Marathi News LIVE Updates eSakal
देश

Latest Marathi News: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

काँग्रेस आज (रविवार) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune News: नऱ्हे गावाजवळील स्वामी नारायण मंदिरात ट्रस घुसला, दुचाकी स्वार जखमी

मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे गाव सेवा रस्त्यावरून जाणारा ट्रक श्री स्वामी नारायण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात शिरुन अपघात झालाय. अपघातात दुचाकी आणि दोन चारचाकींचे नुकसान झाले आहे. दुचाकी स्वार जखमी असून जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे

Ashish Shelar: ठाकरे सरकारच्या बिल्डरांच्या प्रिमियम माफीमुळे महापालिकेच्या ठेवी घटल्या- आशिष शेलार

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला 50% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड अशी शेलार यांनी आज येथे केला.

महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड शेलार यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला.

कल्याणच्या भंडार्ली येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

कल्याणच्या भंडार्ली येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली आहे. आगीमुळे आजूबाजूच्या गावात धुराचे लोट पसरले आहेत.

घटकपक्षांचा भाजपवरचा विश्वास कमी होणार- थरुर

लोकसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा पुढे येईल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीयरित्या कमी होतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मधील घटकपक्षांचा भाजपवरुन विश्वास कमी होईल.

शीतलहरीमुळे पंजाबमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

'कोल्ड वेव्ह'मुळे पंजाबमधील सर्व शाळांमधील इयत्ता 5 वी पर्यंतचे वर्ग 20 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील तर इयत्ता 6 वी ते 12वी चे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होतील.

Ram Mandir: मध्य प्रदेशात २२ जानेवारीला सुट्टी जाहीर

राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगानिमित्त २२ जानेवारीला मध्य प्रदेशमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.

Washi Deadbody: वाशी खाडीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील सदर मृतदेह पोलिसांनी स्थानिक मच्छिमार व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून महापालिका रुग्णालयात पाठवून दिला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

MLA Disqualification: आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात १६ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १६ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

Jalgaon News: जळगावात महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भर सभेत भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये अनुराग ठाकूर स्वच्छता मोहिमेत सहभागी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथील डेरा बाबा रुद्रानंद आश्रमाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कबड्डी स्पर्धेदरम्यान गॅलरी कोसळली

भाजपच्या नमो कबड्डी चषक स्पर्धेदरम्यान अपघात झाला असून गॅलरी कोसळल्याने काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Sanjay Raut On Milind Deora:'हे सगळं सत्ता अन् खोक्याचं राजकारण', देवरांच्या शिवसेना प्रवेशावर राऊतांची टीका

Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले की, 'हे सगळं सत्ता आणि खोक्याचं राजकारण सुरु आहे.'

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रसेच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपुरपासून सुरुवात

Bharat Jodo Nyay Yatra Kickstarted: भारत जोडो न्याय यात्रेला मणिपुरपासून सुरुवात झाली आहे.

Rahul Gandhi: 'मणिपुर हे भाजपच्या राजकारणाचा खरा चेहरा', राहुल गांधी यांचं वक्तव्य

Rahul Gandhi about Manipur: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी मणिपुरच्या थौबल या ठिकाणी बोलताना भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, 'मणिपुर हे भाजपच्या राजकारणाचा खरा चेहरा आहे.'

CM Eknath Shinde:मी दीड वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी दीड वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही."

Milind Deora:मी काँग्रेस सोडेलं असं कधीचं वाटलं नव्हतं- माजी खासदार मिलिंद देवरा

Why Milind Deora Left Congress: नुकताच माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. देवरांबरोबरच त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मी काँग्रेस सोडेलं असं कधीही वाटलं नव्हतं."

Milind deora:मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Milind Deora in Shivsena:माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर समर्थकांनी गर्दी केली होती.

Weather Update: दिल्लीत थंडी आणि धुक्याने कहर, अनेक गाड्या 6 तास उशिराने, 7 उड्डाणे वळवली, IMD जारी केला अलर्ट

दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे आणि गाड्या उशिराने धावत आहेत तर अनेक उड्डाणांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

रविवारीही दाट धुक्यामुळे 22 गाड्या उशिराने तर 7 उड्डाणे वळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 6 फ्लाइट जयपूरच्या दिशेने तर एक फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही सर्व उड्डाणे पहाटे 4.30 ते 7.30 दरम्यान वळवण्यात आली.

Milind Deora : मिलिंद देवरा मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी दाखल

मिलिंद देवरा मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज त्यांचा शिवसेना(शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत.

राहुल गांधींना त्यांच्या न्याय यात्रेसाठी आणि त्यांच्या सर्व परिश्रमांसाठी शुभेच्छा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज एएनआयशी बोलताना म्हणाल्या की, राहुल गांधींना न्याय यात्रेसाठी आणि त्यांच्या सर्व परिश्रमांसाठी शुभेच्छा.

Rohit Pawar: 'विकासाचे मुद्दे नसल्याने राम मंदिरावर...' रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. "शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात त्यामुळे त्यांनी 22 तारखेला तेथे जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा".

तसेच "22 तारखेच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रम जास्त होत आहेत असा धर्मगुरूंचा आरोप आहे. मंदिर पूर्ण होण्याआधीच तो कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे लोकांना राजकीय वास येत आहे. तसेच विकासाचे मुद्दे भाजपकडे राहिले नाहीत त्यामुळे राम मंदिरावर इलेक्शन लढायचे आहे," अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.

राम कदमांचा कॉंग्रेसला टोला; म्हणाले काँग्रेसने रामलल्ला चे निमंत्रण नाकारले, म्हणुन 

एकीकडे राहूल गांधीची भारत जोडो यात्रा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांची काँग्रेस छोडो अभियान सुरु आहे. काँग्रेसने रामलल्ला चे निमंत्रण नाकारले. आता तर तुम्हांला तुमचे घरंचे लोक नेते नाकारू लागलेत यालाच म्हणतात ईश्वरीय दंड असे राम कदम म्हणाले.

मिलिंद देवरांचं स्वागत - चित्रा वाघ

जे अमच्याकडे येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ. पुढेही अनेक नेते महायुतीकडे येतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सारख्यांचा नेतृत्व आमच्याकडे आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या

मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसची बैलाला धडक

वंदे भारत एक्सप्रेसला जनावरांनी धडक देण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. या रेल्वेगाडीची बैलाला धडक बसून अशा प्रकारचा पहिला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोटूळ शिवारात हा अपघात घडला. तब्बल एक हजार फुटांपर्यंत एक्स्प्रेसने या बैलाला फरपटत नेलं.

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा मेळावा

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी (ता.१४) तापडिया नाट्य मंदिरात होणार आहे. मेळाव्याला विविध पक्षांचे मंत्री तथा स्थानिक आमदारांची उपस्थिती राहणार असल्याचे शनिवारी (ता.१३) शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा, यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Kolhapur Crime आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा गोळी झाडून खून

दोनवडे (ता. करवीर) येथे आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा त्याच्याच हॉटेलमध्ये गावठी कट्ट्यातून गोळी झाडून शनिवार रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. हॉटेल मालक चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५५, रा. दोनवडे, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. यामध्‍ये त्यांचा मुलगा रितेश जखमी झाला.

मिलींद देवरा सिध्दिविनायकाच्या दर्शनाला  

काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलींद देवरा त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या नंतर ते आता सिध्दिविनायकायच्या दर्शनाला गेले आहेत

Yavatmal: कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएची कारवाई

कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’च्या प्रस्तावाचा आदेश पारीत होताच अकोला येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचा पथकाने केली. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांत खळबळ उडाली आहे. वृषभ ऊर्फ वृषिकेश ऊर्फ जब्बा उमेश वानखडे (वय २४, रा. रामकृष्णनगर, मुलकी, यवतमाळ) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जब्बाचा गुन्हेगारी अभिलेख २०१८पासूनचा आहे. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, संपत्तीचे नुकसान करणे, जबरी चोरी, जिवाने मारण्याची धमकी देणे, जखमी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंद आहेत.

Milind Deora :  देवरा यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी - बाळासाहेब थोरात

"आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल"

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी ५५ देशातील १०० पाहुण्यांना निमंत्रण

अयोध्या, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी राजदूत आणि खासदारांसह 55 देशांतील सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रित केले आहे अशी माहिती जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी दिली आहे.

Bharat Jodo Nyay Yatra : थौबल येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची जोरदार तयारी  

मणिपूर: खोंगजोम, थौबलमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आज थौबल येथून सुरू होणार आहे. 110 जिल्ह्यांतून ही यात्रा 67 दिवसांत 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.

मिलींद देवरा यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे, काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलींद देवरा त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार! आज बडा नेता शिंदे गटात करणार प्रवेश?

काॅग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार मिलींद देवरा यांच्या आजच शिंदे गटात प्रवेशाची शक्यता आहे.

माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिलींद देवरा ११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील.

त्यानंतर १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता जातील. देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले नाही. या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्यानं येणा-या काळात मिलींद देवरा यांच्यावरुन भाजप-शिंदे गटातही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Police : कोल्हापुरात 10 गुंडांच्या घरांसह अड्ड्यांवर छापे

कोल्हापूर : अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरापासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत शहरातील रेकॉर्डवरील दहा गुंडांच्या घरांसह छुप्या अड्ड्यांवर छापे टाकून झाडाझडती घेतली. कोम्बिंंग ऑपरेशन काळात ओपन बार व मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणार्‍या एकूण 8 तळीरामांची पथकाने थेट कोठडीत रवानगी केलीये.

Milind Deora : मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार; 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबईतील १० माजी नगरसेवक, २५ पदाधिका-यांसह माजी खासदार मिलिंद देवरा यांचा आज शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांचा दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. ११ वाजता सिद्धी विनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन देवरा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील.

Weather Update : 'या' भागात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज (रविवार) पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि कर्नाटकात उद्या (15 जानेवारी) ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. आज तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे.

Atal Sagari Setu : सार्वजनिक वाहतुकीसाठी अटल सागरी सेतू खुला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सेतू’चे लोकार्पण केले. हा सेतू शनिवारपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी यावरून प्रवासाचा आनंद घेताना वेगमर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा आज अक्षता सोहळा

सोलापूर : शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जयघोष, पारंपरिक वाद्य, पांढराशुभ्र बाराबंदी मोठ्या थाटात भक्तीमय वातावरणात शनिवारी ६८ लिंग तैलाभिषेक सोहळा झाला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा आज, रविवारी (ता. १४) होणार आहे. अक्षता सोहळ्यापूर्वी तैलाभिषेक सोहळा भक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात झाले.

दाट धुक्यामुळं 22 रेल्वे गाड्या धावताहेत उशिराने

आज दाट धुक्यामुळं देशाच्या विविध भागातून दिल्लीकडं जाणाऱ्या 22 रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Chennai International Airport : 'पोंगल'च्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी दिव्यांनी चेन्नई विमानतळ उजळलं

तामिळनाडू : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ 'पोंगल'च्या निमित्तानं रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं आहे. नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

America : यूएसमधील भारतीयांकडून कार रॅलीचं आयोजन

एडिसन, न्यू जर्सी : अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी यूएसमधील भारतीयांनी 350 हून अधिक कार रॅलीचं आयोजन केलं आहे.

Pandharpur : करकंबमध्ये शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात  पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलीये. मनोज अंकुश पवार (वय 11), गणेश नितीन मुरकुटे (वय 7), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 9 वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. 

15 राज्ये, 100 लोकसभेच्या जागा; राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आजपासून मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस आज (रविवार) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करत आहे. या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. मणिपूरची राजधानी इंफाळजवळील थोबल येथून ही यात्रा सुरू होईल आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सोहळ्याची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये. यावर आता मोदी सरकार काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याचबरोबर देशातील वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. देशभरात पुन्हा कोरोना विषाणूने थैमान माजवल्याचे चित्र आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT