Latest Marathi News Live Update  Esakal
देश

Latest Marathi News Update: आज दिवसभरात काय घडलं? प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळल्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली.

सकाळ डिजिटल टीम

प्रफुल्ल पटेल अनंत अंबानी अन् राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी जामनगरमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी जामनगरमध्ये

राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ७ मार्चला सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळल्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली.

ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लवकर सुनावणी घेण्याचा उल्लेख केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण ७ मार्च रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे. सिब्बल यांनी 7 मार्च रोजी खंडपीठाला त्याची यादी देण्याची विनंती केली.

काँग्रेसच्या काळ्या नागांनी इमानदारी विकली- मुख्यमंत्री सुक्खू

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्यानंतर काही अपक्ष आणि एक मंत्री फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यातच मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु यांनी या लोकांवर कठोर टीका केली आहे. काँग्रेसच्या काळ्या नागांनी इमानदारी विकली, अशा शब्दांत त्यांनी टीकास्र डागलं.

महादेव ऑनलाईन बुक प्रकरणी ईडीने ५८० कोटी रुपये गोठवले

महादेव ऑनलाइन बुक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने 580.78 कोटी रुपये गोठवले आहेत.

पुणे शहरात पावसाची भुरभुर

पुणे शहरातील शिवाजी नगर, औंध, बाणेर, सांगवी परिसरात तुरळक स्वरुपात पावसाने हजेरी लावली. या अवेळीच्या पावसामुळे चिंता व्यक्त होत आहे.

संदेशखालीच्या कुटुंबियांना ममतादीदींनी मदत केली नाही- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संदेशखालीच्या बहिणी-मुलींनी आवाज उठवून ममता दीदींकडे मदत मागितली तेव्हा त्या बदल्यात त्यांना काय मिळाले? मुख्यमंत्री ममतांनी तृणमूल नेत्याला वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली असून टीएमसीचा हा गुन्हेगार नेता टीएमसीच्या राजवटीत जवळपास दोन महिने फरार होता.

३.३ टन ड्रग्जचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, "एनसीबीने 3.3 टन ड्रग्ज जप्त केले असून पाच आरोपींना अटक केली. पाच आरोपींची एटीएससोबत संयुक्त चौकशी करण्यात आली होती. त्यापैकी चार मूळचे इराणचे आहेत आणि त्यापैकी एक मूळचा पाकिस्तानचा आहे. हे पाच जण इराणच्या चाबहार विमानतळावरून भारताकडे एकत्र रवाना झाले होते. या साठ्याचे कनेक्शन पाकिस्तानमध्ये सापडू शकते" अशी माहिती त्यांनी दिली.

विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत- मुख्यमंत्री शिंदे

एकाच स्क्रिप्टवरचे विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. सरकारने जनतेच्या हिताची कामं केल्याने विरोधकांकडे मुद्देच नाहीत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुजरातमधील जामनगरला पोहोचला.

Rameshwaram Cafe Blast: बेंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील व्हाईटफिल्ड या गजबजलेल्या भागात स्फोट झाला आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शहरातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ambani Pre Wedding : महेंद्रसिंग धोनी अन् पत्नी साक्षी जामनगरला पोहोचले..

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पत्नी साक्षी हे दोघेही जामनगरला पोहोचले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग समारंभाला हे दोघे उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar : शिंदे-फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं निमंत्रण

बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी शरद पवारांनी तिन्ही पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी पवारांचं हे निमंत्रण नाकारलं आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण येऊ शकणार नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Bengaluru Blast : बंगळुरूच्या कॅफेमध्ये स्फोट; पाच लोक गंभीर जखमी..

बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये भीषण स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कॅफेमधील एका संशयास्पद बॅगेत असणाऱ्या गोष्टीचा स्फोट झाल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरू आहे.

पुणे महालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई   

महामार्गालगत पाषाण-सुतारवाडी इथं महानगरपालिकेच्यावतीनं अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू. अनेक अनधिकृत बांधकामं केली जमीनदोस्त.

2000 च्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर RBIनं जाहीर केली ताजी आकडेवारी

शेअर मार्केट तेजीत; सेन्सेक्स, निफ्टीनं गाठला नवा उच्चांक

विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज एक तासासाठी तहकूब

राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली. या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. तसंच तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील असं त्या म्हणाल्या. मात्र, विरोधकांचं समाधान झालं नाही यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं.

महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसह जामनगरमध्ये दाखल; अनंत अंबानीच्या प्रीवेडिंगला लावणार हजेरी

...तर संघ-भाजपसोबत जाईन - प्रकाश आंबेडकर

वंचित भाजपची बी टीम होत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला अधिकृत बायको होता येत असेल तर ठेवलेली बायको कशाला होऊ? मला ज्याच्याशी युती करायची असेल तर उघडपणे करेल. पुजारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा केल्यास संघ-भाजपसोबत जायला मी तयार आहे, असंही ते म्हणाले.

घोसाळकर गोळीबार प्रकरणाची SIT चौकशी करा; ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधानसभेत केली.

पंतप्रधान मोदींनी झारखंडमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे केले अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खत, रेल्वे, वीज आणि कोळसा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलेल्या 35,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी केले शरद पवारांचे कौतुक 

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोजनाच्या आमंत्रणाचे पत्र दिले आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मा. शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले असे ते म्हणाले तर त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टिकाही केली.

Solapur: ३८ सहकारी संस्थांची निवडणूक लांबली!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया मतदार यादीपर्यंत आहे, त्यांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश निघाले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक थांबविण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्र. एक यासह २९ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे इथपर्यंत आली आहे.

Nashik Anganwadi Recruitment : अंगणवाडी मदतनीसांच्या जिल्ह्यात 501 जागा भरणार

जिल्ह्यातील ५०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले

ठाणे मतदार संघ भाजपला मिळणार?

ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजप निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरु केले आहे,

 प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल

उत्तर प्रदेश : प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात भाविक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.

JNU Delhi: जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा, अनेक विद्यार्थी जखमी

शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाल्याची माहिती आहे.निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात काही विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.

NCB Notice: रत्नागिरी- एसीबीकडून राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस

रत्नागिरी- एसीबीकडून राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस देण्यात आली आहे. जबाबासाठी आज रत्नागिरीच्या एससीबीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजन साळवी यांची पत्नी आणि भाऊ चौकशीसाठी आज हजर राहणार नाहीत. शहरात नसल्याने आज चौकशीला हजर राहता येणार नाही, असं राजन साळवीचं एसीबीला पत्र पाठवलं आहे. 4 मार्च रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची मुभा एसीबीकडून देण्यात आली आहे. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि भाऊ दिपक साळवी यांचा जबाब नोंदवला जाणार होता.

Nashik News: सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवा विस्कळीत

सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवा विस्कळीत झाली आहे. सिटी लिंकच्या तपोवन बस डेपोतील वाहक कर्मचाऱ्यांचा कामावर येण्यास नकार दिला आहे. नाशिक रोड बस डेपोतील बस सेवा सुरळीत झाली आहे. तपोवन डेपोतील कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका कायम ठेवल्याने सलग दुसऱ्या दिवशी एकही बस डेपोतून बाहेर पडू शकलेली नाही.मागील तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने कालपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.तपोवन डेपोतील कर्मचाऱ्यांचा संप कायम असल्याने शहर बस वाहतुकीच्या बस फेऱ्यांवर परिणाम झाला असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Rashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून संघ मुख्यालयाची पाहणी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नागपूरमधील महाल येथील संघ मुख्यालयातील सुरक्षेची पाहणी केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांनी सुरुवातीला संघ मुख्यालयाच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज भोर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्याचा दौरा करणार आहेत.

10th Exam : दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून (शुक्रवार) सुरूवात होत आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

Weather Update : पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण

पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविला अंदाज. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अजून हलका पाऊस, तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Rupali Chakankar : महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर आज जिल्‍हा दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज (ता. १) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता यशवंत मंगल कार्यालय, हुपरी (ता. हातकणंगले) येथे ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे आयोजित महिला मेळावा व वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता कागलकडे प्रयाण व राखीव. दुपारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीला उपस्थिती. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता त्यांचे मोटारीने साताऱ्याकडे प्रयाण होणार आहे.

Vedanta Group : सर्वोच्च न्यायालयाने 'वेदांत समूहा'ची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ‘वेदांत लिमिटेड’ या उद्योग समूहाला मोठा धक्का दिला. तमिळनाडूच्या थोथुकुडी येथील तांबे वितळविण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी उद्योग समूहाची याचिका फेटाळून लावली. २०१८ पासून हा प्रकल्प बंद होता. स्थानिकांच्या आरोग्याची बाब लक्षात घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास न्यायालयाकडून मनाई करण्यात आली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने या समूहाची विशेष याचिका फेटाळून लावली.

LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरचे दर वाढले

एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी आज, शुक्रवार 1 मार्च LPG ते ATF दर अपडेट केले आहेत. आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहे. कोलकात्यात ही वाढ 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपये आहे.

Pune Rain : लोणी काळभोरसह पुण्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग

देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील लोणी काळभोर, हडपसर, तसेच पुण्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळत आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग; 44 जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशच्या राजधानीत गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका सात मजली इमारतीला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत 44 जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले. आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Cooperative Societies Election : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मे'पर्यंत स्थगिती

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. तसेच शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या ३१ मेपर्यंत स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात ३८ हजार ७४० सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार आहेत. तर, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत देशभरातील १८० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर विचार करण्यात आला. बाबरी मशीद पाडल्यानंतर एक वर्षानंतर १९९३ मध्ये देशात मुंबईसह अनेक शहरांतील रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (वय ८१) याची अजमेरच्या ‘टाडा’ न्यायालयाने सुटका केली. केंद्र सरकारने सोलर वीजनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT