Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update: एका क्लिकवर वाचा देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी

सकाळ वृत्तसेवा

Ajit Pawar: शरद पवारांच्या संपर्कात कोणीही नाही, अजित पवारांना आमदारांची ग्वाही

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज मुंबईत झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या संपर्कात कोणीही नसल्याची ग्वाही आमदारांनी अजित पवारांना दिली.

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या एक्झिट पोल अन् शेअर मार्केटच्या नेक्ससवर पियुष गोयल यांचं प्रत्युत्तर

नांदगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

नाशिकच्या नांदवागमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या 'त्या' CISF महिला जवानाची होणार चौकशी

मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून एका माणसाने मारली उडी

मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून एका माणसाने उडी मारली, इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात तो अडकला; त्या व्यक्तीला पोलीसांनी वाचवले असून पुढील चौकशी सुरु आहे.

Rahul Gandhi:  खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम - राहुल गांधी 

खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम झाला. हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ३ जूनला मार्केट वर गेलं. तर ४ ला खाली आलं. ३० लाख कोटी रुपयांचा लॉस झाला आहे.

Latest Marathi News Live Update: आमदार संपर्कात असल्याच्या अफवा - सुनील तटकरे

Latest Marathi News Live Update: फडणवीसांशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला होणार सुरुवात

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मोदी शाहांना भेटणार

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. आज ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

जळगाव-गोव्यादरम्यान आता थेट विमान फेऱ्या

भारतातील नवीनतम विमानसेवा ‘फ्लाय ९१’ ने जळगावमध्ये आपल्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. २४ मेपासून जळगाव (जेएलजी) आणि पुणे (पीएनक्यू) दरम्यान आठवड्यातून चार वेळा व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. जळगाव-गोवा-जळगाव अशा विमान फेऱ्या असणार आहेत.

Vinod Tawade: विनोद तावडे पोहोचले अमित शहांच्या भेटीला

दिल्लीत विनोद तावडे हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीत आज देवेंद्र फडणवीस हे पीएम मोदी आणि अमित शहांची भेट घेणार आहेत.

 Mumbai News: पवईत पोलीसांवर दगड फेक, आंदोलन चिघळलं

भीम नगर परिसरात जय भीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलं. निष्काशनाची कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. .पोलीस जखमी

सुप्रिया सुळेंचे बारामतीत जंगी स्वागत

Baramati News: बारामतीत विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीमध्ये आल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Rahul Gandhi: राहुल गांधी होणार विरोधी पक्ष नेते?

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते बनवा मागणी अनेकांची आहे. २ दिवसांत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशी चर्चा आहे.

Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंरतची ही पहिलीच बैठक आहे.

Manoj Jarange Pati: मनोज जरांगे किल्ले रायगडावर

मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर गेले आहेत. ८ जून पासून जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Maharashtra News: आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक; मोठे निर्णय होण्याची शक्यता

आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडत आहे. आज मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. ४ वाजता ही बैठक होणार आहे.

Devendra Fadanvis:  फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांच्या भेटी

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजीनाम्याची इच्छा मागे घ्यावी यासाठी भाजप नेते त्यांची समजूत काढत आहेत. नेत्यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे नागपूरकडे रवाना झाले आहेत.

Uddhav Thackrey: वर्षा गायकवाड घेणार उद्धव ठाकरेंची घेणार

आज वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. लोकसभेच्या विजयानंतर वर्षा गायकवाड पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता वर्षा गायकवाड भेटण्यासाठी जाणार आहेत.

Mumbai News: मुंबई-चेंबुरमध्ये घरगुती सिलिंडरमध्ये स्फोट; 8 जण जखमी

मुंबई चेंबुरमध्ये घरगुती सिंलिंडरचा स्फोट झाला आहे. यात आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय घराबाहेरील काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

Devendra Fadanvis: फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची वाट लावली. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. त्यांनी पक्ष फोडला. मोदी-शहांपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त खलनायक आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील शिव राज्याभिषेकासाठी रायगडावर दाखल

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले आहेत. आज महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक आहे. त्यासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Central Railway: मध्य रेल्वेवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे संथ गतीने, अनेक रद्द

मध्य रेल्वेवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय अनेक रेल्वे संथ गतीने मार्गक्रमण कर आहेत. त्यामुळे लोकांचा मनस्ताप होत आहे.

Ajit Pawar Meeting: अजित पवार गटाच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक

अजित पवार गटाच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बैठक होत आहे.

Shivaji Maharaj: रायगडावर आज शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा राज्याभिषेक सोहळा आहे. यानिमित्ताने रायगडावर उत्साह पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजयी खासदारांना मुंबईत बोलावलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी खासदारांना मुंबईमध्ये बोलावलं आहे. श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना एनडीए सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा राज्याभिषेक सोहळा आहे. रायगडावर यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एनडीए ७ जून रोजी सत्ता स्थापन करु शकते.नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आज राज्यात अनेक बैठका होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित खासदारांना मुंबईत बोलावलं आहे. अजित पवार आपल्या नेत्यांची बैठक घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT