BMC खिचडी कोविड घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणला अटक झाली आहे. ED नं ही कारवाई केली, सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेंच्या जवळचा सहकारी आहे. मुंबई महापालिकेतील कथीत खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वी सूरज चव्हाणची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
नवी दिल्ली : दाट धुक्याच्या स्थितीत विमानांच्या उड्डाणांबाबत केलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी DGCAनं एअर इंडिया आणि स्पाईसजेटला चांगलाच दणका दिला आहे. या दोन्ही विमान कंपन्यांवर प्रत्येकी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिगो विमानाचं उड्डाण तब्बल १२ तास विलंब झाला होता. यापार्श्वभूमीवर DGCA नं हे पाऊल उचललं आहे.
राम लल्लाच्या दर्शनासाठी २२ तारखेनंतर कुटुंबासोबत जाणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
भारताचा विकास दर ७ टक्क्यांपेक्षा अधिक राहणार असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केलाय. दावोसमध्ये उद्योग परिषदेत ते बोलत होते.
अनेक उद्योगपती महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आपल्याला फायदा होत आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसमध्ये केले.
विवेक सृष्टी ट्रस्टच्या कार्यलयातून राम लल्लाची मूर्ती राम मंदिराच्या दिशेने रवाना झाली आहे. राम लल्ला गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहेत.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तुपकर यांनी रेलरोका करण्याचं ठरवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोटीस पाठवलीये. अशा नोटिसीला भीक घालत नसल्याचे ते म्हणालेत.
Manoj Jarange: मनोज जरांगे आणि सरकारमधील 'सगेसोयरे' या शब्दावरुन सुरु असलेला वाद संपण्याची शक्यता आहे.
Sushikkumar Shinde on Party Change: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही.
नुकतीच भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. नाट्य संमेलनाचं आमंत्रण द्यायला आलो होते, असे ते म्हणाले.
Sushilkumar Shinde:चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे बडे नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीणं राजकीय विश्वात चर्चांना उधाण आलं आहे.
Sanjay Raut: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की मुंबईमध्ये मिंधे गटाला कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कराडमध्ये बैलगाडीचं सारथ्य केलं.
नुकतचं सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून मिळालेल्या ऑफरबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस न सोडण्याचाही विचार बोलून दाखवलं. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, 'सुशीलकुमार शिंदे यांना जशी वाटते तशी काँग्रेस आता राहिलेली नाही.'
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतील वांद्रे भागातील बुद्ध मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुजारी सुनील दास यांनी अयोध्या राम मंदिराच्या 'गर्भ गृहात' पूजा केली.
भाजपनं सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही. मात्र जर कुणाला यावं वाटलं तर पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पंजाब: होशियारपूर मुकेरियनमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 3 ठार तर 10 जखमी
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी अवघ्या ३८ मिनिट १४ सेकंदात करून एका नव्या विक्रमाला गवसणी गवसणी घातली आहे.
टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी केली आणि डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-1 भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.
अदानी समूह मीडिया क्षेत्रात झपाट्याने आपले पाय पसरवत आहे. NDTV मधील बहुसंख्य भागभांडवल संपादन केल्यानंतर, अदानी समूहाने IANS India मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्सने हा हिस्सा खरेदी केला होता. कंपनीने सांगितले की संपादनाची किंमत 5 कोटी आहे.
भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी मंगळवारी भाजप पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला आहे. पक्षाकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने म्हात्रे हे नाराज आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी विकास म्हात्रे यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपणास कामासाठी निधी मिळवून देतील. ते आमच्यात सहभागी झाले तर आनंदच आहे असे दीपेश यांनी म्हटलं आहे.
मला आणी प्रणितीला भाजपकडुन ऑफर आली आहे. मी २ वेळा लोकसभेत पडलो पण तरीही मला भाजपने ऑफर दिली आहे असे अक्कलकोटमध्ये एका सभेत माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले.
कुकडी प्रकल्पाचे सध्या आवर्तन सुरू आहे. कुकडीतून विसापूर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. याप्रश्नी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिष्टाई केली होती. त्यानुसार हे आदेश देण्यात आल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले
मुलूंड येथील मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरूषत्तोम दळवी यांचा आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण शेलार हे देखिल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत
कराडमध्ये कृष्णा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. बैलगाडीमधून जात फडणवीसांनी सर्वांचं लक्ष वेधलं.
बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबईतल्या हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
पठाणकोटमध्ये एका अपघातात तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. बस आणि ट्रकच्या अपघातामध्ये तिघांना जीव गमवावा लागला.
पुण्यातील कात्रज भागात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. कात्रजजवळील मांगडेवाडीजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिंदे गट ही शिवसेना नाही, ओढून ताणून कलेला प्रकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आम्ही पूर्वीही २३ जागा लढत होतो आणि आजही २३ जागा लढणार आहोत.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांना नवी दिल्लीत सरकारने दिलेले निवासस्थान रिकामे करण्याची नवीन नोटीस मिळाली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बेंगळुरू आणि अयोध्या दरम्यानच्या पहिल्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचे उद्घाटन केले.
दिल्लीच्या सफदरजंग येथे आज किमान तापमान 5.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवमान विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे.
आसामच्या दारंग येथे आज सकाळी ७.५४ वाजता ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दलची माहिती दिली आहे.
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १९) बंगळूरला येणार आहेत. मात्र ‘रोड-शो’ होणार की नाही, त्याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. केरळमधील एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर बंगळूरला येणारे मोदी शहरातील एरोस्पेस अभियांत्रिकी विशेष भारत अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्राला भेट देतील. यापूर्वी मोदी यांनी बंगळूर येथील इस्रो कार्यालयाला भेट दिली होती.
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीसह, शिवसेना, महिला आघाडी व युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
तामिळनाडू : मदुराईमध्ये जगप्रसिद्ध अलंगनलूर जल्लीकट्टू महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.
मुंबई : ट्रॉम्बे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपींकडून 8 बंदुका आणि 15 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव : मुंबई ते कोल्हापूर व्हाया ठाणे- कल्याण- पुणे- सातारा- सांगली- मिरज- कोल्हापूर ही वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सेवा जानेवारीअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवाशांना गतिमान आणि आरामदायी सेवा देणारी सेमी हायस्पीड रेल्वेसेवा म्हणून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’कडे पाहिले जाते. सध्या देशभरात ४१ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सेवेत आहेत. महाराष्ट्रात सात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू आहेत. आता जानेवारीअखेर मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे.
इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराक आणि सीरियावर हवाई हल्ल्याच्या एक दिवसानंतर इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ही कारवाई केलीये. या हल्ल्यानंतर इराणने त्यात अनेक दहशतवादी मारल्याचा दावा केलाय. त्याचवेळी मुलांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे वृत्त इराणच्या राज्य माध्यमांनी दिले आहे.
अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना मंगळवारपासून सुरुवात झाली. विविध देवतांच्या आवाहनाने या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात करण्यात आली आहे. या विधींमध्ये अकरा वैदिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. आज पासून सुरू झालेले विधी २१ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. २२ जानेवारीला येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात येणार आहे.
सातारा : लोकसभा निवडणुकीचे वारे जिल्ह्यात वाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (बुधवारी) कऱ्हाड व फलटणच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर प्रथमच श्री. फडणवीस सातारा जिल्ह्यात येत आहेत.
Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे थंडीने गारठले आहेत. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. ‘एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही संरक्षणाशिवाय जनतेत यावे, मी पण संरक्षणाशिवाय येतो आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय जनतेने द्यावा. त्यानंतर जनताच त्यांना पुरावा, गाडावा की तुडवावा याचा निर्णय घेईल’, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेय. त्यावर आज दोघांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (बुधवारी) कऱ्हाड व फलटणच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्याला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याचबरोबर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये 20 जानेवारीला आंदोलन करणार आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.