Latest Marathi News Live Update Sakal
देश

Marathi News Latest Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या फिल्मसिटीत 60 फूट भिंत कोसळली; 2 जण ठार

बुलंदशहरमध्ये पोहोचली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 

उद्या मराठा आंदोलनासंदर्भात निर्णायक बैठक; जरांगेंची माहिती

मराठा आंदोलनासंदर्भात उद्या निर्णायक बैठक घेण्यात येणार आहे. आंदोलक मनोज जरांगे यांनी ही माहिती दिली आहे. हभप अजय बारस्कर यांच्याकडून जरांगेंवर गंभीर आरोप झाल्यानंतर ही महत्वाची घडामोड घडत आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांचा मुंबई लोकलमधून प्रवास! फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यांनी मुंबई लोकलमधून प्रवास करत सामान्य लोकांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.

Pune Drugs Case : फडणवीस लवकरच पुणे दौऱ्यावर! ड्रग्स प्रकरणात चांगली कामगिरी कराणाऱ्या पोलीसांचा करणार सन्मान

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी ड्रग्स प्रकरणात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस आधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत केले जाणार आहे.

पुणे पोलिसांकडून देशातील अनेक शहरात कारवाई करत 1800 किलो ड्रग्स जप्त केलं होतं. याच ड्र्क्स कारवाईत कामगिरी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील 72 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरवले जाणार आहे.

Elections in Jammu and Kashmir: सगळं ठीक आहे तर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका का होत नाहीत?: ओमर अब्दुल्ला

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर 2018 पासून निवडून आलेल्या सरकारपासून वंचित आहे. 2014 पासून आमची एकही विधानसभा निवडणूक झालेली नाही. सर्वकाही ठीक आहे का? आणि जर जम्मू आणि काश्मीर शांततापूर्ण असेल तर विधानसभा निवडणुका का झाल्या?

Lok Sabha Election 2024: भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदींसह 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता

भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीत पूर्णपणे गुंतला आहे. यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 29 फेब्रुवारीला बैठक होऊ शकते. माहितीनुसार, या बैठकीनंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंना धमकी देणाऱ्यास अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंना धमकी देणाऱ्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने केली आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. एका सोशल मीडियाच्या पोस्टवर मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदेंना मारण्यासाठी मी तुला हत्यार पुरवेन अशी कमेंट आरोपीने केली होती.

Ramdas Athawale: मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीला रामदास आठवलेंचा विरोध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या भेटी सुरू आहेत. मनसेच्या महायुतीतील संभाव्य एन्ट्रीला रामदास आठवलेंचा विरोध आहे. राज ठाकरे भाषण चांगल करतात पण त्यांना मत मिळत नाहीत. त्यांना सोबत घेऊ नये त्यांची आम्हाला गरज नाही.अशी भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.

शरद पवार रायगडावर गेले हे क्रेडिट अजित पवारांचे - देवेंद्र फडणवीस  

चाळीस वर्षानंतर का होईना शरद पवार रायगडावर गेले अजित पवार यांना या एका गोष्टीसाठी क्रेडीट द्यावंच लागेल. असे देवेंद्र फडणीवीस म्हणाले. चर्चेवर किंवा बातम्यांवर कोणाची उमेदवारी ठरत नसते सर्व घटक पक्षांची चर्चा करूनच लवकरच आम्ही महायुतीचे लोकसभेसाठीचे उमेदवार निश्चित करू असेही ते म्हणाले.

जागावाटपा बाबत आमची समाधानकारक बैठक झाली - देवेंद्र फडणवीस 

जागावाटपा बाबत आमची एक बैठक झाली आहे. ती समाधानकारक बैठक झाली आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Nagpur: नागपूरमध्ये विजय पुणेकरांची गोळ्या झाडून हत्या 

नागपूरमध्ये राजनगर पोलीस स्टेशन परिसरात विजय पुणेकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का! ५५ माजी नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा

नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ५५ माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांना पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, "आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलय. "

४० पेक्षा जास्त ठिकाणी रास्तारोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा

राज्यात ४० पेक्षा जास्त ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. रास्तारोकोमुळ वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत.

जालन्यात रास्तारोको दरम्यान पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाली होती बाचाबाची

जालन्यातील धोपटेश्वरमध्ये मराठा आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यावेळी काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलं.

Rahul Narvekar:राहुल नार्वेकर दोन दिवसांच्या वार्डनिहाय दौऱ्यावर

Rahul Narvekar in Worli: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसांच्या वार्डनिहाय दौऱ्यावर आहेत. यावेळी वरळीतील विकासकामांची पाहणी करतील.

गंगास्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टरचा अपघात, १५ जणांचा मृत्यू

गंगास्नान करणासाठी जात असणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये मराठा आंदोलकाने जाळली स्वत:ची दुचाकी

नांदेडमध्ये एका मराठा आंदोलकाने मराठा आरक्षणासाठी स्वत:ची दुचाकी जाळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवसात 5 नवीन AIIMS राष्ट्राला समर्पित करणार

उद्या राजकोट (गुजरात) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवसात 5 नवीन AIIMS राष्ट्राला समर्पित करणार आहेत. AIIMS राजकोट, AIIMS रायबरेली, AIIMS भटिंडा, AIIMS मंगलागिरी आणि AIIMS कल्याणी या आणि शेजारच्या राज्यांतील 50 कोटी लोकांच्या सुपर स्पेशालिटी आणि तृतीय श्रेणीच्या वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण होणार आहे.

राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे काढली भारत जोडो न्याय यात्रा

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे भारत जोडो न्याय यात्रा काढली.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्नधान्य वितरणासाठी 11 राज्यांमध्ये गोदामांचा केला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्नधान्य वितरणासाठी 11 राज्यांमध्ये 11 PACS गोदामांचा शुभारंभ केला आणि दिल्लीतील एका कार्यक्रमात 500 PACS मध्ये गोदामांच्या बांधकामाची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत

Rahul Gandhi: राहुल गांधी उत्तर प्रदेशात दाखल; पुन्हा सुरु होणार यात्रा

राहुल गांधी हे उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथे दाखल झाले आहेत. त्यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरु केली जाणार आहे.

Sharad Pawar: सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह शरद पवार गटाचे नेते रायगडावर उपस्थित

रायगडावर शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण होत आहे. यावेळी रायगडावर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित आहेत.

Sharad Pawar: 'तुतारी'चे अनावरण करण्यासाठी शरद पवार रायगडावर दाखल

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले नवे 'तुतारी वाजवणारा माणूस' चिन्हाचे आज रायगडावर अनावरण केले जाणार आहे. यासाठी शरद पवार रायगडावर दाखल झाले आहेत.

Manoj Jarange Patil: 11 ते 1 वाजेपर्यंतच शांततेत रास्तारोको करा; जरांगे पाटलांचे आवाहन

आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला आहे. 11 ते 1 वाजेपर्यंतच शांततेच आंदोलन करा, त्यानंतर आंदोलन करु नका, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Nashik News: नाशिकमध्ये दुपारी बारावाजेपर्यंत ओपीडी राहणार बंद

नाशिकमध्ये आज दुपारी बारा वाजेपर्यंत ओपीडी बंद राहणार आहे. नाशिकमध्ये डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News: पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत सुप्रिया सुळे, रोहित पवारांची अजित पवारांसोबत बैठक

पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत आज कालवा बैठक झाली. यावेळी बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेश टोपे हे बैठकीला उपस्थित होते.

PM Modi: 28 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोडचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारीला मुंबईतील कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यवतमाळमधून ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करतील.

Mumbai Police Crime Branch : वडाळा परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला अटक

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने वडाळा परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या झहीर अली खान नावाच्या 38 वर्षांच्या अफगाणी नागरिकाला अटक केली आहे. चौकशीत त्याने आपण अफगाण नागरिक असल्याची कबुली दिलीये. तो २००७ पासून मुंबईत राहत होता. पोलिसांनी अफगाण पासपोर्ट, पॅनकार्ड आणि लसीकरण प्रमाणपत्र जप्त केलंय. अटकेनंतर खानविरुद्ध खटला न्यायालयात सादर केला असता न्यायालयाने आरोपीला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये.

Manoj Jarange Patil : पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर; मराठा कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच नोटिसा

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आजपासून मराठा समाजाकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. या जिल्हानिहाय मराठा आंदोलनाच्या पार्श्भूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Muslim Marriage Act : आसाममध्ये मुस्लीम विवाह कायदा रद्द

देशात समान नागरिक कायद्याचे (UCC) वारे वाहून लागले आहेत. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणीच्या संदर्भात असलेल्या ८९ वर्ष जुन्या कायद्याला रद्द करण्याचा आसाम सरकारने निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 10 मार्चपर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आजपासून प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोकोसह विविध प्रकारची आंदोलने होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रविवार (ता. २५) पासून श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर येथे खेटे सुरु होणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण साजरे होणार आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष, संघटनांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी (ता.२६) सकाळी सात वाजल्यापासून १० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

NCP Sharadchandra Pawar : शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचे रायगडावर आज अनावरण

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे.  त्यानंतर आज शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात येणार आहे.

Car Accident  : जत-जांबोटी राज्य महामार्गावर मुगळखोडजवळ अपघातात सहा ठार

रायबाग : दोन दुचाकींना उडवून भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर एकजण जखमी झाला. हा अपघात जत-जांबोटी राज्य महामार्गावर मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी संध्याकाळी झाला.

Udayanraje Bhosale Birthday : उदयनराजेंच्‍या वाढदिनानिमित्त साताऱ्यात आज विविध कार्यक्रम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज (शनिवारी) साधेपणाने; परंतु उत्साहाच्या वातावरणात साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यातील तसेच राज्‍यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यती, कुस्त्यांच्या जंगी लढती, आरोग्य शिबिरे, क्रिकेट सामन्‍यांच्‍या आयोजनासह वृद्धाश्रम, अनाथालये, रिमांड होम, पुरुष भिक्षेकरीगृह, वसतिगृहे, सर्वसाधारण रुग्णालयात अन्नदान तसेच फळ वाटप करण्‍यात येणार आहे. यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रमंडळ सक्रिय असल्‍याची माहिती माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी उपाध्‍यक्ष ॲड. बनकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

Akhil Bhartiya Natya Parishad : महाबळेश्‍‍वरला आजपासून विभागीय नाट्यसंमेलन

महाबळेश्‍‍वर : येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आज शनिवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता उद्‌घाटन होणार आहे. या समारंभास परिषदेचे विश्‍‍वस्‍त, संमेलनाचे मुख्य निमंत्रक, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल, ज्‍येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार मकरंद पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Loksabha Election : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत मुंबईत बैठक

Loksabha Election : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत 26 आणि 27 तारखेला मुंबईत बैठक होत आहे. कोण किती जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी माध्यमांना दिली.

Maratha Community : मराठा समाजाचे आज इचलकरंजीत चक्काजाम आंदोलन

इचलकरंजी : मनोज जरांगे -पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (ता. २४) सकाळी साडेदहा वाजता शिवतीर्थ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण मंजूर केले. त्यासोबत सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, यासाठी मराठा समाजाचे नेते जरांगे- पाटील यांनी मराठा समाजाला येत्या २४ फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

Tanker Bus Accident : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर सिमेंटच्या टँकरची बसला धडक, दोघांचा मृत्यू

नडियाद (गुजरात) : शुक्रवारी उशिरा नडियादमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर सिमेंटच्या टँकरने बसला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस रस्त्याच्या कडेला असलेली रेलिंग तोडून 25 फूट खाली रस्त्याच्या कडेला पडली.

Ajay Maharaj Baraskar : मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. चर्चगेट परिसरात बारस्कर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय. तसेच सुयोग हॅास्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याने डॉ. राठी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाबळेश्‍‍वरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता उद्‌घाटन होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. शंभू आणि खानौरी सीमाभाग रणक्षेत्र बनला आहे. तसेच महाराष्ट्रात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. मराठा आरक्षणावरही वाद-प्रतिवाद सुरु आहेत. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT