Live Update Esakal
देश

Latest Marathi News : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज निर्णय होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमध्ये सूर्यनमस्काराचा जागतिक विक्रम; सुमारे १.३३ कोटी नागरिकांचा सहभाग


राजस्थानात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या सूर्यनमस्कार कार्यक्रमात सुमारे १.३३ कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवत विश्‍वविक्रमाची नोंद केली आहे. लंडन येथील वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांना वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डच्या वतीने या विश्‍वविक्रमाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. गुरुवारी सकाळी साडे दहा ते ११ या वेळेमध्ये राजस्थानमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळांत एकाच वेळी सूर्य नमस्कार घालण्यात आले.

INDIA Alliance: इंडिया आघाडीला भविष्य नसल्याने एक-एक पक्ष साथ सोडत आहेत- अशोक चव्हाण

इंडिया आघाडी काम करत नाही. त्यांच्या बैठकांमधून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे इंडिया आघाडीतील पक्ष सोडून जात आहेत, अशी टीका भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Farmers' protest: तीन केंद्रीय मंत्री शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी हॉटेलवर दाखल;तोडगा निघणार

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय शेतकरी नेत्यांची चर्चा करण्यासाठी चंदीगडच्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

Farmers' protest: पंजाबचे मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांच्या भेटीसाठी दाखल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शेतकरी नेत्यांच्या भेटीसाठी चंदीगडमधील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

Farmers' protest: हरियाणाच्या 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा 17 फेब्रुवारीपर्यंत बंदच

Farmers' protest: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा 17 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

ईडीचा महुआ मोईत्रांना दणका! १९ तारखेला हजर राहण्यासाठी बजावलं समन्स

अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना समन्स बजावले आहे आणि त्यांना कथित प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात 19 फेब्रुवारी रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

तुम्ही काय धृतराष्ट्रच्या भूमिकेत आहात काय? नार्वेकरांच्या निकालावर आव्हाड संतापले 

राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. तसेच मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा गट असल्याचेही नार्वेकर म्हणाले यावर प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

30 जूनला झालेली अध्यक्ष पदी निवड ही असंवैधानिक आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलं. समृद्धी महामार्गाचा ब्रिज तुटला तेव्हा अजित पवार यांना विचारलं तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला माहिती नाही का...शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

एवढं सगळं यांना दिसलं नाही. तुम्ही काय धृतराष्ट्रच्या भूमिकेत आहात काय? आमची आमदारकी रद्द झाली नसली तरी थिल्लरपणा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मला निकालाची काहीच माहिती नाही - अजित पवार 

NCP MLA Disqualification Verdict Live: कायद्याची पायमल्ली कशी करावी हे राहुल नार्वेकर यांच्या कडून शिकावं - जितेंद्र आव्हाड

शिवसेनेप्रमाणेच लागला राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल

आज राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल दिला असे म्हणले जात आहे.

Rahul Narvekar News Live:  शरद पवार गटाचे आमदारही झाले पात्र 

शरद पवार गटाचे सर्व आमदारही पात्र असल्याचे यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Rahul Narvekar News Live: प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही

नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणींशी हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहतोय. त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत असे नाही

Rahul Narvekar News Live: अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही - राहुल नार्वेकर 

अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही कारण त्यांच्याकडे बहुमत आहे असे यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले.

Rahul Narvekar News Live: अजित पवार पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष ; नार्वेकरांचा निकाल

अजित पवार पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

अजित पवार पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष ; नार्वेकरांचा निकाल 

NCP MLA Disqualification Verdict Live: अजित पवारांची निवड   पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही

अजित पवारांची निवडणूक ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही असे यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले. यावेळी ते म्हणाले कि, २९ जुन पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेटला नव्हता. ३० जुन रोजी शरद पवार पार्टी अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन कॅम्प करण्यात आले

NCP MLA Disqualification Verdict Live:  जितेंद्र आव्हाड सभागृहात दाखल

राहुल नार्वेकर निकाल वाचन करत असतांना आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सभागृहात दाखल झाले आहेत.

पार्टीची घटना आणि बहुमत असल्यास पक्ष त्या पार्टीचा होतो

पार्टीची घटना आणि बहुमत असल्यास पक्ष त्या पार्टीचा होतो असे यावेळी नार्वेकर म्हणाले

NCP MLA Disqualification Live: शरद पवार गटाकडून 7 तर अजित पवार गटाकडून 2 याचिका दाखल करण्यात आल्या

शरद पवार गटाकडून 7 तर अजित पवार गटाकडून 2 याचिका दाखल करण्यात आल्या अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली

NCP MLA Disqualification : नार्वेकरांनी निकाल वाचनाला केली सुरवात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला केली सुरवात आहे.

Nana Patole: चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार, आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा 

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपासह सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निकाल लवकरच 

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शरद पवार आणि अजित पवार गट अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच वाचून दाखवतील  

Eknath Shinde: राज्यातील कोणीही उपचारावीना राहणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली जनतेला ग्वाही

संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोणीही उपचारविना राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर येथे दिली.

Farmers Protest: कामगार संघटनांची संयुक्त बैठक होणार; शेतकरी नेते गुरनाम सिंग चारुणी यांनी दिली माहिती

शेतकरी नेते गुरनाम सिंग चारुणी यांनी सांगितले की, "आज तीन निर्णय घेण्यात आले, पहिला निर्णय म्हणजे, उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आम्ही हरियाणाला 3 तास टोल फ्री ठेवू. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येक तहसीलमध्ये ट्रॅक्टर परेड होईल. सर्व शेतकरी आणि कामगार संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.''

Manoj Jarange: ...म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेतय, त्याला तुमचा विरोध- उच्च न्यायालय

मनोज जरांगे यांना औषधोपचार घ्यायला सांगा. मात्र रक्ततपासणी ही त्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हणले आहे. जरांगेंच्या आंदोलनाचा परिणाम म्हणुन काल अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड झाली. अशी माहिती सदावर्तेंनी न्यायालयात माहिती दिली. तुम्ही भारताचे नागरीक आहात म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेतय, त्याला तुमचा विरोध का असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.

Manoj Jarange Healt : जरांगेंनी उपचार घ्यावेत; उच्च न्यायालयाच्या सूचना

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. यावर उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. जरांगेंनी उपचार घ्यावेत अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत

Supriya Sule: पेटीएममध्ये 27 हजार कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळेंच वक्तव्य चर्चेत

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमचे शेअर्स घसरले आहेत. यावर शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पेटीएममध्ये 27 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा पैसा कोणाचा आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

I.N.D.I.A. आघाडीला मोठा झटका, फारुख अब्दुल्लांच जम्मू-काश्मीरमध्ये 'एकला चलो रे'

दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांची I.N.D.I.A. आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व 5 लोकसभेच्या जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Chhagan Bhujbal: जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? - छगन भुजबळ

मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. यावर आज छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भुजबळ म्हणाले, जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय. जरांगेंनी त्रागा करु नये. आरक्षणाचे काम सुरु आहे.

मनोज जरांगे पाटील

Ashok Chavan: काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी अर्ज केला दाखल

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी जाहीर केली. यात नांदेडचे काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे निष्ठावंत डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी अर्ज केला दाखल

Medha Kulkarni : भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने बुधवारी तिघा जणांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश होता. आज त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

खंबाटकी घाटात ट्रक बंद पडला; मोठी वाहतूककोंडी 

खंबाटकी घाटात सहाव्या वळणावर दत्त मंदीराजवळ ट्रक बंद पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळपासून इथं ट्रक 'जैसे थे' अवस्थेत आहेत. तसेच इथं दोन लेन असल्यानं धिम्या गतीनं वहातूक सुरु आहे.

जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात थोड्याच वेळात सुनावणी

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर काही वेळातच सुनावणी सुरु होणार आहे. मनोज जरांगे उपचार घेणार का? हे त्यांचे वकील हायकोर्टात स्पष्ट करतील. कालच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं मनोज जरांगे उपचार घेणार का? असा सवाल केला होता. अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

जरांगेंची प्रकृती खालावली; सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर घेतलं पाणी

मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. अन्नपाणी त्यागल्यानं त्यांची प्रकृती ढासाळली आहे. पण सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी थोडं पाणी घेतल्याचं वृत्त आहे.

मिलिंद देवरा राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल 

मिलिंद देवरा राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांनी अर्ज भरला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानभवनात दाखल झाले आहेत.

विधानभवनात पार पडली काँग्रेसची बैठक, ८आमदारांची अनुपस्थिती

नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला ३६ आमदारांनी हजेरी लावली तर ८ आमदार अनुपस्थित होते.

प्रफुल पटेल यांनी भरला राज्यसभेचा अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे.

राजपुरा रेल्वे स्टेशनवर शेतकरी आंदोलकांचा ठिय्या!

MSP आणि काही अन्य मागण्यांवरुन शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. अशातच काही आंदोलकांनी राजपुरा रेल्वे स्टेशनवर ठिय्या मांडून रेल्वे ट्रॅक अडवला आहे.

बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला 'राम राम'

उद्धव ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय अद्याप केलेला नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, पण त्यांचा उपचार घेण्यास नकार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगेंच्या पोटात तीव्र वेदन होत होत्या, पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

पक्ष निधीचे स्रोत समजले पाहिजे- सुप्रीम कोर्ट

इलेक्टोरल बाँड स्कीमच्या सुनावणी दरम्यान कोर्ट म्हणालं की, मतदारांना पक्ष निधीचे स्रोत समजले पाहिजे.

इलेक्टोरल बाँड्स स्कीम तातडीने रोखण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

इलेक्टोरल बाँड्स योजना सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. यामुळे घटनेच्या कलम १९ (१)(a)चं उल्लंघन होतय, असं कोर्टाकडून नमूद करण्यात आलं.

येरवडा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर, कारागृह अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

येरवडा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कुख्यात आंदेकर टोळीतील कैद्यांकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. यात अधिकारी गंभीर जखमी झाला.

सरकारला मोठा धक्का! सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड्स योजना फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड्स योजना असंवैधानिक ठरवली आहे. निकाल सर्वांच्या मताने एक आहे. काळया धनावर आम्हाला अंकुश ठेवायचा आहे. पण, जनतेला समजलं पाहिजे त्यांचे पैसे कुठे जातात. जनतेच्या अधिकार अबाधित राहिले पाहिजे, त्याचं हनन होता कामा नये. आपले पैसे कुठे जात आहेत हे सरकारला विचारण्याचा मतदाराला अधिकार आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Rajya Sabha Election: राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी प्रफुल पटेल आणि अशोक चव्हाण सिध्दिविनायक दर्शनासाठी दाखल

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी प्रफुल पटेल आणि अशोक चव्हाण सिध्दिविनायक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. अशोक चव्हाण मंदिरातून बाहेर पडत असतानाच प्रफुल पटेल दर्शनासाठी दाखल झाले.

Congress Meeting:  काँग्रेसच्या बैठकीला ६ ते ७ आमदार राहणार अनुपस्थित

काँग्रेसच्या बैठकीला ६ ते ७ आमदार अनुपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं आहे. अनुपस्थित आमदारांनी पक्ष श्रेष्टींकडे न येण्याची कारणं दिल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला कारणं न देता अनुउपस्थित राहणाऱ्यांवर पक्षाची नजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यात 4029 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 3734 हेक्टरवरील शेत पिकांना फटका बसल्याची प्राथमिक सर्वेक्षणात आकडेवारी समोर आली आहे. 10 आणि 11 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.

Jayant Patil: जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारीच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर बाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेणार असा संदेश या पोस्टरमधून देण्यात आली आहे.

Rajyasabha Election : राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

राज्यसभेची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याचा आज शेवटचाच दिवस आहे.

BJP MLA Threat : भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

बंगळूर : कर्नाटकमधील भाजप आमदार गोपालय्या यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधानसभेत सांगितली.

Pregnancy Test : गर्भलिंग निदानाबद्दल डॉक्टरला अटक

कोल्हापूर : शहरातील जुना वाशीनाका येथील बेकायदा गर्भलिंग निदान छाप्यातील संशयित एजंट डॉक्टरला वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथून करवीर पोलिसांनी अटक केली. डॉ. युवराज विलास निकम (वय ३४) असे त्याचे नाव आहे. आजपर्यंत या गुन्ह्यात हा सातवा संशयित अटक केल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. त्याला शुक्रवारपर्यंत ( ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

Kansas Shooting : क्रीडा स्पर्धेदरम्यान कॅन्सस शहरात गोळीबार; दोघांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅन्सस शहरात (Kansas City America) झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत आठ मुलांसह अन्य 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराची ही घटना ‘सिटी चीफ्स सुपर बाउल’ या क्रीडा स्पर्धेदरम्यान घडलीये.

IND vs ENG Test Series : राजकोटमध्ये टीम इंडिया आज इंग्लंडशी भिडणार

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज, 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानावर 8 वर्षांनंतर या दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जाईल. यापूर्वी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात नोव्हेंबर 2016 मध्ये राजकोटमध्ये कसोटी सामना खेळला गेला होता. 

द ज्यूट कॉर्पोरेशनच्या गोदामाला लागली भीषण आग

मोरीगाव, आसाम : आसाममधील मोरीगाव जिल्ह्यातील द ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोदामाला बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Farmer Agitation : शेतकऱ्यांची शंभू सीमेवर पुन्हा धडक, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी ‘चलो दिल्ली’चा नारा दिलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली असून भारतीय किसान युनियन एकता उगराहा या संघटनेने गुरुवारी पंजाबमध्ये चार तासांसाठी रेल्वे मार्ग ठप्प करण्याचा इशारा दिला आहे.

Rajyasabha Election : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

नवी दिल्ली : काँग्रेसने राज्यसभेसाठी काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांना उमेदवारी दिली. तसेच तेलंगणातील युवा नेते अनिल कुमार यादव आणि गांधीकुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या मध्यप्रदेशातील अशोक सिंह यांनाही काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने पक्षाच्या दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने सोनिया गांधी यांना राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीये.

NCP MLA Disqualified Case : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज निर्णय, विधानसभा अध्यक्ष करणार निकालाचं वाचन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज (गुरुवार) निर्णय होणार आहे. नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहा दिवस

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज निर्णय होणार, शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहा दिवस. महायुतीचे उमेदवार एकत्रित राज्यसभेसाठी अर्ज भरणार, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT