Live Update Esakla
देश

Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीचे उमेदवार १५ फेब्रुवारीला अर्ज भरणार- सूत्र

महायुतीचे सर्व उमेदवार १५ फेब्रुवारीला राज्यसभेसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. इच्छूक नेत्यांमध्ये पार्थ पवार, समीर भुजबळ यांची नावं असल्याचं कळतंय.

तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार- मोदी

आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी अबूधाबीमध्ये बोलताना व्यक्त केला.

UAE कडून सर्वोच्च सन्मान मिळाल्याने आभार- नरेंद्र मोदी

मी माझ्या कुटुंबातील लोकांना भेटायला आलेलो आहे. अबूधाबीमध्ये भव्य-दिव्य मंदिराचं लोकार्पण होत आहे. UAE कडून मला सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी आभार व्यक्त केले.

'Ahlan Modi' Event : PM मोदी 'अहलान मोदी'साठी कार्यक्रमस्थळी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'अहलान मोदी' कार्यक्रमासाठी अबुधाबी, यूएई येथील झायेद स्पोर्ट्स स्टेडियमवर पोहोचले आहेत. पंतप्रधान लवकरच येथे भारतीय डायस्पोरांना संबोधित करतील.

कुस्ती महासंघावरील निलंबन हटवलं

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

 अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसचे आणखी  दोन आमदार भाजपमध्ये जाणार?

रत्नागिरी सिंधुदूर्ग येथून नारायण राणे तर पियुष गोयल यांना मुंबईतून लोकसभा निवडणूकीत उतरवलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यादरम्यान काँग्रेसला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता देखील असून अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर मोहनराव हंबर्डे हे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता देखील समोर आली आहे

भारतीय वंशाच्या नागरिकांकडून अबुधाबीतील हॉटेलमध्ये PMमोदी यांचं जंगी स्वागत

अबुधाबीमधील हॉटेलमध्ये भारतीय डायस्पोरा सदस्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

 High Court: उच्च न्यायालयाने दिले भाजपच्या आंदोलनादरम्यान कलम 144  हटवण्याचे आदेश  

पश्चिम बंगाल सरकारला मोठा झटका देत, कलकत्ता उच्च न्यायालयाने कलम 144 अंतर्गत लागू केलेले प्रतिबंधात्मक आदेश काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हा बंगालमध्ये भाजपचा विजय समाजाला जात आहे.

शेतकरी आंदोलनाचा पंजाबला फटका; डिझेल पुरवठा झाला कमी

शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबला बसला आहे. आंदोलनामुळे पंजाबला ५० टक्के डिझेल आणि २० टक्के गॅस कमी प्रमाणात पुरवठा होत आहे.

Farmer Protest: शेतकरी आंदोलन उग्र; शंभू सीमेवर दगडफेक, १३ जण जखमी

दिल्लीतील शेतकरी आंदोलन उग्र होताना दिसत आहे. आंदोलकांनी शंभू सीमेवर दगडफेक केल्याचं कळतय. यात १३ जण जखमी झाले आहेत.

Earthquake In india : मध्य प्रदेश मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथे १६.३८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता.

पंतप्रधान मोदी यूएई दौऱ्यावर; राष्ट्र प्रमुखांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बीन झायद अल नाह्यान यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

Uddhav Thackeray: मविआला नाही भाजपच्या निष्ठावंतांना मोठा धक्का- उद्धव ठाकरे

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा मविआसाठी नसून भाजपच्या निष्ठावंतांना मोठा धक्का आहे. भाजपच्या नेत्यांना पत्रकारांना उत्तरं देता येत नाही. सडलेली पानं झडलेली बरी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Amit Shah: अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह छ. संभाजीनगर दौरा करणार होते. दौरा पुढे ढकलण्याचे कारण समजू शकलेले नाही.

AIMIM chief Asaduddin Owaisi: पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी- असदुद्दीन ओवैसी

मोदी सरकारचे हे अपयश आहे. त्यांनी शेतकऱ्यांची एमएसपीची मागणी मान्य करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात याव्या, असं एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

Protesting farmers: दिल्लीत शेतकरी आंदोलन आक्रमक; सेफ्टी बॅरियर्सची नासधूस

दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी हरयाणा-पंजाब शंभू बॉर्डरजवळील पूलावर लावण्यात आलेल्या सेफ्टी बॅरियर्सची नासधूस केली आहे.

Youth Congress members: भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांचा पाण्याचा मारा

बेरोजगारीच्या प्रश्नावर काँग्रेस युथने काढलेल्या आंदोलनाला पोलिसांकडून विरोध सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा केला.

Sharad Pawar: काँग्रेस प्रभारींनी घेतली शरद पवारांची भेट

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे शरद पवार व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची आज भेट झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

विरोधकांच्या हालचालींना वेग, काँग्रेस नेते-पवारांची बैठक

अशोक चव्हाण यांच्या भाजपात पक्षप्रवेशानंतर विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात वायबी सेंटर या ठिकाणी बैठक सुरु आहे.

अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपचा गमछा

अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितात भाजपत प्रवेश केला.

नेते का काँग्रेस सोडत आहेत, याचं काँग्रेसने आत्मचिंतन कराव- देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'ज्या नेत्यांनी काँग्रेस मोठी केली, ते काँग्रेस का सोडत आहे याचं त्यांनी आत्मचिंतन करावं'

Ashok Chavan Live Updates: तेव्हा आम्ही विकासावर भर दिला होता- अशोक चव्हाण

भाजपात पक्षप्रवेश करताना अशोक चव्हाण म्हणाले की, "मी मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी आम्ही विकासावर भर दिला. "

अशोक चव्हाण यांची भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर स्वाक्षरी

अशोक चव्हाण हे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजप कार्यालयात दाखल

अशोक चव्हाण हे भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. देवेंद्र फडणवीस देखील सागर बंगल्यावरुन निघाले असून, लवकरच ते भाजप कार्यालयात पोहोचतील.

Ashok Chavan : भाजप जो निर्णय घेईल तो मान्य

अशोक चव्हाण यांचा काही वेळातच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची यादी भाजप उद्या जाहीर करणार आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांना स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं मत चव्हाणांना व्यक्त केलं आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं नगरमध्ये जंगी स्वागत

उद्धव ठाकरेंचं नगरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या कारवर बुलडोजरने फुलांचा वर्षाव करण्यात आला. नगरच्या सोनई गावात आज ठाकरेंची सभा होणार आहे.

Devendra Fadanvis : फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक सुरू

एकीकडे भाजप कार्यालयात अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशासाठी तयारी सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे.

Farmer's Protest : दिल्ली-नोएडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा-दिल्ली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत.

Ashok Chavan : चव्हाणांचा दुपारी भाजपमध्ये प्रवेश?

अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश घेतील. या कार्यक्रमासाठी भाजप कार्यालयात जोरदार तयारी सुरू आहे.

पंतप्रधान मोदी युएईसाठी रवाना उद्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीसाठी मुंबईत दाखल

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ते शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरला भेट घेणार आहेत. त्या दिशेनं ते रवान झाले आहेत.

भाजपत प्रवेशापूर्वी अशोक चव्हाणांचा माध्यमांशी संवाद

अशोक चव्हाण हे आज भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. जिल्ह्यातील काही काँग्रेसचे लोकही आपल्यासोबत आहेत असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

NCP Political Crisis: शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका 

शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य आहे त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीसाठी शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्णय प्रकरणात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा याचिकेच्या माध्यमातून दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra News: राज्याचे २० फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात येण्याची शक्यता

राज्याचे २० फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबतचा कायदा पारित केला जाण्याची शक्यता आहे.

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चापूर्वी गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी

शेतकरी आंदोलन 2.0 सुरू झाले आहे. पंजाबमधील शेतकरी दिल्ली रॅलीसाठी रवाना झाले आहेत. हे शेतकरी अमृतसर दिल्ली-राष्ट्रीय महामार्गावरून हरियाणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चापूर्वी गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

Raj Thackrey: राज ठाकरे ओझर गणपतीच्या दर्शनाला

राज ठाकरे ओझर गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरेंचा आज पुणे दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. राज ठाकरे पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आहेत.

Ashok Chavhan: अशोक चव्हाणांसोबत आणखी एका आमदाराचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश?

ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. आज अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Weather Update: कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा

राज्यातील थंडी आता कमी होण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तर राज्यातील काही जिल्हांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.(weather update Maharashtra)

Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी

शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत आहेत. त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.

Ashok Chavan : अशोक चव्हाण आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये करणार प्रवेश

आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप कार्यालयात प्रवेश होणार आहे. अमर राजूरकर हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थित ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Vijay Wadettiwar : एका व्यक्तीच्या जाण्यानं पक्ष कोसळत नाही - विजय वडेट्टीवार

मुंबई : राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोकं येत असतात, तसे जातातही. पण, एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही. या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. मी कायम काँग्रेससोबतच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Farmers Agitation : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू

देशातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून शेती प्रश्नांना घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या शिवाय, कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

New York City : न्यूयॉर्क शहरातील सबवे स्टेशनवर झालेल्या गोळीबारात 1 ठार, 5 जखमी

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्सतील सबवे स्टेशनवर सोमवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून यात पाच जण जखमी झाले आहेत एबीसी न्यूजने पोलिसांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

CM Siddaramaiah : हुबळीतील शेतकऱ्यांच्या अटकेचा मुख्यमंत्र्याकडून निषेध

बंगळूर : हुबळी येथील शेतकऱ्यांना दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाताना भोपाळमधील अटक करण्याची मध्य प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघाकडून बेळगाव सीमाभागांत म्हैस, गाय दूध दरात कपात

गोकुळ दूध संघाकडून (Gokul Dudh Sangh Kolhapur) सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून, महाराष्ट्रील दूध दराच्या तुलनेने म्हैस दूध दरात दोन रुपये कपात केली आहे. तर गायीच्या दूध दरात तब्बल साडेचार रुपये कपात केली आहे.

Manoj Jarange : ..अन्यथा बेमुदत उपोषण मागे घेणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा गुलाल अंगावर घेतला आहे. त्याचा अपमान होऊ देऊ नका. सरकारने अधिसूचना, मसुदा, ‘सगेसोयरे’ आदी निर्णयांची १५ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी करावी; अन्यथा बेमुदत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे दिला.

Kanher Canal : 'कण्‍हेर'च्‍या कालव्‍याला वर्णेजवळ पाणी गळती

बोरगाव : वर्णे (ता. सातारा) या गावाजवळ कण्हेर उजवा कालव्याला गळती लागल्याने धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कालवा दुरुस्त करून गळती काढण्याचे काम झाल्यानंतर पुन्हा पाणी सोडणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

Farmers March Delhi : केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांची बैठक निष्फळ; आज दिल्लीत मोर्चा

चंदीगड : आपल्या विविध मागण्यांसाठी 'दिल्ली-चलो' मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न फसला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमधील बैठक अनिर्णित राहिली. ही बैठक सुमारे पाच तास चालली. एका शेतकरी नेत्यानं ही माहिती देत ​​मंगळवारपासून शेतकरी 'दिल्ली मार्च' सुरू करणार असल्याचं सांगितलं. आज सकाळी दहा वाजता दिल्लीकडं मोर्चा काढू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Jayant Chaudhary : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी 'एनडीए'त दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकदलाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पक्षाच्या सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. ‘चौधरी चरणसिंह यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार माझ्या कुटुंबाच्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोठा सन्मान आहे,’ अशी टिप्पणी जयंत चौधरी यांनी केली.

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पाकिस्तानात कोणाचं सरकार येणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, मुंबई काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT