Marathi News LIVE Updates eSakal
देश

News Update: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण ; वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

गुंड मोहोळच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण; वैकुंठ स्मशानभूमी होणार अंत्यसंस्कार

कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झाला आहे सेवविच्छेदनानंतर मोहोळचा मृतदेह त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी मध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील ससून रुग्णालयातून पोलीस बंदोबस्तात मोहोळचा मृतदेह त्याच्या घराकडे रवाना करण्यात आला आहे.

भारतीय नौदलाच्या कमांडोंच्या ऑपरेशला व्हिडिओ समोर

अरबी समुद्रात एमव्ही लिली नॉरफोक या जहाजाजवळ भारतीय नौदलाची बोट पोहचली होती. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी अपहरण केलेले जहाज सुरक्षित केले आणि 15 भारतीयांसह क्रूची सुटका केली. भारतीय नौदलाचे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश

भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध शक्य तितक्या कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रदेशातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत: संरक्षण अधिकारी

लोकसभा निवडणुकांचे रणशिंग नरेंद्र मोदी नाशिकमधून फुंकणार

१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शो आहे. विभागीय क्रीडा संकुल हेलिपॅड ते मोदी मैदानावरील सभा स्थळापर्यंत मोदींचा रोड शो असणार आहे. तब्बल दीड किलोमीटर मोदींचा रोड शो असेल. लोकसभा निवडणुकांचे रणशिंग मोदी नाशिकमधून फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समुद्री चाच्यांना जहाज सोडण्याचा नेव्हीचा इशारा, मरीन कमांडो मार्कोस ऑपरेशनसाठी सज्ज

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालियाच्या किनारपट्टीवरील एमव्ही लिला नॉरफोक या बंदरात अपहृत जहाजावर पोहोचली आहे. भारतीय युद्धनौकेने आपले हेलिकॉप्टर सोडले आहे आणि समुद्री चाच्यांना जहाज सोडण्याचा इशारा दिला आहे. जहाजावरील भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत आणि मरीन कमांडो मार्कोस ऑपरेशनसाठी तयार आहेत: लष्करी अधिकारी

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींनी घेतली अर्थमंत्री सितारमन यांची भेट 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आजा दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली.

श्रीकांत पुजारींना जामीन; सतिश जार्कीहोळींची प्रतिक्रिया

श्रीकांत पुजारीला हुबळी कोर्टाने जामीन दिल्यानंतर मंत्री सतिश जार्कीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, त्यांना जरी जामीन मिळाला असला तरी केस सुरूच राहणार आहे. कोण योग्य आणि कोण अयोग्य ते न्यायालय ठरवेल.

इडीच्या टीमवर हल्ला होताच भाजपची ममता बॅनर्जींवर टीका 

पश्चिम बंगालमध्ये आज इडीच्या एका टीमवर हल्ला झाला होता. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करत या हल्लेखोरांना त्याचं संरक्षण असल्याचा आरोप केला. भाटिया यांनी ममतांनी मुख्यमंत्री पदावर एक दिवसही राहू नये राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.

गुंड शरद मोहोळच्या मृत्यूनंतर ससून रूग्णालयात गोंधळ सुरू

पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापुरात दाखल

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू

पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता.

बाबांनो आपल्य बापजाद्यांनी जपून ठेवलेल्या जमिनी विकू नका: अजित पवार

रायगड हा निसर्गाच देणं असणारा जिल्हा आहे. माझी विनंती आहे आम्ही पुण्यात राहतो इकडच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतो. बाबांनो आपल्य बापजाद्यांनी जपून ठेवलेल्या जमिनी विकू नका. बाहेरचे लोक येतील पैसे देतील. पण एकदा का आपण आपली जमीन विकली तर आपल्याकडे काही राहणार नाही. व्यवसाय करा. जमिनीचा वापर करा. तुम्हांला दुसरीकडे कुठे जाव लागणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दहा दिवसात साई मंदिरात तब्बल १६ कोटींचे दान

गेल्या दहा दिवसात शिर्डीच्या साईंच्या दर्शनाला ८ ते १० लाख भाविक आले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसात एकूण १६ कोटींचे दान आले.

पुण्यातील गुंड शरद मोहोळवर उपचार सुरु

काही तासांपुर्वी पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाला. अज्ञातांनी शरदवर तीन गोळ्या झाडल्या. मोहोळला कोथरूड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील

केंद्र सरकारकडून देशातील मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील देण्यात आलाय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमध्ये दाखल

रायगडमध्ये पार पडणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमध्ये दाखल झालेत

हिरे-दागिन्यांच्या क्षेत्रात मुंबई नवीन विक्रम करेल - देवेंद्र फडणवीस

आयआयजेएस सिग्नेचर ज्वेलरी शो 2024 च्या उद्घाटनाला देवेंद्र फडवणीस उपस्थित आहे. यावेळी ते म्हणाले, की हिरे आणि दागिन्यांच्या क्षेत्रात मुंबई आपलं अग्रगण्य स्थान कायम ठेवेल, आणि लवकरच एक नवीन विक्रम करेल असा विश्वास फडवणीसांनी व्यक्त केला.

आमदार कांबळेंचा इगो का दुखावला माहिती नाही- सातव

''हा शासकीय कार्यक्रम आहे.. वैयक्तिक कार्यक्रम नाही. रुग्णसेवा करणारे स्वयंसेवक म्हणून आम्ही इथे काम करत होतो. सुनील कांबळेंचा काय युगो दुखावला गेला हे आम्हाला माहिती नाही'', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सातव यांनी दिली आहे

खाकी वर्दीला हात लावण्याची हिंमत आमदारामध्ये कशी?- वडेट्टीवार

आमदार सुनील कांबळे यांनी कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. ''काल अब्दुल सत्तार आणि आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी सत्तेचा माज दाखवला. भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो.'' असं ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह पुन्हा राज्यसभेवर जाणार

तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत, आपने मोठा निर्णय घेतला आहे. २७ जानेवारीला संजय सिंह यांची राज्यसभेची टर्म पूर्ण होत आहे. १९ जानेवारीला ही निवडणूक होणार आहे.

दिल्ली कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेले संजय सिंह सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणात दिल्ली राऊज एवेन्यू न्यायालयाने संजय सिंह यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिलीय.

राज्यपाल रमेश बैस आज नाशिकच्या दौऱ्यावर; काळाराम मंदिरात घेणार दर्शन

नाशिक : राज्यपाल रमेश बैस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्यपालांच्या दर्शनादरम्यान मंदिर काही काळ दर्शनासाठी बंद ठेवणार आहेत. श्री काळारामाच्या दर्शनानंतर साधू, महंत देव निंदा विरोधी कायदा करण्यासंदर्भात राज्यपालांना निवेदन देणार आहेत. श्री काळारामाच्या दर्शनानंतर राज्यपाल एका खासगी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात राडा!  

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सातव यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.

MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्र वेळापत्रक ठरले! असे होईल कामकाज

आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार झाले आहे.

असे असेल कामकाजाचे वेळापत्रक -

६ जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

१२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

१६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.

२० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.

कृष्ण जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाच निर्णय

मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या जागेला कृष्ण जन्मभूमी म्हणून मान्यता देण्याची जनहित याचिका फेटाळणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध करण्यात आलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे आधीच न्यायालयासमोर विचाराधीन आहेत.

आंदोलनासाठी सकल मराठा समाजाने मागितली तीन मैदानांची परवानगी 

मराठा नेते जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून तीन मैदानांची मागितली परवानगी आहे. यामध्ये आझाद मैदान, वांद्रे आणि दादर शिवाजी पार्क मैदानाचा समावेश आहे.

तीनही मैदानांची काही दिवसांपूर्वी मुंबईतील सकल मराठा समाज व जरांगे पाटील यांच्या शिष्ठ मंडळाने मागणी केली होती. जरांगे यांनी आझाद मैदानात आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही आझाद मैदान आंदोलनासाठी मिळावं यासाठी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना -  अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आम्ही महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत... प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, आम्ही मागच्या वेळेप्रमाणेच लोकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकलो... सध्याचा प्रकार सौम्य स्वरूपाचा आहे.

दाट धुक्याचा परिणाम पश्चिम रेल्वे वाहतूकीवरही,डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकल विलंबाने

पालघरमध्ये दाट धुक्याची चादर पसरल्याचे दिसून येतआहे. दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे, डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू आहेत.

दिल्लीला जाणाऱ्या २२ गाड्या धुक्यांमुळे विलंबाने

देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या २२ गाड्या उत्तरेकडील भागात धुक्यासह विविध कारणांमुळे उशिराने धावत आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड, दोन आठवड्यांतील दुसरी घटना

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मंदिराच्या तोडफोडीची आणखी एक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील हेवर्ड येथील एका हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्रांनी हल्ला करण्यात आला आहे. खलिस्तानी समर्थकांनी विजयाच्या शेरावली मंदिराबाहेर भारतविरोधी भित्तीचित्रे लावली आहेत. कॅलिफोर्नियातील स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर खलिस्तानींचे हे कृत्य केले आहे. याच परिसरातील शिव दुर्गा मंदिरातही चोरी झाली होती.

मिझोराममध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

लुंगलेई, मिझोराम येथे सकाळी ७:१८ वाजता ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

ख्रिसमसनंतर प्रथमच सुरू झालेल्या अमेरिकेतील शाळेत गोळीबार

अमेरिकेत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, तेव्हा पहिल्याच दिवशी शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देश हादरला. अमेरिकेच्या आयोवा राज्यात घडलेल्या या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित शूटरने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अद्याप संपेना; आणखी आठ-दहा दिवस लागण्याची शक्यता

महाविकास आघाडीचा राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, असे तिन्ही पक्षांचे नेते बोलत असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आणखी ८ ते १० दिवस लागतील, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा जागावाटप जाहीर करण्याची पुढची तारीख दिली आहे.

Jallikattu Event : तामिळनाडूत तीन दिवस जल्लीकट्टू कार्यक्रमाचं आयोजन

तामिळनाडू : मदुराईमध्ये जल्लीकट्टू कार्यक्रम 15 जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी जल्लीकट्टू कार्यक्रम 15 जानेवारीला अवनियापूरममध्ये, त्यानंतर 16 जानेवारीला पलामेडू आणि 17 जानेवारीला अलंगनाल्लूर येथे होणार आहे, अशी माहिती मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

..अखेर आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेला पोलिसांची परवानगी

गिरगावच्या फणसवाडीत आदित्य ठाकरेंची उद्या (शनिवार) जाहीर सभा होणार आहे. दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची ही जाहीर सभा होत आहे. गिरगांव येथे विभाग क्रमांक 12 च्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तर अरविंद सावंत यांना भाजपकडून आव्हान असण्याची शक्यता आहे.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. यामधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलंय.

जयपूरच्या शिल्पकाराने तयार केलेली राम लल्लाची मूर्ती अयोध्येत पोहोचली

जयपूरच्या शिल्पकाराने तयार केलेली 51 इंच उंचीची राम लल्लाची मूर्ती उत्तर प्रदेशच्या अयोध्येत पोहोचली आहे.

'मेरी पॉपिन्स' अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन

न्यूयॉर्क : "मेरी पॉपिन्स"मधील विनिफ्रेड बँक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटिश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचं गुरुवारी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.

रिक्षाचालकावर कोयत्याने वार, सहा जणांवर गुन्हा

क्षेत्र माहुली : विरोधातील लोकांशी बोलतो या कारणावरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम ऊर्फ माऊली तानाजी बोकेफोडे (रा. संगमनगर) असे जखमीचे नाव आहे.

जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झाली पाहिजे - उदयनराजे भोसले

सातारा : प्रभू श्रीरामचंद्रांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारची सामाजिक विकृती आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'श्रीराम मांसाहारी होते' या त्यांच्या विधानानंतर राज्यात गदारोळ माजल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी लोकभावनेचा आदर आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसह सर्वांना सोबत घेणार आहोत, असं शरद पवारांनी जाहीर केलंय. आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा होत आहे, याची जय्यत तयारी सुरु आहे. तसेच राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्याचबरोबर देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT