Latest Marathi News Live Update Sakal
देश

Latest Marathi News Update: झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ते गुंड गणेश मारणेला अटक, दिवसभरात काय घडलं?

अर्थसंकल्पी अधिवेशनाला आजपासून (ता. ३१) सुरुवात होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

युकेमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकणे होणार सोपे, महाराष्ट्र मंडळ लंडन आणि राज्य सरकारसोबत करार

महाराष्ट्र मंडळ लंडन आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकार यांच्यात मराठी भाषेच्या शिक्षणाचा सामंजस्य करार करण्यात आला. मातृभाषेला प्रोत्साहन देणाऱ्या या अभूतपूर्व करारामुळे युके मधल्या स्थायिक विद्यार्थ्यांना मराठी शिकणे सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून घेतले ताब्यात 

कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ताब्यात घेतले

जपानमध्ये मराठी भाषा संस्कृतीसाठी सामंजस्य करार

जापानमध्ये मागील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या मराठी भाषिकांकडून मराठी भाषा आणि तिच्या प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम चालवले जातात, तसेच मराठीच्या संस्कृतीसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमचे आयोजन केले जाते, त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य मराठी भाषा विकास, शालेय शिक्षण आणि जापानमधील एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर (एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर), टोक्यो मराठी मंडळासोबत आज मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.

Attack on PTI party rally: पाकिस्तानमधील पीटीआयच्या रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

पाकिस्तानमध्ये पीटीआय पक्षाच्या रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. यात १० जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे.

MSRTC Shivshahi: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवशाही बसचा अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवशाही बसचा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. अलिबागहून पुण्याकडे बस येत होती. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.

IAS: अमितेशकुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त; निवडणुकीआधी १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमितेशकुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी राज्यात १७ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Acharya Satyendra Das: सत्य समोर आलं, ज्ञानवापी तळघरात पूजेची परवानगी मिळाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया

पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला हे बरं झालं. सत्य समोर आलं. १९९३ पासून तिथे पूजा थांबवण्यात आली होती. पूजा करणे थांबवणे हे चुकीचे आहे. कोर्टाने योग्य निर्णय दिला, असं रामजन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास म्हणाले आहेत.

Jharkhand: झारखंडमध्ये राजभवन, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान परिसरात कलम १४४ लागू

झारखंडमध्ये राजभवन, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि ईडी कार्यालय याच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या विरुद्ध केली तक्रार, मानसिक त्रास दिल्याचा आरोप!

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी ईडीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी ईडीवर छळ केल्याचा आरोप केल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र अन् कर्नाटक राज्याला केंद्रीय गृहखात्याकडून नोटीस!

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. समन्वय समितीची बैठक न झाल्याने नोटीस पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवले पाचवे समन्स

ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. दारू घोटाळ्या प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना ईडीने पाचवे समन्स पाठवले आहे

शासकीय इतमामात बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी न्युमोनियामुळे त्याचं निधन झालं होतं.

ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- अजय चौधरी

ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी केला आहे,

ज्ञानव्यापीत पुढील सात दिवसांत सुरु होणार पूजा

अलाहबाद हाय कोर्टाने ज्ञानव्यापीबाबत हिंदु पक्षाला दिलासा दिला आहे. या निर्णय़ानंतर हिंदु पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी माहिती दिलीये की कोर्टाने पुजेच्या व्यवस्थेचे आदेश दिले आहेत आणि पुढील सात दिवसांत पूजा सुरु होईल.

राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक नाही, काँग्रेसकडून देण्यात आली घटनेची माहिती

काही वेळापूर्वी राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेत राहुल गांधी यांच्या गाडीच्या काचा फुटच्या होत्या. यावर काँग्रेसकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काँग्रेसकडून सांगण्यात आलय की गाडीसमोर अचानक महिला आली, त्यामुळे शेजारी लावण्यात आलेल्या संरक्षक दोरीवर गाडी आदळली.

PM Narendra Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव सन्मान पुरस्कार जाहीर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १९ फेब्रुवारीला ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी साताऱ्यात येतील.

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणी पातळी खालावली

Ujani Dam Water Level Dropped: उजनी धरणाच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

Delhi Excise Policy : केजरीवाल यांना पुन्हा ईडीचं समन्स

ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवीन समन्स जारी केलं आहे. एक्साईज पॉलिसी केसप्रकरणी हे समन्स असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil : ..अन् कायदाच घेऊन आलो

मनोज जरांगे पाटील आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत आहेत. मराठ्यांच्या हक्कासाठी आपण सर्व मुंबईच्या वेशीवर गेलो, आणि आरक्षणाचा कायदाच घेऊन परत आलो, असं ते म्हणाले. सरकारच्या अध्यादेशाचं येत्या 15 दिवसांमध्ये कायद्यात रुपांतर होईल असंही ते यावेळी म्हणाले.

Adhir Ranjan Chaudhary : कुणीतरी गर्दीमध्ये दगड भिरकावला.. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा कटिहारमध्ये पोहोचली आहे. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. याबाबत बोलताना काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी पोलीस तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. ही घटना छोटी आहे, मात्र गंभीर अपघात होण्याचीही शक्यता होती, असं ते म्हणाले.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि यादरम्यान कारच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे..

Uran News: पनवेल उरण लोकलसाठी प्रवासी आग्रही

बेलापुर उरण लोकल सेवा सुरू झाल्याने उरण परिसर नवी मुंबई शहराशी जोडला गेला आहे. परंतु हिच सेवा पनवेल पर्यंत असावी व पनवेल उरण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Chhagan Bhujbal: OBC आरक्षण संकटात येत आहे - मंत्री छगन भुजबळ 

झुंड शाहीच्या पुढे सरकार नमतं घेत आहे. मागच्या दराने आरक्षण दिलं जात आहे. यामुळे OBC आरक्षण संकटात येत आहे. असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Ekanth Shinde: देवेंद्र फडणवीस वर्षां बंगल्यावर दाखल; मुख्यमंत्र्यांची  घेणार भेट 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

Pune News: पुणे विमानतळावर गोंधळ; प्रवाशांचा विमानातच राडा

पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळत आहे. यावेळी प्रवाशांचा विमानातच राडा घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी स्पाइस जेट कंपनीचे विमान तब्बल १५ तास लेट झाले. तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाणाला वेळ लागल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे  सांगतिले.

Snowfall News: जम्मू कश्मीरमध्ये बर्फवृष्टी; वाहतूक ठप्प 

जम्मू काश्मीर मध्ये बर्फवृष्टी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी महामार्गावर पडलेल्या बर्फामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव

जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमाने रद्द

खराब हवामानाचा पुन्हा विमान सेवेला फटका बसला आहे. पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमाने रद्द करण्यात आलेली आहेत. दिल्लीतील हवामानामुळे आणि उत्तरेकडील काही केंद्रांवर आज फ्लाइट रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय.

देश सर्वांगीण विकासाकडे झेपावत आहे- राष्ट्रपती

मागच्या दहा वर्षांमध्ये देश सर्वांगीण विकासाच्या बाबतीत पुढे जात आहे, असं म्हणत राष्ट्रपती द्रोपदी मूर्दी यांनी अभिभाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनामध्ये दाखल 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनामध्ये दाखल झालेल्या आहेत. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे.

मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे. "सागेसोयरे" व "गणगोत" यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे.

ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे ऍड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल केली. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

भाजप हा डरपोक पक्ष आहे, संजय राऊतांची टीका

भारतीय जनता पक्ष हा निवडणुकांना समोरं जाण्यासासून भीत आहे. आम्ही पलटूरामसारखं पलटणार नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला क्लोजर रिपोर्ट दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मात्र क्लोजर रिपोर्ट दाखल करून देखील ईडीचा तपास सुरूच आहे. २० जानेवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल करून देखील आमदार रोहित पवारांची २४ तारखेला ११ तास चौकशी झाली होती. १ फेब्रुवारीला राष्ट्रवादी पुन्हा शक्ती प्रदर्शन करणार आहे.

Ncp : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर आला आहे. कुठल्याही फॉर्मवर सही करू नका, अशा सूचना अजित पवारांनी सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्या आहेत.

Anil Babar Passed Away: मंत्रीमंडळाची आजची बैठक रद्द; कारणही आलं समोर

अनिल बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी राज्यमंत्री मंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Anil Babar Passed Away: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते.

ED आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार; अतिरिक्त सुरक्षा दल तैनात

रांची : कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी म्हणजेच आज रांची येथे ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार आहे. ईडीला लिहिलेल्या पत्रात सीएम सोरेन यांनी आज दुपारी 1 वाजता चौकशीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.

Meteorology Department : महाराष्ट्रात गारठा कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान उत्तर भारताच्या काही भागांत, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, जळगावसह मुंबईत तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तर, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather Update : आज आणि उद्या देशातील काही भागांत पावसाची दाट शक्यता

आज आणि उद्या देशातील काही भागात पावसाची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज जम्म काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात हलक्या पावसाच्या सरी दिसून येतील, असा अंदाज आहे. याबरोबरच पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्येही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

CCB Police : बंगळुरात १.५२ कोटींचे अमली पदार्थ जप्त, सात तस्करांना अटक

बंगळूर : येथील सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री आणि सेवनाविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांनी चार आंतरराष्ट्रीय तस्करांसह सात जतस्करांना अटक केली. पोलिसांनी एक कोटी ५२ लाख ५० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत तीन कोटी किमतीचे ई-सिगारेट जप्त केले आहेत.

Devendra Fadnavis : नागपूर-गोवा मार्गाची अधिसूचना काढा; फडणवीस यांची सूचना

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या नागपूर-गोवा मार्ग या नवीन महामार्गाच्या कामाची अधिसूचना तत्काळ प्रसिध्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

Shetkari Sangh : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवड सोमवारी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता होणार आहे. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे असणार आहेत. संघाला दोन कोटी ३६ लाख संचित तोटा आणि सात कोटी बँकांचे कर्ज आहे. त्यामुळे यातून संघाला सावरण्यासाठी जुन्या जाणत्या संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अमरसिंह माने, प्रवीणसिंह पाटील, जी. डी. पाटील व अजितसिंह मोहिते या चार संचालकांमध्ये चुरस आहे.

Budget Session : अर्थसंकल्पी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Latest Marathi News Live Update : आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधकांच्या महाविकास आघाडीचे (मविआ) बळ वाढले असून प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ला ‘मविआ’त अधिकृतरीत्या सामावून घेण्यात आले आहे. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी गोंधळ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या ११ खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता. ३१) सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून ही घोषणा केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना आजपासून (ता. ३१) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT