Latest Marathi News Live Update  Esakal
देश

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळं याकडं सर्वांच लक्ष लागलंय.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान निवडण्याआधी भाजपचा बायोडेटा तपासा - अमित शहा

पंतप्रधान निवडण्याआधी भाजपचा बायोडेटा तपासा - अमित शहा

ज्यांंनी कलम ३७० हटवण्याला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची आघाडी - अमित शाह

ज्यांंनी कलम ३७० ला विरोध केल्या त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची आघाडी केली आहे. त्यांना लाज वाटली पाहीजे, असे अमित शाह म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासात केंद्राचं मोठं योगदान - अशोक चव्हाण

काँग्रेसमध्ये असताना मी नरेंद्र मोदी यांच्यावर कधीच टीका केली नाही. महाराष्ट्राच्या विकासात केंद्राचं मोठ योगदान आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक

झारखंडच्या दुमका जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कारप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Anil Desai News : 8 तासांच्या चौकशीनंतर अनिल देसाई मुंबई पोलीस मुख्यालयातून बाहेर 

सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर शिवसेना (UBT) नेते अनिल देसाई मुंबई पोलीस मुख्यालयातून बाहेर पडले आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतरही उद्धव ठाकरे गटाने पक्षनिधी काढून घेतल्याच्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. .

जीएन साईबाबाच्या मुक्ततेविरोधातील राज्य सरकारची याचिका हायकोर्टानं फेटाळली

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रा. जीएन साईबाबा यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नुकतीच निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, राज्य सरकारनं हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपिल केलं होतं, पण हे अपिलंही हायकोर्टानं फेटाळून लावलं आहे. त्यामुळं साईबाबा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत या भेटीत चर्चा होणार आहे.

महाविकास आघाडी नावाची तीनचाकी ऑटो पंक्चर झालीए

महाराष्ट्रात तीन चाकांवर चालणारी महाविकास आघाडी नावाची तीनचाकी ऑटो पंक्चर झाली आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी सडकून टीका केली आहे. जळगावमध्ये भाजप युवा संमेलन या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभेसाठी मायावतींच्या बसपानं देखील केली युती; 'या' पक्षासोबत लढवणार निवडणूक

लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडं एनडीए तर दुसरीकडं इंडिया आघाडी अशा युती झालेल्या आहेत. त्यातच राज्या राज्यांमध्येही अनेक युती-आघाड्या झाल्या आहेत. पण उत्तर प्रदेशातील मायावती यांच्या बसपानं अद्याप कुठल्याच युतीत सहभाग घेतला नव्हता. पण आता बसपानं देखील एका पक्षासोबत युती केली आहे. तो पक्ष म्हणजे तेलंगणाताली भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस. त्यामुळं आता बसपा आणि बीआरएस मिळून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगावात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगावमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी रवाना झाला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी घेतलं महाकालेश्वर मंदिरात दर्शन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याठिकाणी दर्शन घेतलं आहे.

NCP Meeting : निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला सुरुवात

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघ आढावा बैठक बोलावली आहे. या दोन दिवसीय बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी आणि इतर उपस्थित आहेत.

Underwater Metro : भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सेवा कोलकातामध्ये सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी (6 मार्च) या मेट्रोचं उद्घाटन होईल.

Rahul Gandhi : मोदींना वाटतं तरुणांनी केवळ जय श्री राम म्हणावं अन् उपाशी मरावं..

काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केली आहे. "देशातील तरुणांनी केवळ जय श्रीराम म्हणावं आणि उपाशी मरावं, हेच मोदींना हवं आहे" असं राहुल गांधी म्हणाले.

Karnataka Government: 'बेंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटक सरकारला ईमेलवर धमकी

कर्नाटक सरकारला काल सोमवारी 4 मार्च रोजी बेंगळुरूला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या मेलमध्ये शनिवारी (9 मार्च) बेंगळुरूमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. ईमेलमध्ये म्हटले आहे की हा स्फोट दुपारी 2.48 वाजता शहरात होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री आणि बेंगळुरू पोलीस आयुक्त यांना लक्ष्य केले जाईल. हा ईमेल शाहिद खान नावाच्या व्यक्तीने पाठवला होता.

Justice Abhijit Gangopadhyay: माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय भाजपमध्ये प्रवेश करणार

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत सांगितले की, "हे हायकमांड ठरवेल मी कदाचित 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो."

ABVP workers: संदेशखाली घटनेप्रकरणी एबीव्हीपीचे दिल्लीत आंदोलन

संदेशखाली घटनेप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीतील बंग भवन येथे आंदोलन केले.

शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

चंद्रहार पाटील आणि ठाकरेंच्या भेटीने चर्चांना उधाण

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ज्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कालच वंचित बहुजन आघाडीकडून पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

गृहमंत्री अमित शाह अकोल्याकडे रवाना

गृहमंत्री अमित शाह अकोल्याच्या दिशेने रवाना झाला आहेत.

मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार- संजोग वाघेरे

मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार निवडूण येणार, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी दर्शवला आहे.

राज ठाकरे दहिसरमध्ये दाखल

राज ठाकरे दहिसरमध्ये दाखल झाले आहेत. ते दहिसर ते मालाड या दरम्यान असलेल्या शाखांना भेट देतील.

विधानसभा अध्यक्षांचा ईमेल हॅक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक झाल्याची बाब उघडकीस आली आहे. नार्वेकरांच्या ईमेलवरुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला. याबाबत मरीन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राहुल गांधी १२ तारखेला धुळ्यात 

खासदार राहुल गांधी १२ तारखेला भारत जोडो न्याय यात्रा घेऊन धुळ्यात आले आहेत.

महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता

महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत येणार असुन यावेळी ते बैठक घेणार आहेत असे म्हटले जात आहे.

Mahavikas Aghadi : ६ आणि ७ तारखेला होणार मुंबईत महाविकास आघाडीची बैठक 

६ आणि ७ तारखेला मुंबईत महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार,उद्धव ठाकरे,प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे

Nitin Gadkari : नितीन गडकरी हे मोदीनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदीनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घ्यायचे नसल्याने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी भाजपकडून लांबविण्यात आली, अशी टीका अखिल भारतीय आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

Accident News: मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोमवारी (४ मार्च) सायंकाळच्या सुमारास घडली. समर्थ परशुराम तायडे (वय ५ वर्ष रा.आमठाणा,ता.सिल्लोड) असं मृत मुलाचे नाव आहे.

Accident News: ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू

ठाणे-बेलापूर मार्गावर इथेनॉल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भरधाव बुलेटस्वराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. कंटेनरला धडक बसताच बुलेटच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला आणि बुलेटने पेट घेतला. या भीषण अपघातात बुलेट चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Amit Shah: गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात

गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी (४ मार्च) रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 186 अधिकारी, 1800 पोलिसांसह एसआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नीच्या ट्रस्टवर ED ची मोठी कारवाई

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याशी संबंधित ट्रस्टवर ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचालनालयानं मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने ट्रस्टची लाखो रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

J. P. Nadda Visit Chikkodi : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज चिक्कोडीत

चिक्कोडी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज, मंगळवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता चिक्कोडीत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी व पक्ष संघटना आणि कार्यकारिणी स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाही हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

येत्या 48 तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, 'हवामान'चा इशारा

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय. येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Sita Soren : दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं माजी मुख्यमंत्र्यांच्या सूनेची याचिका फेटाळली

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्या कुटुंबाचा त्रास वाढत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठानं माजी मुख्यमंत्र्यांची सून सीता सोरेन यांची याचिका फेटाळून लावलीये. त्यांच्यावर मतदानासाठी पैसे घेतल्याचा आरोप होता. 2012 च्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी उमेदवार आरके अग्रवाल यांच्याकडून 1.5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सीता सोरेन यांच्यावर होता.

Pune News : पुणे शहरात 144 कलम लागू

पुणे शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. शहरात विविध कायदे , नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी 144 कलम लागू करण्यात आला आहे. पुणे पोलीस प्रशासनाकडून 31 मार्चपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. 

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर

मुंबई : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केलीये, तर भाजप दुसरी यादी 8 मार्चला जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज 5 मार्च रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे शाह यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Niranjan Hiranandani : ED कडून निरंजन हिरानंदानी यांची चौकशी

मुंबई : हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कथित उल्लंघनाशी संबंधित प्रकरणात चौकशी केली.

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता धूसर

Latest Marathi News Live Update : भाजपनं पहिली यादी नुकतीच जाहीर केलीये. तर, भाजप दुसरी यादी 8 मार्चला जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळं याकडं सर्वांच लक्ष लागलंय. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची मुंबईत बैठक आहे. कोल्हापूर विमानतळाला नवी ओळख देणाऱ्या अद्ययावत आणि नव्या टर्मिनल बिल्डिंगचे उद्‍घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. १०) होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता धूसर असून आता पुढील आठवड्यात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT