Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update: राज्यासह देशातील महत्वाच्या घडमोडी येथे वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईतून हरवलेली चार भावंडे ग्वाल्हेरला सापडली

मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

गिरगावातील पुरातन विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले होणार

Mumbai News : गिरगावच्या वैद्यवाडी परिसरातील दीडशे वर्षांपेक्षाही अधिक जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये दिल्याचेही लोढा यांनी सांगितले आहे. 

Sambhaji Nagar Crime : लूटमार करणाऱ्या तरुणीला अटक

नगर परिषदेतील शहर समन्वयकाला रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या तरुणीसह तिच्या तीन साथीदारांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ३१ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ हा प्रकार घडला होता. 

अभिजीत बिचुकलेंना कल्याणमध्ये मिळाली ८५५ मते

सिने कलाकर अभिजीत बिचुकलें यांना कल्याणमध्ये ८५५ मते मिळाली आहेत.

Nashik Mig-21: नाशकात पिंपळगावजवळ शिरसगाव येथे हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले

नाशकात पिंपळगावजवळ शिरसगाव येथे हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले आहे. पायलट पॅरेशुट काढून बाहेर पडला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

YS Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींची जादू संपली

आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांची जादू संपल्याचं दिसत आहे. १७४ विधानसभेच्या जागापैकी वायएसआर फक्त २५ जागांवर आघाडीवर आहे, तर तेलगु देसम पार्टी १२५ जागांवर आघाडीवर आहे.

Stock Market Crash: सेन्सेक्स 6000 अंकांनी पडला, निफ्टी 1900 घसरला

लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स 6000 अंकांनी पडलाय, निफ्टी 1900 घसरली आहे.

Vidhan Sabha results Odisha: ओडिशामध्ये विधानसभेत भाजप ८३ जागांवर आघाडीवर

ओडिशा विधानसभेच्या निकालामध्ये भाजप चांगली कामगिरी करत आहेत. भाजपने ८३ जागांवर आघाडी घेतलीये, तर बिजू जनता दलाने ४५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे.

AP Election Results 2024 Live: आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचा डंका, १४५ जागांवर आघाडी

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे भाजप, टीडीएस, जेएसपी आघाडीला १४५ जागांवर आघाडी मिळाली आहे. याठिकाणी विधानसभेच्या एकूण १७५ जागा आहेत.

Share Market: निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड

लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांचे १४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

Vidhan Sabha results · Odisha: ओडिशात भाजप ३४ तर बिजू जनता दल २० जागांवर आघाडीवर

ओडिशात विधानसभेच्या १४७ जागा आहेत. यात भाजप ३४ तर बिजू जनता दल २० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे.

latest updates on the election results: आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी ५० तर वायएसआर ११ जागांवर आघाडी

आंध्र प्रदेशच्या विधानसभेची मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या कलानुसार तेलगु देसम पार्टी ५० जागांवर आघाडीवर आहे, तर जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर हा ११ जागांवर आघाडीवर आहे.

AP Election Results 2024 Live TDP : आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी १७५ पैकी ३० जागांवर आघाडी

आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेचे सुरुवातीचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. १७५ पैकी ३० जागांवर तेलगु देसम पार्टी आघाडीवर आहे.

Odisha Legislative Assembly elections 2024: ओडिशामध्ये विधानसभेच्या निकालासाठी मतमोजणी सुरु, बिजू जनता दल आघाडीवर

ओडिशामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेसाठी मतमोजणी सुरु आहे. राज्यात १४७ विधानसभेच्या जागा आहेत. ताज्या कलानुसार, बिजू जनता दल आघाडीवर दिसत आहे.

AP Election Results 2024 Live: सुरुवातीच्या कलानुसार आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू आघाडीवर

आंध्र प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि एनडीए आघाडीवर आहे. जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर पक्ष पिछाडीवर आहे.

Mansoon News: राज्यात दोन दिवसआधीत मान्सून दाखल होण्याची शक्यता 

मान्सूनची चांगली वाटचाल सुरु असून दोन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ ते ५ डिग्री तापमानात घट झाली आहे

देशात आज लोकसभा निकालाचे वातावरण आहे.  आज केंद्रात कुणाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, मान्सूनची वाटचाल वेगाने सुरु आहे.  मान्सून दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT