Marathi News LIVE Updates eSakal
देश

Latest Marathi News Update: नालासोपाऱ्यात पांडे नगर परिसरात ३२ वर्षीय तरुणाचा खून

यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळं या महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार तपोवन येथील मैदानावर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नालासोपाऱ्यात पांडे नगर परिसरात ३२ वर्षीय तरुणाचा खून

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पांडे नगर परिसरात ३२ वर्षीय तरुण सुधीर सिंग याचे अपहरण करून त्याच्यावर धारदार शस्त्र, तलवार आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे, हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पेल्हार पोलीसांनी ही माहिती दिली आहे.

राज्यसभेचे पुढील अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार

राज्यसभेचे पुढील अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेच्या सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल आणि अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल: राज्यसभा सचिवालय

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिक लोकांसह साजरा केला लोहरी सण

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिक लोकांसह लोहरी सण साजरा केला.

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्या उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा आहे. याठिकाणी ते शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देणार आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील पार पडणार आहेत. उद्धव ठाकरे अंबरनाथ-टिळकनगर, नेवाळी, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा या ठिकाणी भेटी देणार आहेत. हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे.

PM मोदी भाषण संपताच तडकाफडकी का निघून गेले?

मुंबईतल्या कार्यक्रमातलं भाषण आटोपताच मोदी हे मंचावरुन तडकाफडकी निघून जाताना दिसले. ज्याची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा होत आहे. याच कारणही आता समोर आलं आहे. त्यांना वेळेत उड्डाण करणं गरजेचं होतं त्यामुळं ते निघून गेल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे मेट्रोच्या कासारवाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक स्पार्किंग; एक मार्गिका बंद  

पुणे मेट्रोमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ईलेक्ट्रिक स्पार्किंगमुळं बिघाड झाला. त्यामुळं ही मेट्रो सध्या मार्गात थांबली असून यामुळं एक मार्गिका बंद झाली आहे. ही मेट्रो ६:३७ वाजता चिंचवड येथून निघाली होती तीच्यामध्ये कासारवाडी स्टेशनवर sparking झालं. त्यामुळं एक मार्गिका बंद झाली होती.

राजकारणात धर्म नको पण भाजपाचं राजकारण धर्माच्या आधारावर -  पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचं कार्य केलं. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचं काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही, परंतु भाजप धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली.

लष्करच्या ८ दहशतवाद्यांविरोधात NIAनं दाखल केलं आरोपपत्र

Latest Marathi News Live Update: 10 वर्षामागे हजारो कोटींच्या मेगा स्कॅमची चर्चा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना विरोधकांवर देखील निशाणा साधला. मोदी म्हणाले की गेल्या 10 वर्षात देश किती बदलला याचं एक उदाहरण म्हणजे 10 वर्षापूर्वी देशातील हजारो कोटींच्या मेगा स्कॅमची चर्चा होत होती. आता 10 वर्षांनी देशात होणाऱ्या हजारो कोटींच्या मेगा प्रोजेक्टची चर्चा होते.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी जपानच्या माजी पंतप्रधानांची काढली आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अटल सेतूचे उद्घाटन करताना जपानचे माजी दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण काढली.

Latest Marathi News Live Update: मुंबईशी निगडीत 35,000 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी सांगितले की आज मुंबईत जवळपास 35 हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन झाले आहे. यातील बहुतांश विकासकामे ही महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आल्यावर सुरू झाली होती.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषण केलं सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील अनेक विकास कामांचे लोकार्पण केल्यानंतर मराठीतून भाषण सुरू केलं. यावेळी त्यांनी मुंबईच्या अटल सेतूच्या उद्घाटनाकडे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधानांच्या हस्ते बेलापूर - पेंधर नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बेलापूर - पेंधर नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलं. याचबरोबर उरण - बेलापूर रेल्वे मार्गिकाचे देखील लोकार्पण करण्यात आलं.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे केले लोकार्पण 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईतील विविध रेल्वे मार्गांचे लोकार्पण केलं.

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वांनी उभे राहून पंतप्रधानांना दिली मानवंदना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी असलेल्या सर्वांना पंतप्रधानांना उभे राहून मानवनंदना देण्याचं आव्हान केलं. त्यानंतर सर्वांनी उभे राहून पंतप्रधानांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधानांचे मोकळ्या मानाने स्वागत केलं असतं.

Latest Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकीनंतर भूकंप येणार तो विरोधकांना सहन होणार नाही; मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

अटल सेतूच्या उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हा सेतू मोठा भूकंप देखील सहन करू शकतो. मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठा भूकंप येणार आहे तो भूकंप सहन करण्याची क्षमता आमच्या विरोधकांमध्ये नाही.

Latest Marathi News Live Update : मोदीराजमुळंच अटल सेतू झाला. 

मोदींचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदीराजमुळेच अटल सेतू होऊ शकला. जर मोदीराज नसतं तर हा सेतू झालाच नसता. मोदींनीच या सेतूचं भूमीपूजन केलं आणि उद्घाटन देखील त्यांच्याच हातून होत आहे.

Latest Marathi News Live Update: अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदींमुळे तरूणांची स्वप्नं पूर्ण होत आहेत. 

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना नरेंद्र मोदींमुळे देशातील सर्व तरूणांची स्वप्ने पूर्ण होत असल्याचे गौरवउद्गार काढले.

Latest Marathi News Live Update: चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्वीट 

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट केलं की, मोदीजी बोले, जय श्रीराम मोदीजी लिखे,जय श्रीराम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंडावर संकल्प आणि गोदापूजन केल्यावर अभिप्राय वहीत जय श्रीराम लिहिलं.

Latest Marathi News Live Update: संजय सिंह, स्वाती मालीवाल यांची राज्यसभेवर निवड 

राज्यसभेचे खासदार म्हणून संजय सिंह, स्वाती मालीवाल आणि एनडी गुप्ता यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी आशिष कुंद्रा यांनी तिघांनाही प्रतिज्ञापत्र दिले.

Latest Marathi News Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नरेंद्र मोदींच केलं स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा सभास्थळी दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच अटल सेतूचे उद्घाटन केलं असून त्यांचा ताफा आता सभास्थळी दाखल झाला आहे. मोदी फुलांनी सजवलेल्या गाडीमधून सभास्थळी पोहचले. यावेळी मोदींसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री देखील होते.

Latest Marathi News Live Update : सीपीआयचा राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यास नकार

सीपीआयचे सचिव डी राजा यांनी सांगितलं की आमचा पक्ष अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीये. कारण हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएस पुरस्कृत राजकीय कार्यक्रम आहे.

Atal Setu Bridg : अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत

अटल सेतूच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी अटल सेतूची माहिती घेतली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

PM Modi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. आज त्याचे उद्घाटन झाले आहे. देशातील सर्वात लांब सागरी पुल अशी या सेतुची खास ओळख आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

पंतप्रधान मोदी 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विकास प्रकल्पांचेही लोकार्पण करणार आहेत. हजारो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला अटल सेतू मुंबईला नवी मुंबईशी जोडणार आहे. अंदाजानुसार, दररोज सुमारे 70 हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे 400 कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याशिवाय ट्रॅफिक प्रेशरची माहिती गोळा करण्यासाठी AI आधारित सेन्सर बसवले आहेत.

Sunil Kedar: केदार समर्थकांची १० वाहने जप्त; सूचनापत्र देऊनही काढली रॅली

माजी मंत्री सुनील केदार यांची कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे धंतोली पोलिसांनी त्यांच्यासह शंभरावर समर्थकांविरोधात विविध कलमांसह गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी रॅलीमधील १० वाहने जप्त केली असून काहींना धंतोली ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले. शिवाय गुन्ह्यात एका नव्या कलमाचा समावेशही केला आहे.

RajniDevi Patil:  रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Modi: मोदी आणि शिंदे एकाच हेलिकॉप्टरने नवी मुंबईला रवाना 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हेलिकॉप्टने नवी मुंबईला रवाना  झाले आहेत.

Congress: पुणे लोकसभेच्या जागेवर कांग्रेसचा दावा?

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी हि इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे पुणे लोकसभेच्या जागेवर कांग्रेस पक्षाचा दावा असल्याचे म्हटले जात आहे.

PM Modi: घराणेशाहीने देशाचं मोठं नुकसान केलं 

घराणेशाहीच्या राजकारणाने आपल्या देशाचं मोठं नुकसान केलं आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi in Nashik: सरकार युवकासांठी देशाचा विकास करत आहे

सरकार देशातील युवकासांठी काम करत आहे. देशात झालेला विकास हा युवकांसाठी आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले

PM Modi in Nashik:  माझा देशातील युवकांवर विश्वास; मोदींनी केले भावनिक प्रतिपादन 

माझा देशातील युवकांवर विश्वास आहे असे भावनिक प्रतिपादन मोदींनी भाषणावेळी केले. ते नाशिकमध्ये बोलत आहेत.

PM Modi: मला काळाराम मंदिर साफसफाई करण्याचे सौभाग्य मिळाले

मला काळाराम मंदिर साफसफाई करण्याचे सौभाग्य मिळाले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे भाषणात म्हणाले.

PM Modi: मोदींनी नाशिक मध्ये मराठीत दिल्या जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा

नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणावेळी काही ओळी मराठीत म्हणाले. यावेळी त्यांनी जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा मराठीत दिल्या

PM Modi: थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार युवकांना संबोधित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथून थोड्याच वेळात देशातील युवकांना संबोधित करणार आहेत.

PM Modi: पंतप्रधान मोंदींसमोर युवांकडून देशभरातील संस्कृतीचं प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर युवांकडून देशभरातील संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी विविध कला सादर करण्यात आल्या. मोदींनी देशील सर्वांना प्रोत्साहन दिल.

नाशिक ढोलच्या तालात रमले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या समोर नाशिक ढोल पथकाने ढोल वाद्याचे प्रदर्शन केले. यावेळी नाशिक ढोलच्या तालात पंतप्रधान मोदी रमले असल्याचे पाहायला मिळाले.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान- अनुराग ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

PM Modi Nashik: पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल; 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताने सुरूवात

पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल झाले आहेत. 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताने सुरूवात झाली आहे.

PM Modi Nashik Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल; महंतांच्या उपस्थितीत मंदिरात पूजा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात महंतांच्या उपस्थितीत मंदिरात पूजा केली. यानंतर तपोवनमध्ये जाहीर सभा होणार आहे.

PM Modi Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल; महंतांच्या उपस्थितीत मंदिरात पूजा सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले आहेत. महंतांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात पूजा सुरू आहे.

PM Modi Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शनाकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिराकडे दर्शनाकडे आणि आरतीसाठी रवाना झाले आहेत.

PM Modi Nashik : पंतप्रधान मोदींनी गोदावरीचे पाणी हातात घेऊन केलं अर्घ्य दान

पंतप्रधान मोदींनी गोदावरीचे पाणी हातात घेऊन अर्घ्य दान केलं आहे.

PM Modi Nashik: रामतीर्थावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गोदावरी पूजन सुरु

रामतीर्थावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गोदावरी पूजन सुरु आहे.

PM Modi Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आटोपला; रामतीर्थकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पुर्ण झाला असून ते रामतीर्थकडे रवाना झाले आहे आहेत.

Lok Sabha Election: भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास प्रफुल्ल पटेल तयार

भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास प्रफुल्ल पटेल तयार असल्याची माहिती आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत आहे. त्यामुळे त्या जागेवर आमचा क्लेम राहणार. माझ्या तयारीचा प्रश्न असेल, तर मी सदैव तयार असतो. पण भंडारा गोंदियाच्या जागेबाबत तिन्ही पक्ष मिळून ठरवणार आहेत. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहे. राज्यात प्रत्येक रिजनमध्ये जागा हव्या आहेत. लोकसभेच्या जागावाटपात भाजपच्या नेतृत्त्वात होईल. भाजपच्या जास्त जागा आहेत. भाजपला जास्त जागा मिळणार असल्याचं पटेलांनी म्हटलं आहे.

PM Modi Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल; रोड शो साठी नाशिककरांची मोठी गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज मोदी काळाराम मंदिरात दर्शन व आरती, तसेच कुंभमेळा होणाऱ्या त्या गोदाघाटाची पाहणी व शक्य झाल्यास तेथेही आरतीचा कार्यक्रम होणार आहे. तर मोदींच्या नाशिकमधील दौऱ्यावेळी रोड शो होणार आहे, यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी केली आहे.

Anurag Thakur: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्रंबकेश्वर येथे केले विधीवद पूजन

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सकाळी त्रंबकेश्वर येथे विधीवद पूजन केले आहे.

Atal Setu : अटल सेतूच्या उद्घाटनाला ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

एनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण येऊन सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे.

प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी सुरू केलं विशेष अनुष्ठान

अयोध्या मध्ये रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. माझं नशीबवान आहे की या पवित्र क्षणी मी उपस्थित असेल. सर्व भारतीय नागरिकांचे मी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रतिनिधीत्व करत असेल. या पार्श्वभूमिवर मी ११ दिवसांचे अनुष्ठान सुरू करत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. सर्व जनतेकडून आशीर्वीद अपेक्षीत असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवली!

पुणे : मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणावळा येथील स्थानिकांनी रेल्वे २० मिनिटे अडवली होती. लांब पल्ल्यांच्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी या मागणीसाठी रेल्वे रोको करण्यात आला, यावेळी शेकडो स्थानिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. अखेप आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

Sharad Pawar : जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील लाल महाल येथे पोहचले आहेत. शरद पवार यांच्या हस्ते लाल महालामध्ये जिजाऊ मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती पाहायाला मिळत आहे.

Nagpur News : नागपूरच्या विधान भवनाचा विस्ताराचा मार्ग मोकळा

नागपूरच्या विधान भवनाचा विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानभवनासमोर असलेल्या खाजगी इमारतीचे संपादन होणार आहे. पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटीच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने अडसर ठरत असल्यानं अर्धवट असतांनाच बांधकाम थांबले होते. खाजगी मालकाशी वाटाघाटीतून मार्ग न निघाल्यास कायद्यानुसार इमारतीचे संपादन करण्यात येणार आहे. विधानभवन विस्तार झाल्यास इमारतीत राजकीय पक्षांचे कार्यालय होण्याची शक्यता आहे.

Mobile User Alert : मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी दूरसंचार विभागाचा महत्वाचा अलर्ट

नवी दिल्ली - मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी दूरसंचार विभागानं अलर्ट जारी केला आहे. जर कोणी 401 या क्रमांकाचा वापर तुम्हाला करायला सांगत असेल तर करू नका, तुम्ही हा नंबर डाईल केला तर तुमचे call forward होतील असे सांगण्यात आले आहे. अज्ञात नंबर वरून आलेले फोन स्वीकारताना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

जर चुकून तुमच्याकडून 401 क्रमांक डाईल करून call forward झाले तर तत्काळ त्याला डीअॅक्टिवेट करा अशा सूचना देखील विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून मोबाईल हॅक करण्यासाठी हॅकर कडून ही क्लृप्ती वापरली जात असल्याने विभागाकडून दखल घेण्यात आली आङे

TMC leader Sujit Bose : पश्चिम बंगालचे मंत्री सुजित बोस यांच्या घरावर ईडीची छापेमारी

पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुजित बोस यांच्या कोलकाता येथील घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. अधिक माहिती गोळ्या करण्याचा ईडीचा प्रयत्न आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-नाशिक-रायगड दौऱ्यावर 

मुंबई- नाशिक- रायगड जिल्हा दौरा

सकाळी १०.३० वा.

प्रधानमंत्री महोदयांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती

● स्थळ :- नाशिक हेलिपॅड, निलगिरी बाग, नाशिक

दुपारी १२.१० वा.

प्रधानमंत्री महोदयांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती

● स्थळ: तपोवन मैदान, सिटी लिंक बस डेपोजवळ, नाशिक.

दुपारी १२.१५ वा.

प्रधानमंत्री महोदयांसमवेत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

● स्थळ : तपोवन मैदान, सिटी लिंक बस डेपोजवळ, नाशिक.

दुपारी ३.३० वा.

प्रधानमंत्री महोदयांसमवेत अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे उद्घाटन

● स्थळ : एमटीएचएल प्रारंभ बिंदू, शिवडी,मुंबई

सायंकाळी ४.१५ वा.

प्रधानमंत्री महोदयांसमवेत नवी मुंबई येथील विविध प्रकल्पांचे शिलान्यास, उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.

●स्थळ : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदान, नवी मुंबई.

सायंकाळी ५.४० वा.

प्रधानमंत्री महोदयांचे प्रस्थान प्रसंगी उपस्थिती.

● स्थळ : नवी मुंबई हेलिपॅड

'मुंबई हृदयसम्राट कोण?' शेलारांनी प्रश्न विचारताच भाजपाच्या नेत्याचं नाव आलं समोर

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीच्या (१२ जानेवारी) पूर्वसंध्येला बोरिवली येथील मागाठाणे येथे राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशीष शेलारांनी मुंबई हृदयसम्राट कोण? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. त्यावेळी उपस्थितांकडून भाजपाच्या नेत्याचं नाव समोर आलं आहे. शेलार म्हणाले, मुंबईच्या विकासाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहिली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत.

Mamata Banerjee : 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला ममता बॅनर्जी यांचा विरोध

नवी दिल्ली : 'एक देश एक निवडणूक' या संकल्पनेला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शविला आहे. समितीच्या सचिवांना पत्र लिहीत त्यांनी विरोध केला आहे. ही संकल्पना भारताच्या संविधानिक व्यवस्थेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध असून ही संकल्पना स्पष्ट होत नाही, त्यामुळं समितीशी सहमत होण्यास मूलभूत वैचारिक अडचणी आहेत, असं त्यांनी नमूद केलंय.

पालकमंत्री मुश्रीफ आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ आजपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (ता. ११) ते कोल्हापुरात येतील व निवासस्थानी मुक्कामी जातील. शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी वंदूर येथील विकासकामांचे लोकार्पण होईल. शनिवारी (त. १३) कसबा सांगाव येथील विकास कामांचे लोकार्पण होईल. सायंकाळी सात वाजता गांधी मैदान येथे होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या उद्‌घाटनाला प्रमुख उपस्थिती असेल. रविवारीही (ता.१४) सकाळी ११ वाजता बिद्री येथे फराकटे कृषी सेवा केंद्राचे उद्‌घाटन होईल. दुपारी तीन वाजता मासिक दरबार हॉल येथे महायुतीच्या मेळाव्यास मंत्री मुश्रीफ उपस्थित असतील. सायंकाळी सात वाजता कागल नगरपालिकेच्या व्याख्यानासाठी उपस्थित राहतील.

Mihan Project : ज्योतिरादित्य शिंदे आज मिहानमध्ये

नागपूर : मिहान प्रकल्पातील एएआर इंदामर टेक्निक्स एमआरओचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १२) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या समारंभाचे प्रमुख पाहुणे तर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Asaduddin Owaisi : संभाजीनगरचे लोक इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा खासदार करतील - असदुद्दीन ओवेसी

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीसाठी आमची चांगली सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, इथले लोक इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा खासदार बनवतील, असा विश्वास AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

Mumbai Malavani Police : झोपडपट्टीत सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश, दोघांना अटक

मुंबई : मालवणी पोलिसांनी कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरू असलेल्या ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 1.18 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.

Rajmata Jijau Jayanti : मातृतीर्थावर आज जिजाऊ जन्मोत्सव

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) ः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आज शुक्रवारी (ता. १२) साजरा होणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. मराठा विश्वभूषण पुरस्कार प्रमोद मानमोडे, मराठा क्रीडा भूषण पुरस्कार श्याम शिंदे, मराठा कला रत्नभूषण राजेंद्र कोल्हे यांना जाहीर झाले असून त्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सकाळपासूनच विविध कार्यक्रम होणार आहेत. जिजाऊ सृष्टी येथे दुपारी २ वाजता शिवधर्म पीठाच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात होणार आहे. अध्यक्षस्थानी ॲड. पुरुषोत्तम खेडेकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे.

Narendra Modi Visit Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर; प्रशासनाकडून जय्यत तयारी

Latest Marathi News Live Update : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळं या महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार तपोवन येथील मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा निश्चित झाला असून ते नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. तसेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळं ठाकरे गटातून संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा ‘मूळ शिवसेना’ असल्याचा निर्वाळा देत त्यांनी राज्यातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणले.

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर देशातील वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. शिवाय, आज ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. देशभरात पुन्हा कोरोना विषाणूने थैमान माजवले आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

SCROLL FOR NEXT