Latest Marathi News Live Update  Sakal
देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Lok Sabha Election 2024 Politics News Latest Update: देश-विदेशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.

सकाळ वृत्तसेवा

तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

इंडिया आघाडीचे नेते एकतर तुरुंगात आहेत किंवा जामिनावर- नड्डा

इंडिया आघाडीचे नेते एकतर तुरुंगात आहेत किंवा जामिनावर आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली. ते छत्तीसगड येथील भिलाई येथे बोलत होते.

कर्नाटकमध्ये काँग्रेस १५ ते २० जागा जिंकणार- खर्गे

कर्नाटकात 15-20 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.

 राष्ट्रपतींच्या हस्ते टेनिसपटू रोहन बोपण्णाला पद्मश्री प्रदान

क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टेनिसपटू रोहन बोपण्णाला पद्मश्री प्रदान केले.

बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान योग्य सन्मान मिळवून दिला

बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने अपमान केला आहे. मात्र, भाजप आणि पंतप्रधान मोदींनीच त्यांना योग्य सन्मान मिळावा यासाठी योग्य पाऊले उचलली, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

फेक ओपिनिअन पोल पसरवणाऱ्यांविरुद्ध  एफआयआर

ॲक्सिस माय इंडिया या देशातील आघाडीच्या मतदान संस्थेने आपल्या नावाने बनावट ओपिनियन पोल प्रसारित केल्याबद्दल पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे खाते उघडले

सर्व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे मुकेश दलाल सुरतमधून बिनविरोध निवडून येणार आहेत, अशी माहिती भाजपचे गुजरात प्रमुख सी आर पाटील यांनी दिली.

घाटकोपर येथे 16 वर्षीय मुलाची हत्या; आरोपी 12 तासांत जेरबंद

घाटकोपर पश्चिम विभागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट - 7 च्या पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला 12 तासांत मुंब्रा - दिवा भागातील दातीवली येथून अटक केले आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणी गुजरात मध्ये शोधमोहीम

मुंबईतील अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी वापरलेल्या बंदुकासाठी मुंबई गुन्हे शाखेने गुजरातच्या सुरतमधील तापी नदीत शोध मोहिम राबवली.

बिश्नोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. यावेळी त्यांच्याकडून दोन लाखांची मागणी करण्यात आली.

अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध झाला आहे. सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

शाहू महाराजांना पाठिंबा देऊन MIMला कोल्हापुरात शिरकाव करायचा- दिलीप पाटील

शाहू महाराजांना पाठिंबा देऊन एमआयएमला कोल्हापुरात शिरकाव करायचा आहे. एमआयएमला कोल्हापूरचा बेहराम पाडा आणि भिवंडी करायचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या आडून एमआयएम पश्चिम महाराष्ट्रात हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न करत आहे. हिरवी लाट आम्ही रोखणार, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे नेते दिलीप पाटील यांनी दिली आहे.

केजरीवालांच्या इन्सुलिन देण्याच्या याचिकेवर न्यायालय आज देणार निकाल

केजरीवाल यांच्या जेवन आणि औषधांविषयाच्या (इन्सुलिन देण्याच्या) याचिकेवर राऊज एवेन्यू न्यायालय आज निकाल देणार आहे. १९ एप्रिलला झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यावर आज न्यायालय आपला निर्णय देणार आहे. ईडीकडून केजरीवाल यांच्यावर तुरुंगात जाणीवपुर्वक गोड पदार्थ खात असल्याचा दावा केला होता. केजरीवाल हे कायद्याचा दुरुपयोग करत आहेत असाही युक्तिवाद ईडीकडून कोर्टात केला गेला होता.

केजरीवाल यांना वैद्यकीय जामीन मिळावा म्हणून केजरीवाल गोड पदार्थ खात असल्याचा ईडीचा दावा आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या वकिलांनी केजरीवाल यांच्या घरातून 48 वेळा जेवण आलं आहे, त्यात फक्त 3 वेळेला आंबे आले होते अशी माहिती न्यायालयाला दिली आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट

राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा रविवारी झपाट्याने खाली आला. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, पुणे-मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज (सोमवारी ता. २२) वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, विजांचा गडगडाट होईल, असा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने रविवारी दिला आहे.

Baramati News : बारामतीत गुरुवारपासून चॉंदशाहवली बाबांचा उरुस...

बारामती शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला हजरत पीर चॉंदशाहवली दर्ग्याचा उरुस गुरुवारपासून (ता. 25) सुरु होणार आहे. या उरसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दर्गा कमिटी विश्वस्तांनी दिली.

Pune News: आबा बागुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

आबा बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करा त्यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे केली आहे. काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकमताने वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

,

खारघरमध्ये १२ परदेशी नागरिकांची धरपकड

Navi Mumbai News: खारघर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) रात्री केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान खारघर परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या १२ परदेशी नागरिकांची धरपकड केली. यात १० आफ्रिकन महिला तसेच २ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे

Nashik Crime : अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेत 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हददीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतर्क असलेल्या शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. आचारसंहिता काळात पोलिसांनी अवैध दारुअड्डे, प्रतिबंधित गुटखा आणि अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवून तब्बल ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सुरतला रवाना

सलमान खान घरासमोरील गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सुरतला रवाना झाले आहे. आरोपींनी बंदुक तापी नदीमध्ये फेकली होती. याचा शोध घेतला जाणार आहे.

Sanjay Raut: कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा आहे का? संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

प्रचार सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसने सर्व पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना दिला. यावरुन संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय. कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

CM Eknath Shinde: शिवसेना १६ जागा लढणार; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

शिवसेना शिंदे गट राज्यात १६ जागा लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईतील तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील असं ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

Rahul Gandhi: सोलापूरमध्ये राहुल गांधी यांची प्रणिती शिंदे यांच्यासाठी सभा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सोलापुरमध्ये प्रणिती शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.

Shivsena-NCP: शरद पवार, उद्धव ठाकरेंची आज अमरावती, वर्ध्यात सभा

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज अमरावती आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत.

Pune food poisoning: पुण्याच्या खेडमध्ये कोचिंग सेंटरमधील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

पुण्याच्या खेड तालुक्यातील एका कोचिंग सेंटरमध्ये ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना प्राथमिक तपासानंचर डिचार्ज देण्यात आला आहे. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या होत्या.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज शिर्डीमध्ये सभा घेणार

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जोरदार प्रचार सुरु आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीमध्ये सभा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची लगबग सुरु आहे. अनेकजण आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवाय राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीमध्ये सभा घेणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज अमरावती आणि वर्ध्यामध्ये सभा होणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज सोलापुरात सभा आहे.  एकंदरीत देशभर निवडणुकीचे वातावरण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT