Marathi News LIVE Updates eSakal
देश

Latest Marathi News Update: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशातील राज्यसभेची जागा काँग्रेसने गमावली, जयराम ठाकूर यांचा दावा

हिमाचल प्रदेशातील राज्यसभेची जागा काँग्रेसने गमावली आहे, असा दावा भाजपचे जयराम ठाकूर यांनी केला आहे

कर्नाटकात काँग्रेसने जिंकल्या तीन जागा , तर भाजपला मिळाली एक जागा

राज्यसभा निवडणूक: कर्नाटकात काँग्रेसने तीन जागा जिंकल्या, तर भाजपला एक जागा मिळाली

न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव, न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की हे लोकपालचे सदस्य असतील.

रास्ता रोको आंदोलन प्रकरणी हडपसरमध्ये २० जणांविरोधात गुन्हा दाखल

हडपसर, ता. २७ : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हडपसर मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलनप्रकरणी वीस कार्यकर्त्यांविरोधात हडपसर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस फौजदार दिनेश विठ्ठल शिंदे ( वय ५२, हडपसर पोलीस ठाणे, गोपनीय विभाग, हडपसर ) यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे.

कॉग्रेसचे नेते बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. साखर संघ मुंबईच्या संचालक रश्मी बागल यांचाही भाजपात प्रवेश झाल्याची माहिती आहे.

जर एक टक्काही दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन- राजेश टोपे

डॉ. राजेश टोपे यांनी त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले यावरुन दिलेलं स्पष्टीकरण आता चर्चेत आलं आहे. मनोज जरांगे यांच्यावरुन माझ्यावर जे आरोप करण्यात आले त्यात जर एक टक्काही तथ्य दिसून आलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन अशा शब्दांत राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Lok Sabha Elections : आपने जाहीर केली उमेदवारांची नावं

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. इस्ट दिल्लीमधून कुलदीप कुमार यांना तिकिट मिळालं आहे. न्यू दिल्लीमधून सोमनाथ भारती, साऊथ दिल्लीमधून साही राम पेहेलवान आणि वेस्ट दिल्लीमधून महाबल मिश्रा हे निवडणूक लढवतील.

हरियाणाच्या कुरूक्षेत्रमधून सुशिल गुप्ता निवडणूक लढवतील.

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेस-राजदला दणका; तीन आमदार भाजपात दाखल

बिहारमधील काँग्रेस आमदार मुरारी प्रसाद गौतम आणि सिद्धार्थ सौरव, तसंच राजद आमदार संगीता कुमारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नाशिकमधील नांदगाव, वडाळी या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे.

Arvind Kejriwal : ईडीचं पुन्हा केजरीवाल यांना समन्स

ईडीने एक्साईज पॉलिसी मनी लाँड्रिंग स्कॅममध्ये अरविंद केजरीवाल यांना आठवं समन्स बजावलं आहे. त्यांना 4 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

Shiv Sena : भाजप पाठोपाठ शिवसेनेचेही तीन मंत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

आगामी लोकसभा निवडणूकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे आणि संजय राठोड यांना लोकसभा निवडणूकीत उतरवले जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाकडून या मंत्र्यांच्या लोकसभा मतदार संघात सर्व्हेद्वारे आढावा घेण्यात येत असल्याचं दिसत आहे. १८ जागा लढवण्यावर शिवसेना खासदार आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय.

मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट

नुकतीच मनसे नेते वसंत मोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचं भीमटोला आंदोलन

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचं भीमटोला आंदोलन सुरु आहे. कुलगुरु विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

संभाजीराजेंची इन्स्टास्टोरी अन् कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली

कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी शाहू महाराजंच्या सोबतचा फोटो इन्स्टास्टोरी ठेवल्यानं चर्चांना उधाण. आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवर अंतिम निर्णय येत असताना संभाजीराजेंच्या स्टोरीची चर्चा सुरु आहे.

मराठी भाषेसाठी जे आवश्यक ते सर्व करेन - राज ठाकरे

आधी कोकणचं कॅलिफोर्निया बनवण्याची स्वप्न दाखवली जायची आणि त्यांना मतं मिळायची. त्यांनी जेव्हा बेवॉच बघितलं तेव्हा ते सगळे विसरले. आत्ता तशी स्वप्न कोणी दाखवत नाही. मराठी भाषा दिन सजरा करणं हे माझ्या पक्षानं सन २००८ मध्ये पहिल्यांदा सुरू केलं. मराठी भाषेसाठी मी जे गरजेचं ते सगळं करेन, त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

मराठा आरक्षण विधेयकाचं कायद्यात रुपांतर; दोन्ही सभागृहात मंजूर 

विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडण्यात आलं होतं. हे विधेयक आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर झालं त्यामुळं आता राज्यपालांच्या सहीनंतर मराठा आरक्षणाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शमीनं लवकर बरं व्हावं, यासाठी PM मोदींच्या ट्विटद्वारे सदिच्छा

क्रॉस वोटिंगच्या भीतीमुळं सपाच्या मुख्य प्रतोदचा राजीनामा

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Amit Shah: अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्चपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची सभा देखील होणार आहे.

Basavraj Patil: काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील भाजपात करणार प्रवेश

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी विधान भवन या ठिकाणी दाखल झाले आहेत.

मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे- अंबादास दानवे

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आले. त्यानंतर विधानभवनाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ बघायला मिळाला. यावर विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

जरांगेच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, राहुल नार्वेकरांचे आदेश

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले आहे.

जरांगेंच्या आंदोलनावर विधान परिषदेतही चौकशीची मागणी

आंदोलनादरम्यान उद्रेक करणारे कोण याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आली. प्रवीण दरेकर यांच्याकडून जरांगेंना अटक करण्याची मागणी केली.

RBIकडून स्टेट बँकेला दोन कोटींचा दंड

ठेवीदार शिक्षण जागरुकता निधी योजनेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व बँकेकडून स्टेट बँक ऑफ इंडियाला दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तामिळनाडूतील 6 मच्छिमारांची श्रीलंका सरकारने केली सुटका

23 जानेवारी रोजी श्रीलंकन ​​नौदलाने अटक केलेल्या तामिळनाडूतील 6 मच्छिमारांची श्रीलंका सरकारने सुटका केली. हे मच्छीमार आज सकाळी चेन्नई विमानतळावर पोहोचले तेथे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

चांद्रयानानंतर, पहिला भारतीय चंद्रावर कधी उतरू शकतो, इस्रो प्रमुखांनी सांगितली तारीख

इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चांद्रयान-३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला आहे. आता अंतराळ संस्थाही मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी तसे संकेत दिले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी 2040 या वर्षाचा उल्लेख केला आहे. सोमवारी त्यांनी मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख केला आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

महाराष्ट्र पोलिसांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध कलम ३४१,१४३,१४५,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रस्ता रोको करण्यासाठी चिथावणी दिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. त्याचबरोबर बीडमध्ये इतर 25 ठिकाणी ट्रॅफिक जाम प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती बीडचे एसपी नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

Marathi Bhasha Gaurav Din : आज 'मराठी भाषा गौरव दिन'

आजचा (27 फेब्रुवारी) दिवस 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न म्हणजेच, 'कुसुमाग्रज'. अर्थातच, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलंय. 

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 15 जागांसाठी तीन राज्यांत आज मतदान

नवी दिल्ली : राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी आज (ता. २७) फेब्रुवारीला तीन राज्यांत मतदान होणार आहे. दर दोन वर्षाला राज्यसभेच्या किमान ३३ टक्के जागांवर निवडणूक होते. उत्तर प्रदेशात दहा जागा, हिमाचल प्रदेशासाठी एक जागा आणि कर्नाटकाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या ५६ जागांपैकी ४१ जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता पंधरा जागांवर निवडणूक होत आहे.

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी

नवी दिल्ली : बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील स्काऊट वाहन आणि कार यांच्यात आज पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर, 6 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणारे चार नागरिकही जखमी झाले आहेत. सर्व 10 जखमींना उपचारासाठी GMCH मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Shrikant Deshpande : मुख्य निवडणूक अधिकारी आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्याचे अपर सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते निवडणूक तयारीची माहिती घेतील. तसेच निवडणुका पारदर्शक वातावरणासाठी प्रशासनाला सूचना देतील. दुपारी साडेचार वाजता ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान; भाजप-धजदला क्रॉस व्होटिंगची भीती

बंगळूर : राज्यसभा निवडणुकीसाठी आज (ता. २७) मतदान होणार असून, भाजपला दोन असंतुष्ट आमदारांचीच चिंता लागून राहिली आहे. भाजपचे असंतुष्ट आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांची काय चाल राहणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एवढेच नाही, तर धजदलाही एका आमदाराच्या क्रॉस मतदानाची भीती वाढली आहे.

Farmer Agitation : शेतकऱ्यांचा 'डब्लूटीओ'ला विरोध, महामार्गांवर ट्रॅक्टर उभे करत रोखली वाहतूक

चंडीगड : पंजाब, हरियाना आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी काल ट्रॅक्टर रॅली काढत जागतिक व्यापार संघटनेबरोबरील कराराला विरोध केला. या करारातून कृषी क्षेत्र वगळावे, अशी मागणी करत या शेतकऱ्यांनी पुतळे जाळले. संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरियानातील अनेक महामार्गांवर ट्रॅक्टर उभे करत वाहतूक रोखली.

Weather Update : नाशिक, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत गारपिटीसह वादळी पाऊस

काल (सोमवार) नाशिक, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली. तसेच आजही बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदियात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Budget Session : अजित पवार आज सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; नव्या घोषणांकडं संपूर्ण राज्याचं लक्ष

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत अंतरवाली सराटीत महिलांच्या हस्ते पाणी घेतले. मात्र, मराठा आरक्षण, ‘सगेसोयरे’ अंमलबजावणीसाठी साखळी उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. तसेच जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याने भाजप नेते आणि आमदार आक्रमक झाले आहेत. प्रसिद्ध गजल गायक पंकज उधास (वय ७२) यांचं काल सकाळी ११ वाजता मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंजाब, हरियाना आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत जागतिक व्यापार संघटनेबरोबरील कराराला विरोध केलाय. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरातील व्यासजी का तहखाना येथे सुरू करण्यात आलेल्या पूजेवर बंदी आणण्याबाबतची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलीये. त्याचबरोबर राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT