LIVE Marathi News Updates Esakal
देश

Marathi News Updates: आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर वाचा...

देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र राज्याच्या AICC प्रभारीपदी नियुक्ती

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरतोय- गुलेरिया

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भाष्य केलं आहे. जेएन.१ व्हायरस वेगाने पसरत असून तो प्रभावी ठरत असल्याचं विधान त्यांनी केलंय.

जगदीप धनखड यांचं खर्गेंना पत्राद्वारे उत्तर

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. "आपण 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता किंवा उपराष्ट्रपती निवास येथे आपल्या सोयीनुसार भेटीसाठी वेळ दिल्यास मी आपला आभारी आहे." असं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं. शुक्रवारी खर्गेंनी धनखड यांना पत्र लिहिलं होतं.

हैदराबादमध्ये रुग्णालयाला भीषण आग

हैदराबाद येथील एका रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी पदावरुन प्रियंका गांधी पदमुक्त

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी काँग्रेसच्या (AICC) प्रभारी पदावरून मुक्त करण्यात आले आहे. तर सचिन पायलट यांची छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ड्रोन हल्ल्यात टार्गेट झालेल्या जहाजाशी कोस्टगार्डचा झाला संपर्क

क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टानं दाखल करुन घेतली हे दिलासादायक - भुजबळ

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठीची क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टानं दाखल करुन घेतली ही दिलासादायक बाब असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठ्यांच्या या वेगळ्या आरक्षणाचं त्यांनी स्वागत केलं आहे.

मनोज जरांगेंनी संयम ठेवावा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मनोज जरांगे यांनी आता मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. कारण सुप्रीम कोर्टानंही स्वतंत्र मराठा आरक्षणाबाबतची क्युरिटिव्ह याचिका स्विकारली असून २४ जानेवारीला त्यावर निर्णय देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले आहेत.

"आझाद मैदानात बसण्याची सोय करा"; जरांगेंचा सरकारला सूचना

मनोज जरांगेंनी आझाद मैदानात २० जानेवारीला आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या उपोषणासाठी आझाद मैदानात आमच्या बसण्याची सोय करावी, अशी सूचना जरांगेंनी सरकारला केली आहे.

"जो हिंसा करेल तो आपला नाही"; जरांगेंचं समाजाला आवाहन

"जो हिंसा करेल तो आपला नाही", असं आवाहन मोनज जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे. बीड येथील इशारा सभेतून बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार - मनोज जरांगे पाटील

मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधल्या सभेत केले आहे.

मराठा समाजाला डिवचू नका, सरकारला माझी विनंती - मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला डिवचू नका, सरकारला माझी विनंती असे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी बीडमधल्या सभेतून केले आहे.

मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तस झालं तर सरकारला जड जाईल - मनोज जरांगे पाटील

मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तस झालं तर सरकारला जड जाईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी बीडमधील सभेतून केले आहे.

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी - मनोज जरांगे पाटील

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेतून केले आहे.

भुजबळांनीच त्यांच्या पाहुण्यांचे हॉटेल जाळले आणि त्याचा डाग आमच्यावर लावला - मनोज जरांगे पाटील

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुरूवात झाली असून त्यांनी भाषणात छगन भुजबळांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर खालच्या शब्दांमध्ये टीका

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुरूवात झाली असून त्यांनी भाषणात छगन भुजबळांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

ड्राय स्टेट गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये मिळणार दारू

ड्राय स्टेट असणाऱ्या गुजरातमध्ये तयार होणाऱ्या GIFT सिटीमध्ये दारू विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत बोलताना मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींनी या गिफ्ट सिटीचा पाया रचला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येणार आहे. सोबतच विदेशातील कित्येक पाहुणे याठिकाणी येतील. दारु पिणे हा त्यांच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. त्यामुळेच याठिकाणी दारूला परवानगी देण्यात आली आहे.

भाजप आमदाराचं मराठा आरक्षणाबाबात मोठं वक्तव्य

भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा. असे त्यांनी सांगितले.

ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. तर दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थीतीत ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. ऋतुराजच्या जागी अभिमन्यु ईश्वरनची कसोटी संघात निवड झाली आहे.

बीडमध्ये जमलं भगवं वादळ! मनोज जरांगेंच्या सभेला लाखोंची गर्दी

बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यावेळी मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे.

त्यांचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार का? जरांगेंचा बीडमधून सरकारला सवाल

मनोज जरांगे यांच्या बीडमधील सभेला सुरुवात झाली आहे. यावेळी यावेळी त्यांनी सरकारला सवालही केली. जरांगे म्हणाले की, "त्यांचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार का ? "

राम मंदिर उद्घाटनासाठी महाराष्ट्र भाजपची विशेष तयारी

राम मंदिर उद्घाटनासाठी महाराष्ट्र भाजकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. १८ ते २२ जानेवारी दरम्यान राज्यभरात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

'या' दिवशी ठरणार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला २९ आणि ३० डिसेंबर या दिवशी ठरणार आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल.

मनोज जरांगेंकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मनोज जरांगे यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.

मनोज जरांगे यांच्या बीडमधील भव्य रॅलीला सुरुवात

बीडमध्ये सभेपूर्वी मनोज जरांगे यांच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे बीडमध्ये दाखल, सभेपूर्वी रॅलीचं आयोजन

मनोज जरांगे बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचं बीडमधील जनतेकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेपूर्वी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून करण्यात येणार आहे.

धुक्यांमुळे दिल्ली विमानतळवर खोळंबा!

दिल्ली शहरात मोठ्या प्रमाणात धुकं पडल्याने विमान प्रवासावर प्रभाव पडला आहे. ११ आंतरराष्ट्रीय आणि ५ राष्ट्रीय फ्लाईट्स उशीराने उड्डाण करत आहे.

संसदेत घुसखोरी प्रकरणातील सहावा आरोपी महेश कुमावतच्या पोलिस कोठडीत वाढ

संसद सुरक्षा भंग प्रकरणात अटक करण्यात आलेला सहावा आरोपी महेश कुमावत याच्या पोलीस कोठडीत दिल्ली न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.

नेपाळमधील जानकी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

नेपाळमधील जानकी मंदिराचे मुख्य पुजारी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे, त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांना आणि त्यांचे सहकारी अशा दोघांनाही निमंत्रण देण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची शोध मोहिम सुरुच

पूंछ, जम्मू आणि काश्मीरमधील लष्कराच्या दोन वाहनांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी चालवलेली शोध मोहीम सुरू ठेवली आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच सैनिक ठार झाले आहेत.

मनोज जरांगे अन् बच्चू कडू यांच्यात चर्चा सुरू

मनोज जरांगे यांच्या बीडमधील इशारा सभेपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेटीला पोहचले आहेत. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान चर्चा कुठल्या मुद्द्यावर सुरू आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे असे जरांगे म्हणाले आहेत. संयम किती दिवस पाळायाचा, आम्हाला देखील मर्यादा आहेत. तुम्हीच दिलेले शब्द तुम्ही पाळत नाहीत असे मनोज जरांगे म्हणाले.

जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदाबाबत नितीश कुमार घेणार मोठा निर्णय

जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदावरुन रंजन सिंह यांना हटवण्याची तयारी नितीश कुमार यांनी केली आहे. ते स्वत: अध्यक्षपद सांभाळू शकतात. लालू प्रसाद यादव यांच्याशी रंजन सिंह यांची जवळीक वाढली होती.

सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार? नागपूर पोलिसांनी विधीमंडळास दिली माहिती

नागपूर पोलिसांनी विधीमंडळास सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिलीये. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले आहेत. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे.

२३ जानेवारीला ठाकरे गटाचं नाशिकमध्ये महाशिबिर

२३ जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे. शिबिराच्या माध्यमातून ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करणार आहे.

Latest Marathi News Live Update : जगभरात गेल्या एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ५२ टक्क्यांनी वाढली

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात जगात कोरोना रुग्णांची संख्या ५२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे.

बारामतीसाठी योग्य उमेदवार दिला जाईल- अजित पवार

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये. बारामतीमधून योग्य उमेदवार दिला जाईल, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट आहे.

महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडा

महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्य धक्काबुक्की देखील झाली. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

सोनिया-राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का?

संजय राऊत स्वतः ची मिमिक्री उद्धव ठाकरेंवरती करतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवं वस्त्र परिधान केलं. सोनियांचा जयजयकार केला. सावरकरांना शिव्या घालण्याचं काम केलं. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.

अजून दोन टर्म मीच आमदार होणार - मुश्रीफ

कोल्हापूर : ‘मी अजूनही दोन टर्म येथेच आमदार होणार आहे. तालुक्यातील जनतेची सेवा करायची आहे’, असा मनोदय पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकारांनी विचारलेल्या खासदार होणार का? या प्रश्नावर बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची जाहीरनामा समिती जाहीर; 16 नेत्यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी (22 डिसेंबर) काँग्रेसने जाहीरनामा समितीची घोषणा केली. यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसले. त्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा समावेश नाही.  

मनोज जरांगे-पाटलांची आज बीड जिल्ह्यात निर्णायक इशारा सभा; पाच लाख मराठा बांधव सभेला उपस्थित राहणार 

बीड शहरात आज मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेतून मनोज जरांगे 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत.

मराठा उमेदवारांच्या भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई : ‘मराठा समाजातील उमेदवार आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाहीत,’ असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार व न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आज रद्द केला.

‘मेकर ग्रुप’च्या मालमत्ता होणार जप्त; फसवणूकप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ‘मेकर ग्रुप’ कंपनीच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या मालमत्तांची किंमत सुमारे ११ कोटी इतकी आहे. याशिवाय कंपनीची बँक खाती गोठवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदार कायद्याप्रमाणे मालमत्ता विकण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

प्रसिद्ध कवी, चित्रकार इमरोज यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज (वय ९७) यांचे आज मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. कांदिवली येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अमृता प्रीतम यांच्या नातवाच्या हस्तेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'मविआ'चा जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात

Latest Marathi News Live Update : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केंद्र सरकार यावर लक्ष ठेवून आहे. तसेच देश व राज्यातील हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा सुरु असून काही मुद्द्यांना विरोध होताना दिसत आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने हिजाब बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळं आता हिंदू संघटनांच्या भूमिकेकडं लक्ष राहणार आहे. लोकसभेसाठी 'मविआ'चा जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून शरद पवार व राहुल गांधी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT