष्ट्र सरत्या आर्थिक वर्षात सहाव्या स्थानी गेले आहे.
सन 2022-23
1 - तेलंगणा
3 लाख 11हजार 649 कोटी रूपये .
2- कर्नाटक
3 लाख 4 हजार 474 कोटी .
3- हरियाणा
2 लाख 96 हजार 592 कोटी .
4- तमिळनाडू
2 लाख 75 हजार 583 कोटी .
5 - गुजरात
2 लाख 73 हजार 558 कोटी .
6- महाराष्ट्र
2 लाख 52 हजार 389 कोटी .
7- आंध्र प्रदेश
2 लाख 19 हजार 881 कोटी .
8- उत्तर प्रदेश
83 हजार 336 कोटी .
शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानपरिषद निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र अद्याप पाठिंबा मिळालेला नाही. उद्धव ठाकरे गटात जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये, असा एका गटाचा सूर आहे. रायगड लोकसभेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक गट नाराज आहे. जयंत पाटील यांची रायगड लोकसभेसाठी मदत न झाल्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराला अडचणी आल्या, असे एका गटाचे म्हणणे आहे. 2 जुलैला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुढील दोन दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळेल, अशी शेकापच्या जयंत पाटील यांना आशा आहे.
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 मधील छताचा काही भाग कोसळला आहे. उभ्या असलेल्या एका वाहनावर खांब पडल्याची माहिती आहे. सततच्या पावसामुळे एका ठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे. CISF ने तिथं असणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढलं आहे. कुठलीही मोठी दुर्घटना नाही. सध्या अग्निशमन दलाच्या ३ गाड्या विमानतळावर पोहोचल्या आहेत. पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली. या घटनेत ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिल्ली विमानतळ छत कोसळल्या प्रकरणी ट्विट केलं आहे. ते म्हणाले, मी अपघातावर लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी शुक्रवारी संसदेत NEET वैद्यकीय परीक्षेतील गंभीर हेराफेरीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. आजही वाद होण्याची शक्यता आहे.
बंगळूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध सीआयडी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा येडियुराप्पा यांच्यावर पीडितेच्या आईने आरोप करत सदाशिवनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येडियुराप्पा यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवले.
बंगळूर : तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जात असून आज, शनिवारी (ता. २९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. तसेच महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री अमित शहा, तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही भेटणार आहे. गृहमंत्र्यांनी अद्याप वेळ दिलेला नाही, असे त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वैभववाडी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, वेंगुर्लेला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्यामुळे या भागातील कित्येक एकर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, रखडलेल्या भातरोप लागवडीला वेग आला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट तर १ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. इथे क्लिक करा
Latest Marathi Live Updates : आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. तर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकणात ऑरेंज अलर्ट तर १ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. ‘नीट- यूजी’च्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पहिली अटक केली असून, बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.